चाणक्यच्या मते : ‘या’ जागांवर 1 मिनिटही थांबलात तर उद्ध्वस्त व्हाल…!

चाणक्य : आजही रोजच्या जीवनात, व्यवहारात,कामात आणि आपल्या आचरणात लक्षात ठेवण्याचे महत्त्वपूर्ण निर्णय पंडित कौटिल्य म्हणजेच आचार्य चाणक्याने सांगून ठेवले आहेत. अचानक यांना आजही राजकारणातील पंडित म्हणून संबोधले जाते. चाणक्यांनी सांगितलेल्या नियमांचे पालन जर तुम्ही केले तर मोठं मोठ्या संकटांवर सहज मात करू शकता. म्हणून आज आपण आपल्या रोजच्या दैनंदिन कार्यात कोणत्या गोष्टी पासून सावध राहिले पाहिजे अशा चाणक्य नीति बद्दल जाणून घेणार आहोत.
उपसर्गेन्यचक्रे च दुर्भिक्षे ज भयावहे.असाधुजनसम्पर्के पलायति स जीवति।
या श्लोकाचा अर्थ असा आहे की, तुमच्या आसपास वाईटातील वाईट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यास त्या जागेला तात्काळ सोडावं. परिस्थितीची जाणीव न ठेवता जर तुम्ही ती जागा नाही सोडली, तर होणाऱ्या नुकसानाला सामोरं जाण्याची वेळ येऊ शकते. त्याशिवाय, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास पोलीस आणि प्रशासन यांना तोंड द्यावं लागू शकते.
जर एखाद्या राज्यात दुष्काळ पडला तर त्या जागेवर त्वरीत स्थलांतर करावे पाण्याच्या अभावामुळे शेती अन्नधान्य म्हणजेच जेवण या घटकांवर फरक पडतो आणि भविष्यात तुम्हाला अशा समस्यांना तोंड द्यावे लागू शकते त्यामुळे ती जागा सोडण्यात तुमचा शहाणपणा आहे असं चाणक्य यांनी सल्ला दिला आहे.
श्लोकाच्या शेवटच्या ओळीत असे सांगितले आहे, समाजात अनेक प्रकारचे लोग तुम्हाला भेटतील. मराठीतील एका म्हणीनुसार, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती! काही लोकांचं वागणं, चरित्र किंवा रोजचा व्यवहार संशयी असतो. असे लोक विश्वास ठेवण्याजोगे नसतात.
त्यामुळे अशा लोकांवर विश्वास ठेवल्याने तुमचे नुकसान होऊ शकते.