अरे देवा ! युझी-धनश्रीच्या नात्याला तडा ! धनश्रीने इंस्टावर पोस्ट करत दिले वेगळे होण्याचे संकेत….

अरे देवा ! युझी-धनश्रीच्या नात्याला तडा ! धनश्रीने इंस्टावर पोस्ट करत दिले वेगळे होण्याचे संकेत….

क्रिकेटपटूंच्या खेळासोबतच त्यांचे वैयक्तिक आयुष्य देखील कायमच चर्चेचा विषय ठरतो. हरभजन सिंग, युवराज सिंग विराट कोहली सारख्या सुपरस्टार्सने बॉलीवूडच्या सुंदरिंसोबत विवाह केला. ग्लॅमर आणि क्रिकेट यांचे जुने नाते आहे. कायमच बोल्ड आणि ग्लॅमरस सुंदरी क्रिकेटपटूंकडे आकर्षित होतात आणि क्रिकेटपटूंच्या बाबतीत देखील असेच घडतं.

त्यातूनच मैत्री आणि पुढे प्रेम कहानी सुरू होते आणि त्या नात्याचं लग्नात रूपांतर होतं. अशीच काही प्रेम कथा भारताचा यशस्वी गोलंदाज युजवेंद्र चहलची देखील आहे. चहलने आयपीएल मधून आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांची सुरुवात केली. आयपीएल मधील उत्तम प्रदर्शन बघता त्याला भारतीय क्रिकेट संघात देखील स्थान मिळाले.

त्यानंतर आपल्या अतिशय हटके गोलंदाजीने चलने चांगलेच यश संपादन केले. त्याची प्रेमकथा देखील खास आहे. एका उत्तम अशा डान्सर कडे युझवेंद्रने डान्स क्लास लावला आणि तिच्याच प्रेमात पडला. youtube वर 26 लाख सबस्क्राईब असणारी धनश्री वर्मा युजवेंद्र चहलची पत्नी आहे. त्या दोघांची लव स्टोरी देखील खूपच हटके आहे.

धनश्री वर्मा एक उत्तम डान्सर आहे. युट्युब वरती तिचे चैनल जबरदस्त हिट समजले जाते. कायमच आपल्या डान्स चे व्हिडिओ युट्युब आणि instagram वर शेअर करत असते. सोशल मीडियावर धनश्रीचा खूप मोठा चहाता वर्ग आहे. चहलने तिच्याकडून डान्स शिकण्यासाठी तिच्याकडे क्लास लावला आणि तीन महिन्यातच दोघांचं लग्न झालं.

चहलला ती डान्स तर शिकवू शकली नाही. मात्र साता जन्माची गाठ दोघांची बांधली गेली धनश्री वर्मा चहलसोबत बऱ्याच सामन्यांमध्ये जाते. धनश्री एखादी अभिनेत्री नसली तरी ती प्रचंड ग्लॅमरस आणि सुंदर आहे. आपल्या फॅशन सेन्सने ती थेट बॉलिवूड अभिनेत्रीना देखील टक्कर देते. धनश्री आणि युजवेंद्र चहल या जोडीचा खूप मोठा चाहता वर्ग बघायला मिळतो.

मात्र आता हीच जोडी वेगळी होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडिया वरती दोघांनीही शेअर केलेल्या स्टोरी वरून दोघेही लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे अंदाज चाहते लावत आहेत. काहीच दिवसांपूर्वी धनश्रीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून तिचं सासरच आडनाव म्हणजेच ‘चहल’ नाव हटवलं. तर त्याच्या काहीच वेळानंतर युझीने देखील ‘आयुष्याची नवीन सुरुवात’ असं म्हणत एक स्टोरी शेअर केली.

त्यामुळे आता दोघेही वेगळे होणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान कायम सोशल मीडियावर सक्रिय असणारे युझी आणि धनश्री मागील बऱ्याच काळापासून सोशल मीडियापासून अंतर ठेवून आहेत. त्यातच अचानक अशा प्रकारची पोस्ट बघून नक्कीच त्यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं असल्याचा अंदाज चाहते लावत आहेत. तूर्तास दोघांनीही या गोष्टीवरती गप्प राहणे पसंत केले आहे.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.