या जिल्ह्यातून निवडणूक आला ‘महाविकासआघाडी’ चा पहिला सरपंच..!

या जिल्ह्यातून निवडणूक आला ‘महाविकासआघाडी’ चा पहिला सरपंच..!

राज्यात सध्या स्थापन झालेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा संयुक्त महाविकासाघाडी हा पक्ष स्थापन करण्यात आला आहे. आणि आता यांनी मिळून निवडणूक लढवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महाविकासाघाडीकडून सरपंच पदासाठी उमेदवार उभा केला होता. आणि तो उमेदवार निवडून देखील आला, चला तर जाणून घेऊया. बीडमध्ये आमदार धनंजय मुंडे यांचे नेतृत्वाखाली सिरसाळा सरपंचपदाची पोटनिवडणूक महाविकास आघाडीच्या उमेदवार ‘आश्रूबाई विश्वनाथ किरवले’ यांनी जिंकली. त्यांनी तब्बल एक हजार 395 मतांनी भाजपा उमेदवाराचा पराभव केला. तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या सरपंच पदासाठी रविवारी पोटनिवडणूक झाली या निवडणुकीत महा विकास आघाडीच्या वतीने आश्रूबाई किरवले यांना उमेदवारी देण्यात आली.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्यामुळे महाविकासआघाडीने हा पहिला प्रयोग करून पाहिला. तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन एकच उमेदवार उभा केला होता. महाविकास आघाडीच्या आश्रूबाई किरवले यांना दोन हजार सातशे पाच मते, तर प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार आशाबाई चोपडे यांना एक हजार तीनशे पाच मते पडली.

वंचित आघाडीच्या रुक्‍मीण किरवले यांना 762 तर अपक्ष उमेदवार इंदूबाई आरगडे यांना 113 मते मिळाली. मतमोजणीनंतर गावातून भव्य मिरवणूक काढून महाविकास आघाडीच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. आमदार मुंडे यांनी नूतन सरपंच आश्रूबाई किरवले यांचे अभिनंदन केले. गावातील सुरळीत पाणीपुरवठा, प्रभागातील रस्ते, नाली, स्वच्छता यासह सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे रामराव किरवले यांनी जाहीर सभेत सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12