‘या’ अभिनेत्रींनी ज्यांच्या आईचा अभिनय केला त्याच कलाकारांसोबत रो’मान्सच्या हद्दी केल्या पार, पहा नंबर ४ च्या अभिनेत्रीने तर कि’स करताना…

‘या’ अभिनेत्रींनी ज्यांच्या आईचा अभिनय केला त्याच कलाकारांसोबत रो’मान्सच्या हद्दी केल्या पार, पहा नंबर ४ च्या अभिनेत्रीने तर कि’स करताना…

बॉलीवूड हे असे क्षेत्र आहे की, येथे काहीही शक्य आहे. बॉलीवूड मध्ये कोणीही कुणासोबत कधीही काम करू शकतो. या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी अनेक जण येत असतात. मात्र, यातील काही जणांनाच यश मिळते, तर काही जण अपयश आल्याने खचून जातात.

बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेता व अभिनेत्री आहेत की, ज्यांनी आधी ज्यांच्या सोबत चित्रपटात आई मुलाच्या नात्याचा रोल केला आहे. त्यानंतर याच अभिनेत्रींनी त्याच अभिनेत्यासोबत रो’मान्स देखील केला आहे. असे कुठले कुठले अभिनेते व अभिनेत्री आहेत, हे आम्ही आपल्याला या लेखामध्ये सांगणार आहोत.

1) राखी, अमिताभ बच्चन- राखी आणि अमिताभ बच्चन ही बॉलिवूडमधील दिग्गज अशी जोडी आहे. या जोडीने अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. हे दोघेही आजही यशस्वी अभिनेता अभिनेत्री म्हणून गणल्या जातात. राखी यांनी अमिताभ यांच्यासोबत शक्ती व लावारिस या चित्रपटात आईची भूमिका साकारली होती. मात्र, त्याच वेळी त्यांनी ‘कसमे वादे’ या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत रोमान्स देखील केला होता. त्यानंतरही या जोडीने अनेक चित्रपटात काम केले आहे.

2) नर्गिस, सुनील दत्त- नर्गिस आणि सुनील दत्त हे त्यांच्या खऱ्या आयुष्यामध्ये पती-पत्नी देखील होते. दोघांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. 1957 मध्ये मदर इंडिया हा चित्रपट आला होता. या चित्रपटामध्ये नर्गिस यांनी आईची भूमिका केली होती. त्यानंतर अनेक चित्रपटात काम करीत त्यांनी 1964 मध्ये आलेल्या यादे या चित्रपटात नर्गिस आणि सुनिल दत्त यांनी रोमान्स केला होता. हा चित्रपट प्रचंड गाजला होता.

3) वहिदा रहमान, अमिताभ बच्चन – वहिदा रहमान आणि अमिताभ बच्चन आज खूप वयस्कर असे अभिनेते आहेत. या दोघांच्या वयामध्ये केवळ चार वर्षांचे अंतर आहे. वहिदा रहमान या अमिताभ यांच्यापेक्षा चार वर्षांनी मोठे आहेत. या दोघांनी 1976 मध्ये आलेल्या आदालत या चित्रपटात रोमा’न्स केला होता. त्यावेळी हा चित्रपट प्रचंड चालला होता. त्याच्या दोन वर्षानंतर म्हणजेच 1978 मध्ये आलेल्या त्रिशूल या चित्रपटात वहिदा रहमान यांनी अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका साकारली होती. हा चित्रपट प्रचंड गाजला होता.

4) शर्मिला टागोर, अमिताभ बच्चन- शर्मिला टागोर आणि अमिताभ बच्चन यांनी देखील खूप चित्रपटात एकत्र काम केले आहे.1975 मध्ये आलेल्या ‘फरार’ या चित्रपटात अमिताभ आणि शर्मिला यांनी रोमान्स केला होता. तर 1978 मध्ये बेशर्म या चित्रपटात दोघांनीही पुन्हा एकदा रोमान्स केला, तर ‘देश प्रेमी’ या चित्रपटात शर्मिला टागोर यांनी अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका साकारली होती.

5) प्रीती झिंटा, हृतिक रोशन- प्रीती झिंटा आणि रितिक रोशन यांनी ‘कोई मिल गया’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटात दोघांनीही रो’मान्स केला आहे. त्यानंतर क्रिश हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात प्रीती झिंटाने तिच्या आईची भूमिका साकारली होती.

6) अनुष्का शेट्टी, प्रभास- अनुष्का शेट्टी आणि प्रभास यांनी बाहुबली या चित्रपटात एकत्र काम केले आहे बाहुबलीच्या पहिल्या भागात अनुष्का शेट्टी आणि प्रभास हे रोमान्स करताना दिसले. तर दुसर्‍या भागामध्ये अनुष्का शेट्टी हिने प्रभास च्या आईची भूमिका म्हणजे देवसेनाची भूमिका साकारली होती.

7) श्रीदेवी, रजनीकांत- श्रीदेवी आणि रजनीकांत ही अतिशय गाजलेली अशी जोडी आहे. श्रीदेवीला पहिल्या महिला सुपरस्टारचा दर्जा मिळाला होता. तर रजनीकांत देखील सुपरस्टार आहेत. या दोघांनी चालबाज या चित्रपटात रोमान्स केला आहे. हा चित्रपट प्रचंड चालला होता. त्यानंतर श्रीदेवी यांनी मंदुरू मुदीचू या चित्रपटात रजनीकांतच्या आईची भूमिका साकारली होती. हा चित्रपट प्रचंड चालला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12