कोणतीही फिल्म नाही, जाहिरात, टीव्ही शो देखील नाही… तरी पण कसा चालतो रेखा चा घरखर्च… वाचून तुम्हीही व्हाल हैराण….

कोणतीही फिल्म नाही, जाहिरात,   टीव्ही शो देखील नाही… तरी पण कसा चालतो रेखा चा घरखर्च… वाचून तुम्हीही व्हाल हैराण….

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रेखा अजूनही वयाच्या 63 व्या वर्षी इतकी सुंदर आहे की तिचे सौंदर्य पाहून प्रेक्षक आश्चर्यचकित झाले आहेत. रेखाने बॉलिवूड कारकिर्दीत काही दशकांपर्यंत हिंदी चित्रपटावर तिची मनमोहक शैली, प्रेम प्रकरण आणि चाहत्यांमध्ये लोकप्रियता यावर राज्य केले. साध्या राहणीमानापासून ते बॉलिवूडची सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री हा रेखाचां प्रवास अजिबात सोपा नव्हता तर खूपच खडतर होता.

रेखाच्या कुटूंबाबद्दल बोलायचे झाले तर रेखा तामिळ अभिनेता जेमिनी गणेशन आणि तेलगू अभिनेत्री पुष्पावल्ली यांची मुलगी आहे. तिच्या वडिलांनी पुष्पावल्लीशी लग्न केले नव्हते. असे म्हणतात की रेखाच्या जन्माच्या वेळी तीच्या आई वडिलांचे लग्न झाले नव्हते. रेखाचे बालपण म्हणजे एक मोठा संघर्ष होता. तीचे वडील जेमिनी गणेशन यांनी कधीही रेखाला त्यांचे नाव दिले नाही. सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रेखाला तिच्या साध्या लूकमुळे व साधी राहणीमान यामुळे अनेकदा चित्रपटात घेण्यास नकार देण्यात आला होता. तिच्या काळ्या रंगामुळे बर्‍याच लोक तिला कुरूप देखील म्हनत असत. आणि त्यामुळे चित्रपटात काम करण्यास देखील नकार देत असत. तथापि, रेखाने हार मानली नाही आणि 1976 मध्ये स्वतःला पूर्णपणे बदलल्यानंतर ‘दो अंजाने’ च्या फिल्म च्या रूपाने रेखाने बॉलिवूडमध्ये मोठा धमाका केला.

रेखाने बॉलिवूडमध्ये जे साध्य केले आहे ते कदाचित कोणी करू शकनार नाही. पण, आज रेखा वर्षानुवर्षे चित्रपटांपासून दूर आहे, म्हणून कदाचित तुमच्या मनात असा प्रश्न पडला असेल की रेखा तिचा घरखर्च कसा सांभाळत असेल. चला तर मग बघुयात रेखा घरखर्च संभळण्यासाठी अस करतेय तरी काय ?

रेखा जर बर्‍याच वर्षांपासून चित्रपटांपासून खरोखर दूर आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात. रेखा एका वर्षात कमीतकमी एका तरी चित्रपटात दिसत असते. रेखाचे लवकरच 2 चित्रपट येणार आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त, रेखा मुंबई आणि दक्षिण भारतात घरे भाड्याने देऊन त्यापासून मिळणारे भाडे देखील तिची कमाई आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की रेखा राज्यसभेच्या सदस्य आहेत. राज्यसभेच्या सदस्याप्रमाणे रेखा यांना पगार देखील मिळतो. याव्यतिरिक्त, रेखाने तिच्या कारकीर्दीत थोडी बचत देखील केली असेल. तसेच रेखा मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने अशा कुटुंबाचे खर्चाचे नियोजन रेखा अगदी सहजपणे करते.

रेखाची जीवनशैली पाहिल्यास तुम्हाला समजेल की तिला अतीशय खर्च करायला आवडत नाही. रेखा नेहमी आवश्यक तेवढे पैसे खर्च करते. तसेच रेखा काही टीव्ही शोमध्ये देखील दिसते. रेखा यांना शोमध्ये हजेरी लावण्यासाठी देखील पैसे दिले जातात. तसेच जेव्हा जेव्हा एखादे मोठे दुकानाचे उधघाटन असते तेव्हा सहसा एखाद्या स्टार ला बोलावले जाते. बहुतेक ठिकाणी रेखा देखील उपस्थित राहते. रेखा यांना बिहार सरकारने काही वर्षांपूर्वी बिहारची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवले होते. रेखाने बर्‍याच उत्तम चित्रपटांमध्ये काम केले होते आणि यशस्वीही झाले होते. रेखा अजूनही देशातील बड्या अभिनेत्रींमध्ये मोजली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12