चला हवा येऊ मधील निलेश साबळेची पत्नी दिसतेय इतकी सुंदर आणि ग्लॅमरस, पहा आहे एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री…

चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम सगळ्यांचा आवडता आहे. केवळ सामान्य लोकांमध्येच नव्हे तर सेलिब्रेटींमध्ये देखील हा कार्यक्रम प्रसिद्ध असून मराठी चित्रपटसृष्टीतीलच नव्हे तर बॉलिवूडमधील अनेकांनी आजवर या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. या कार्यक्रमाद्वारे कुशल बद्रिके, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, निलेश साबळे लोकांचे मनोरंजन करतात.

निलेशचा या कार्यक्रमातील वावर त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडतो. ‘कसे आहात सगळे, हसताय ना… हसायलाच पाहिजे’, असं म्हणत प्रेक्षकांची मोठ्या आपुलकीने विचारपूस करत निलेश साबळे सर्वांच्या भेटीला येतो आणि प्रेक्षकांचे मन जिंकतो. निलेशने महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या कार्यक्रमाचे विजेतेपद त्याने मिळवले होते.

नवरा माझा भवरा या मराठी चित्रपटात देखील त्याने काम केले आहे. पण त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळेच मिळाली. आपलं लेखन, सूत्रसंचालन आणि विनोदवीरांच्या सोबतीने त्याने ‘चला हवा येऊ द्या’ शोला नव्या उंचीवर नेऊन ठेवले.

निलेशच्या अभिनयाचे, त्याच्या सूत्रसंचालनाचे आज अनेक फॅन आहेत. निलेश हा आज अभिनेता असला तरी त्याने डॉक्टरीचे शिक्षण घेतले आहे. तो आयुर्वेदिक डॉक्टर असून त्याने आज अभिनेता, सूत्रसंचालक आणि दिग्दर्शक अशा विविध क्षेत्रात आपले नाव कमावले आहे.

निलेशने आयुर्वेदाची एम एसची पदवी घेतली असली तरी त्याला शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड होती. विविध कलाकारांच्या नकला करण्यात पटाईत असल्याने कॉलेजमध्ये तो प्रसिद्ध होता. शिक्षण घेतल्यानंतर त्याने महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमात भाग घेतला. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.

निलेश आज मोठा स्टार असला तरी तो इतर अभिनेत्यांप्रमाणे सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह नसतो. त्याच्यामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी खूपच कमी जणांना माहिती आहे. निलेशविषयी आम्ही तुम्हाला एक खास गोष्ट सांगणार आहोत.

निलेशचे लग्न झालेले असून त्याच्या पत्नीचे नाव गौरी साबळे आहे. त्यांच्या लग्नाला अनेक वर्षं झालेले असून त्याची पत्नी दिसायला अतिशय सुंदर आहे. निलेशच्या स्ट्रगलिंगच्या काळातही ती खंबीरपणे त्याच्यामागे उभी राहिली होती.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *