साऊथची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री आहे मनीष पांडेची पत्नी, पहा दिसते प्रचंड सुंदर आणि हॉट…

साऊथची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री आहे मनीष पांडेची पत्नी, पहा दिसते प्रचंड सुंदर आणि हॉट…

क्रिकेटपटू आणि अभिनेत्री या दोघांचे नाते खूप जुने आहे. अनेक वर्षांपासून, क्रिकेटपटू आपल्या उत्तम खेळीने, सुंदर अभिनेत्रींना इम्प्रेस करत आले आहेत. आणि अनेक अभिनेत्री देखील, त्यांच्यावर इम्पेस होतात आणि त्या खेळाडूंच्या प्रेमात पडतात. आपण असे अनेक उदाहरण पहिले आहेत. बंगाली ब्युटी शर्मिला टागोर यांचा, त्याकाळात मोठा चाहतावर्ग होता.

अनेक दिग्दर्शक-निर्माते, अभिनेते, मोठाले उद्योगपती त्यांच्यासोबत लग्न करण्याचे स्वप्न बघत होते. मात्र, या सुंदर अभिनेत्रीने, पतौडी खान या क्रिकेटपटूला आपला जीवनसाथी म्हणून निवडले. त्याचबोरबर अनेक क्रिकेटपटूंच्या आणि अभिनेत्रींच्या अफेरच्या चर्चा आपण ऐकल्या आहेत. असं सांगितलं जात की, संगीता बिजलानी आणि सलमान खान यांच्या लग्नाच्या तर पत्रिका देखील आपल्या गेल्या होत्या.

मात्र, तोपर्यंत संगीताला मोहम्मद अझरुद्दीनवर प्रेम झाले होते, आणि म्हणून तिने अझहरुद्दीन सोबतच लग्न केले. गीता बसरा, हेझल खिच, नताशा स्टॅंकोविच या सर्व बॉलीवूड अभिनेत्रींनी क्रिकेटपटू सोबत लग्न केले आहे. प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने देखील भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत लग्न केले आहे.

याच यादीत अजून एका अभिनेत्रींचे नाव आहे, पण ते कदाचित तुम्हाला माहीतच नसेल. भारतीय क्रिकेट संघाचा, तुफान फलंदाज मनीष पांडेची बायकोदेखील एक अभिनेत्री आहे. २०१९ मध्ये मनीष पांडेने, दाक्षिणात्य अभिनेत्री आश्रिता शेट्टी सोबत लग्न केले आहे. आश्रिता साऊथची एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्यांची प्रेमकहाणी देखील खूप जास्त फिल्मी आहे.

मनीष पांडे भारतीय संघाकडून खेळतो, सोबतच आयपीएलमध्ये तो हैद्राबादच्या संघाकडून खेळतो. सन-रायझेस हैद्राबाद या संघाच्या आयोजित पार्टीच्या दरम्यान त्यादोघांची ओळख झाली होती. आश्रिता कमालीची सुंदर दिसते, म्हणूनच तिला बघताच मनीष पांडे तिच्या प्रेमात पडला. त्याने हळूहळू तिच्यासोबत जवळीक वाढवली, आणि २०१९ मध्ये तिच्यासोबत लग्न केले.

अश्रिता शेट्टीने २०१० साली ‘क्लीन अँड क्लियर फ्रेश फेस ब्युटी कॉन्टेस्ट’ जिंकला होता. तिथूनच तिच्या करियरची सुरुवात झाली. टेलिकेदा बोल्ली या टुल्लू सिनेमामधून तिने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. तिने निवडक सिनेमामध्ये काम केले आहे. आणि विशेष म्हणजे तिने ज्या सिनेमांमध्ये काम केले आहे, ते सर्वच अगदी सुपरहिट ठरले. त्यामुळे, साऊथमध्ये तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

उध्याम एनएच४, ओरु कन्नीयुम कालावणीकलूं, इंद्रजिथ यासारख्या सिनेमामध्ये तिने काम केले आहे. आश्रिताने अजून अभिनय क्षेत्रापासून, संन्यास घेतला नाहीये. पण आपल्या नात्यावर लक्ष केंद्रित करत आहे. सोशल मीडियावर आश्रिता कमालीची सक्रिय असते. ती अनेकवेळा, आपले आणि मनीषचे फोटोज शेअर करत असते. तिच्या फोटोंवर लाखो लाईक्स आणि कमेंट्स येतात. क्रिकेट ग्राउंडवर या ब्युटी-क्वीनची केवळ एक झलक बघण्यासाठी चाहते आतुरलेले असतात.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.