अभिनेता गोविंदा सोबत आपण आजपर्यँत काम का केले नाही? यावर काजोलने केला खुलासा…म्हणाली गोविंदा मला….

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री काजोल या दिवसांत नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या ‘त्रिभंगा’ या चित्रपटामुळे बरीच चर्चेत आहे. रेणुका शहाणे लिखित-दिग्दर्शित ‘त्रिभंग’ या सिनेमात एकाच घरातल्या तीन महिलांची कथा आहे.
नयनतारा अनुराधा आणि माशा या तीन पिढ्यांतील तिघींनी त्यांच्या आयुष्यातील आव्हानांचा सामना कसा केला आणि त्याचा त्यांच्या कुटुंबावर झालेला परिणाम, असे या सिनेमाचे ढोबळ स्वरूप असले तरीही या कथेला अनेक पदर आहेत.
ही तिन्ही पात्रे तपशीलवार लिहिलेली असली तरी त्या तिघींचे दुःख आपल्यापर्यंत प्रभावीपणे पोहचत नाही. परिणामी आपण या तिघींचे आयुष्य विलक्षण तटस्थपणे ‘बोल’पटात ऐकत राहतो. चकमकीत आयुष्य जगणाऱ्या या स्त्रियांचा त्यांच्या आयुष्यातील पुरुष आणि परिस्थिती यांच्याबरोबर झालेला झ’गडा आपल्या मनाचा ठाव घेत नाही.
त्यामुळे त्यांच्या अ’डचणी त्यांनी ओढवून घेतल्यासा’ख्या वाटत राहतात. अशी साधारण या चित्रपटाची कहाणी आहे, पण या चित्रपटात काजोलच्या अभिनयामुळे तिची जोरदार प्रशंसा होत आहे. या चित्रपटात तीन म’हिलांची कहाणी दर्शविली आहे.
या चित्रपटात काजोल घ’टस्फो’टीत महिलेची मुलगी आणि बाल अ’त्याचा’रातून पी’डित स्त्रीची भूमिका साकारत आहे. त्याचबरोबर काजोलने या चित्रपटाविषयी दिलेल्या मुलाखतीत तिने आजपर्यंत गोविंदा सोबत का काम केले नाही यावर खुलासा केला आहे.
गोविंदा सोबत कधीच काम का केले नाही यावर काजोल म्हणाली कि ‘आम्ही जंगली’ नावाचा एक चित्रपट सुरू केला होता, तो दिग्दर्शक राहुल रावळे बनवणार होते. तसेच आम्ही या चित्रपटासाठी फोटोशूटही केले पण चित्रपट सुरू होण्यापूर्वीच तो थांबला.
आम्ही फोटोशूट वगळता चित्रपटाचे कोणतेही शूटींग केले नव्हते, परंतु मला असे म्हणायचे आहे की गोविंदा एक उत्कृष्ट अभिनेता आहे तसेच मी नेहमीच असे म्हटले आहे की लोकांना हसविणे खूप कठीण आहे पण गोविंदा त्या गोष्टी चांगल्या प्रकारे करत असतो.
परंतु सध्या गोविंदा कोणत्याही प्रकारचे काम किंवा चित्रपट करताना आपल्याला दिसत नाही आहे, त्यामुळे कदाचित भविष्यात देखील आम्ही एकत्र काम करणे खूप मुश्किल आहे पण कदाचित जर असे शक्य झाले आणि माझ्या नशिबात असेल तर मी नक्कीच गोविंदा सोबत काम करेन असे म्हंटले आहे.
तसेच तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटात अभिनेत्री काजोलनं साकारलेल्या सावित्रीबाईंच्या भूमिकेचं कौतुक झालं. भूमिका छोटीशीच असली, तरी चित्रपटात ती महत्त्वाची होती. नव्वदच्या दशकात अनेक चित्रपट गाजवणारी काजोल, सध्या मोजकंच काम का करते, असं तिला सतत विचारलं जातं.
त्यावर काजोल म्हणाली, ‘सध्या वर्षाला एकच चित्रपट करायचं मी ठरवलं आहे आणि मी तेवढंच काम करू शकते कारण मला देखील माझ्या कुटुंबाकडे लक्ष द्यावे लागते असे काजल म्हणाली. ‘तान्हाजी…’ हा अजयचा शंभरावा चित्रपट आहे. अजयनं यापुढे आणखी शंभर चित्रपट केले, तरी मी माझ्या निर्णयावरच ठाम असेन, असंही काजोल सांगते.