म्हणून चीन देशातील वस्तू मिळतात स्वस्त दरात…. हे आहेत त्यामागील कारणे…पहा

आपल्याला हा एक प्रश्न नेहमीच सतावतो की चीन च्या सर्वच वस्तू इतक्या स्वस्त दरात का मिळतात ? कसे परवडत असेल चीनला इतक्या स्वस्त दरात वस्तू विकून. तर आज आपण ह्या लेखातून बघणार आहोत की चीन ला इतक्या कमी रेट मध्ये वस्तू विकणे कसे पडते फायद्यात.
लोकसंख्येच्या बाबतीत चीन आख्या जगाच्या पुढे आहेत. म्हणून इथे काम करण्यास प्रमाणापेक्षा जास्त च लेबर उपलब्ध होतात. चीनमध्ये कमी खर्चात लेबर उपलब्ध होतात. बाहेर देशात नोकरी करण्याचं प्रमाण चीन मधील लोकांचं कमी आहेत. म्हणून चिनी लोक स्वतःच्या देशातच कमी पैस्यावर सुद्धा कोणतेही काम करण्यास तयार होतात. ह्याचा फायदा प्रोडक्शन कंपनीला होतो आणि वस्तू तयार करायला त्यांना कमी खर्च कमी येतो परिणामी त्यांना वस्तूची किंमत देखील कमी ठेवता येते. कमी किंमत असल्याने बाहेरील देश मोठ्या प्रमाणात चिनी वस्तू आयात करतात.
चीनचा माल स्वस्त असण्याचे असे अनेक कारणे आहेत त्यापैकी हे अजून एक कारण. की त्यांची “इकॉनमी ऑफ स्केल”.
चीन इतर देशातील व्यापार्यांना सुविधा देते कि तुम्ही आमच्या येथील कंपन्यांच्या वस्तू खरेदी करा. त्यात फक्त सुरवातीला पार्ट पेमेंट कराव लागेल , आणि पार्ट पेमेंट केलं की वस्तू देतात. त्या कंपनीला उरलेले पेमेंट हे चीनी बँक करतात. त्यानंतर जेव्हा कंपनीला त्यांचे पैसे व्यापार्याकडून मिळतात तेव्हा ते पैसे बँकेतच परत जमा केले जातात. या सर्व प्रोसेस ला चीनी “ओपेक सब्सिडी ” अस म्हणतात.
अशा प्रकारे ह्या अनेक कारणांमुळे चिनी वस्तू स्वस्त असतात आणि म्हणून जगातील बरेच देश, कंपन्या वस्तू खरेदीसाठी चीनकडे पाहतात.
नखाच्या नेलपेंट पासून ते विमानाचे पार्टस पर्यंत तसेच सेफ्टी पिन ते मोबाईल पर्यंत आख्या जगाच लक्ष चीन च्या स्वतात मिळणाऱ्या मालाकडे असते. अशी कोणतीच वस्तू नाही की जी चीन मध्ये तयार होत नाही. मग त्या वस्तू कितीका हलक्या दर्जा च्या असोत. त्याची भुरळ पडल्याशिवाय राहतच नाही.
चीन च्या वस्तू स्वस्त मिळतात याच कारण असं की चीन मध्ये कॉपीराइट चां रुल च जोपासला जात नाही. कोणत्या एखाद्या देशाने जर एखादी वस्तू तयार केली रे केली की पुढच्या एका दिवसात हुबेहूब वस्तू चीन मदे तयार झालीच पाहिजे. आणि ती पण अल्प खर्चात. म्हणून त्या वस्तूचे दर देखील इतर देशातील वस्तू पेक्षा कमी असतात. दुसऱ्याची कॉपी करण्यात चीनचा हाथ कोणीच धरू शकत नाही. ह्या चीनच्या अश्या स्वभावामुळे अमेरिका आणि चीन दरम्यान बऱ्याचदा वाद देखील झालेले आहेत.
चीन मध्ये तयार होणाऱ्या वस्तू मध्ये कॉलीटी कमी आणि
कॉटीटी जादा असा प्रकार असतो. आणि कॉलीटी नुसार दर देखील अल्प च असतात.
चीनमध्ये भरपूर प्रमाणात मनुष्यबळ असून केवळ मनुष्यबळ भरपूर हेच एक कारण नाही तर तिथं मालं तयार करण्यासाठी लागणारे कच्चे मटेरियल देखील चीन मधूनच उपलब्ध होत असते. त्यासाठी इतर देशांतून आयात करावी लागत नाही. हा एक मोठा फायदा ठरतो चीन साठी अल्पदरात वस्तू विकण्यासाठी.