आयएएस-आयपीएसचा पगार किती असतो, दोघांमध्ये कोण जास्त पावरफूल आहे? जाणून घ्या..

युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (यूपीएससी) परीक्षा देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार ही परीक्षा देतात आणि यशस्वी होण्यासाठी अथक प्रयत्न करतात व स्वप्न पाहतात की त्यांना आयएएस किंवा आयपीएस हे पद मिळेल. अशात आम्ही तुम्हाला आयएएस आणि आयपीएस मधील कोणते पद अधिक शक्तिशाली असते, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया. आयएएस म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवा, ज्याद्वारे आपण नोकरशाहीमध्ये प्रवेश करता. आयएएस परिक्षेमार्फत निवडलेले उमेदवार हे विविध मंत्रालये-विभाग किंवा जिल्ह्यांचे प्रमुख असतात. आयएएस अधिकारी कॅबिनेट सेक्रेटरी हे पद देखील मिळवू शकतात, जे भारतीय नोकरशाहीतील सर्वात मोठे पद आहे.
त्याचबरोबर,आयपीएस अर्थात भारतीय पोलिस सेवेद्वारे आपण पोलिस विभागातील उच्चपदस्थ अधिकारी असतात. यामध्ये ट्रेनी आयपीएस, डीजीपी किंवा इंटेलिजेंस ब्युरोद्वारे सीबीआय चीफपर्यंत चे पद मिळू शकते. यूपीएससी परीक्षा तीन टप्प्यात घेतली जाते ज्यामध्ये, परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे तीन टप्पे असतात.
आयएएस आणि आयपीएसमधील फरक.!
आयएएसकडे ड्रेस कोड नसतो. तो नेहमी फॉर्मल ड्रेसमध्ये असतो, परंतु आयपीएस कर्तव्य बजावत असताना नेहमीच त्यांना ड्रेसकोड घालणे बंधनकारक असते. आयएएससोबत एक किंवा दोन अंगरक्षक नेहमी सोबत असतात पण आयपीएससोबत संपूर्ण पोलिस दल चालते. आयएएस झाल्यावर एक पदक दिले जाते. याउलट, आयपीएस झाल्यावर त्यांना स्वॉर्ड ऑफ ऑनर हा पुरस्कार देण्यात येतो.
आयएएस आणि आयपीएसचे कार्य.
आयएएस अधिकारीचे सार्वजनिक प्रशासन, धोरण तयार करणे आणि अंमलबजावणी करणे असे कार्य असते. म्हणजेच, सरकार बनवित असलेल्या धोरणांची अंमलबजावणी करणे आयएएस अधिकाऱ्याची जबाबदार असते. त्याचवेळी, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि परिसरातील गुन्हेगारी रोखण्याची जबाबदारी आयपीएस अधिकारी बघतो.
प्रशिक्षण कसे असते.
आयएएस आणि आयपीएसचे पहिले तीन महिने प्रशिक्षण लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी अडमिनिस्ट्रेशन (एलबीएसएनएए) येथे आयोजित केले जाते, ज्यास फाउंडेशन कोर्स असेही म्हणतात. त्यानंतर आयपीएस प्रशिक्षणार्थी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमी (एसव्हीपीएनपीए) हैदराबाद येथे पाठवले जातात, जेथे त्यांना पोलिस प्रशिक्षण दिले जाते. आम्ही आधीच सांगितले आहे की, आयएएस प्रशिक्षणात प्रथम क्रमांकावर आलेल्या उमेदवाराला पदक दिले जाते तर आयपीएस प्रशिक्षणात प्रथम क्रमांकावर आलेल्याला ‘स्वर्ड ऑफ ऑनर’ दिले जाते. तुलनात्मक मार्गाने, आयपीएसचे प्रशिक्षण अधिक कठीण असते, यात घोडेस्वारी, परेड, शस्त्रास्त्रांचा समावेश असतो.
यांच्यावर कुणाचे नियंत्रण असते.
आयएएस आणि आयपीएस यांच्यावर कुणाचे नियंत्रण असते हे जाणून घेणे महत्वाचे आहे. आयएएस अधिकाऱ्यांना कार्मिक व प्रशिक्षण विभाग, कार्मिक मंत्रालय, सार्वजनिक तक्रारी व निवृत्ती वेतन नियंत्रित करते. आयपीएस अधिकाऱ्यांना गृह मंत्रालय नियंत्रित करते.
डिपार्टमेंट आणि सैलरी.
आयएएस अधिका्याला सरकारी विभाग आणि अनेक मंत्रालयांत नोकरी दिली जाऊ शकते. त्याचवेळी, आयपीएस अधिकारी पोलिस विभागात कार्यरत असतो. दुसरीकडे जरपगाराबद्दल बोलायचे झाले तर आयएएसचा पगार आयपीएसपेक्षा जास्त असतो. सातव्या वेतन आयोगानंतर आयएएसचा पगार दरमहा, 56,100 ते अडीच लाख रुपये असतो. यासह त्यांना अनेक सुविधादेखील पुरविल्या जातात. त्याचबरोबर आयपीएसचा पगार दरमहा, 56,100 रुपये ते 22,0000 रुपयांपर्यंत असू शकतो. एका भागात एकच आयएएस अधिकारी असतील तर, आयपीएस एकापेक्षा जास्त असू शकतात. रँकबद्दल बोलायचे झाले तर आयएएस सर्वोच्च रँक आहे. आयएएस जिल्ह्याचा डीएम बनतो. त्याचबरोबर एसपी जिल्ह्यात आयपीएस बनतो.
कुणाला जास्त अधिकार असतात.
दोन्ही आयएएस आणि आयपीएस यांचे पद सर्वोच्च असते. दोघेही खूप शक्तिशाली असतात. पण आयएएस डीएम म्हणून जास्त सामर्थ्यवान असतो. त्याचबरोबर आयपीएसकडे फक्त त्याच्या विभागाची जबाबदारी असते. डीएम म्हणून आयएएस अधिकारी हे पोलिस विभाग तसेच इतर विभागांचे प्रमुख असतात.
आयएएसला काही कारणांमुळे आयपीएसपेक्षा अधिक सामर्थ्यवान मानले जाते. पहिले कारण म्हणजे राज्याचे पोलिस महासंचालक (डीजीपी) हे राज्यातील एक शक्तिशाली पोलिस अधिकारी असतात, परंतु त्यांना गृहसचिवांना अहवाल द्यावा लागतो.
दुसरीकडे, सेक्रेटरी पदाचा अधिकारी आयएएस अधिकारी असतो. अशा परिस्थितीत आयपीएस त्यांचा अहवाल आयएएसला देतात. त्याचवेळी सीबीआय, सीआरपीएफ, बीएसएफ सारख्या केंद्रीय पोलिस दलातील प्रमुखांनी आयएएस सचिवांना रिपोर्ट केल्याचे बर्याचदा पाहिले जाते. अशा परिस्थितीत आयपीएसला आयएएस अंतर्गत काम करावे लागते. डीजीपीला गृहसचिवांना अहवाल देणे आवश्यक असते आणि गृहसचिव हे डीजीपीचे मालक नसतात. ते एकमेकांशी समन्वय साधून काम करतात.