वडील केके सिंह यांनी सुशांतच्या संपत्तीचा ठरवला वारस, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

वडील केके सिंह यांनी सुशांतच्या संपत्तीचा ठरवला वारस, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

21 जानेवारी 1986 रोजी बिहारची राजधानी पटना येथे सुशांतचा जन्म झाला. 4 बहिणींमध्ये तो एकटा भाऊ होता. त्यापैकी एक मितू सिंग राज्यस्तरीय क्रिकेटपटू आहे. सुशांतने प्रारंभिक शिक्षण सेंट केर्न्स हायस्कूलमध्ये पूर्ण केले. 2003 साली एआयईईच्या परीक्षेत त्याने संपूर्ण भारतात सातवा क्रमांक मिळविला. त्यानंतर त्याने दिल्ली येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. शिक्षण घेऊन त्यात त्याला करीयर बनवायचे नव्हते. म्हणून शिक्षणाकडे दुर्लक्ष करून तो अभिनय करण्याच्या दिशेने वाटचाल करू लागला.

इंजिनीअरिंगच्या अभ्यासापेक्षा सुशांतला मुंबईच्या चमकदार रोशनाईने मोहित केले. सुशांत हा क्रिकेटप्रेमी देखील होता. सुशांत ला शिक्षणापेक्षा अभिनयाची देखील ओढ जास्त लागली होती. म्हणून सुशांत मुंबईकडे आकर्षित झाला. सुशांत मुंबईला आला तेव्हा त्याच्याकडे फक्त 300 रुपये होते, सुरुवातीचा त्याचा काळ खूपच बिकट परिस्थितीतून जात होता. हळू हळू त्याचे अभिनयावर प्रभावित होऊन त्याला चांगले चांगले काम करायला मिळाले. आणि आज तो काही कोटींची संपत्ती मागे सोडून गेला आहे.

सुशांतसिंग राजपूत एक चांगला अभिनेताच नाही तर एक उत्तम नृत्यांगना आणि टीव्ही होस्ट देखील होता, तो एका चित्रपटासाठी 5 ते 7 कोटी रुपये घेत असे, तर जाहिरातीसाठी 1 कोटी रुपये रक्कम आकारत असत, त्याने अनेक ठिकाणी स्थावर संपत्ती व मालमत्ता घेतली. रियल इस्टेट मालमत्तेत पण त्याने गुंतवणूक केली होती. त्यांची एकूण मालमत्ता 8 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त आहे. त्याच्या ‘एमएस धोनी’ चित्रपटाने सुमारे 220 कोटी कमावले.

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूची चौकशी आता सीबीआय करत आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सुशांतसिंग राजपूत यांचे वडील केके सिंह यांनी याबाबतचे एक निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये त्याने सांगितले की तो सुशांतचा कायदेशीर वारस आहे.

त्यांनी जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये लिहिले आहे की सुशांतने आपल्या आयुष्यातल्या वकील, सीए आणि व्यावसायिकांची सेवा घेतली होती, आता कायदेशीर वारस म्हणून सुशांतच्या मृत्यूनंतर त्यांनी आपली सेवा पूर्ण केली. आता माझ्या संमतीशिवाय कोणताही वकील, सीए किंवा इतर कोणासही सुशांतच्या मालमत्तेचे प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार नाही.

सुशांतचे वडील केके सिंह यांनी लिहिले की, ‘मी आणि माझ्या मुलींनी एसकेव्ही लॉ ऑफिसेस, कमर्शियल वरुण सिंग यांना वकील म्हणून अधिकृत केले आहे हे देखील मी स्पष्ट करतो. तसेच ज्येष्ठ वकील विकास सिंह माझ्या कुटुंबाचे प्रतिनिधित्व करण्यास अधिकृत आहेत. दुसरी व्यक्ती कुटुंबावर दावा करीत आहे, त्यांना माझी संमती नाही.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.