बिग बॉस चे सेट वर सुशांतसिंग प्रमोशनसाठी गेलेनंतर सलमानची प्रतिक्रिया होती पहाण्यासारखी…

बिग बॉस चे सेट वर सुशांतसिंग प्रमोशनसाठी गेलेनंतर सलमानची प्रतिक्रिया होती पहाण्यासारखी…

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील बरेचसे प्रश्न उभे राहीले आहेत. सलमान खान, करण जोहर, आलिया, सैफ अली खान यांना सोशल मीडियत मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातंय. पण आता सलमान खान, करण जोहर, एकता कपूर, संजय लिला भन्साली, साजिद नाडियावाला या पाचजणांवर आता कायदेशीर कारवाईचा बडगा उभारला जाणार आहे. उत्तर प्रदेशच्या जौनपूर येथील न्यायालयात यासंदर्भात खटला दाखल करण्यात आलाय. सुशांत सिंहला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप सलमान, करणसह पाचजणांवर ठेवण्यात आलाय. त्यामुळे यांना न्यायालयीन कार्यवाहीला सामोरे जावे लागणार आहे.

असे असले  तरी सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनानंतर सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाला सुशांत चे चाहत्यांनी लक्ष्य केले आहे. सुशांतचे चाहते आणि सोशल मीडिया युजर्स सलमानसह इतर अनेक कलाकारांना बॉलिवूडमध्ये नातलगांना प्रोत्साहन देण्याच्या कारणावरून दोष देत आहेत.

युजर्सचे म्हणणे आहे की सुशांत बॉलीवूडमधील दुफळीवरून नाराज होता आणि यामुळे त्याने आत्महत्या केली. सतत निषेधानंतर सलमान खानला पुढे यावे लागले आणि ट्विट करुन सर्वांना सुशांतच्या कुटूंबाची साथ देण्यास सांगितले. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात दिसतय की सुशांत आणि सारा बिग बॉस च्या सेट वर पोहचले होते.

सलमान आणि सुशांत यांच्यात वादांकीत गोष्ट अशी काही कधीच नव्हती. यामुळे सलमानचे चाहतेदेखील सलमान आणि सुशांत सोबतचे व्हिडिओ मीडिया वर शेअर करत आहेत. व्हिडिओ आहे जेव्हा सुशांत आणि सारा ‘केदारनाथ’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘बिग बॉस’ च्या सेटवर पोहोचले होते.

बिग बॉसच्या या मालिकेत सलमानने सारा आणि सुशांतसोबत बरीच मस्ती केली होती. हे तिघे एकत्र खेळताना आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसले. सुशांत आणि सलमान यांच्यात बॉन्डिंगही चांगले दिसत होते.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.