चाहत्याच्या ‘या’ अश्लील प्रश्नावर भडकली विद्या बालन, धक्कादायक उत्तर देत म्हणाली मी काय करीना सारखी मुलांना जन्म देणारी…

चाहत्याच्या ‘या’ अश्लील प्रश्नावर भडकली विद्या बालन, धक्कादायक उत्तर देत म्हणाली मी काय करीना सारखी मुलांना जन्म देणारी…

बॉलीवूड मध्ये उत्तर आणि प्रत्युत्तर चे सत्र एकदा सुरु झाले कि थांबत नाही. आपली आवडत्या कलाकारांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच असते. खास करून ती अभिनेत्री असेल तर. जर ती अभिनेत्री सिंगल असेल तर तिचे कोणासोबत नाते तर नाहीये ना, असा प्रश्न तिला विचारला जातो.

तिने जर कोणासोबत नात्याचा स्वीकार केला तर, तुम्ही लग्न कधी करणार, असा प्रश्न तिला विचारला जातो. आणि लग्न झाले कि आता, प्रेग्नन्ट होऊन बाळाला कधी जन्म देणार, असे प्रश्न विचारले जातात. हे केवळ अभिनेत्रींनाच नाही तर देशातील प्रत्येक मुलीला विचारण्यात येणारे प्रश्न आहेत. मात्र अभिनेत्रींच्या बाबतीत हे जरा जास्त आवर्जून विचारले जाते.

अश्या प्रश्नांमध्ये, त्या अभिनेत्रींचे आपले वैयक्तिक आयुष्यच नाही कि काय असे वाटू लागते. म्हणून अश्या प्रश्नांना सामोरे जाताना बऱ्याच वेळा त्यांचा संयम तुटतोच. आपण असं अनेक वेळा पहिले आहे, सेलिब्रिटीज वारंवार त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रश्न विचारण्यात येतात आणि त्यामुळे मुख्य मुद्दा बाजूला राहतो.

अश्या परिस्थिती मध्ये त्यांच्या तोंडून असे काही निघून जाते ज्याची कल्पना देखील कोणी केली नसेल. नुकताच असा एक प्रकार पुन्हा घडला आहे. विद्या बालनलातिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल असेच प्रश्न विचारण्यात येत असताना तिचा संयम तुटला आणि तिने दिलेलं उत्तर ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या.

विद्या बालन, बॉलीवूड मधील एक सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. कोणत्याही गॉडफादर आणि कोणत्याही सपोर्ट शिवाय केवळ आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तिने बॉलीवूडमध्ये आपले नाव कमवले आहे. परिणिता सिनेमामधून पदार्पण करणारी विद्या आपल्या पहिल्याच सिनेमापासून चर्चेचा विषय ठरली.

संजय दत्त, सैफ अली खान सारख्या मोठाल्या अभिनेत्यांसोबत तिने पहिल्याच सिनेमामध्ये अगदी उत्कृष्ट अश्या अभिनयाने सर्वाना वेड लावले होते. मात्र सुरुवातीपासूनच तिचे वजन हा एक मोठा मुद्दा ठरला होता. पण विद्या बालनला हा मुद्दाच वाटत नाही असे तिने खूप वेळा सांगितले आहे. तिचा बिनधास्त आणि बोल्ड अंदाज हे तिच्या व्यक्तिमत्वाचे खास आकर्षण आहे.

तिने प्रसिद्ध बॉलिवूड निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर याच्याशी लग्न केलं. लग्न झाल्यानंतर ती आता सिनेमा मध्ये काम नाही करणार अश्या चर्चा देखील रंगल्या होत्या, मात्र आपला असा कोणताही विचार नसून आपण काम करत राहणार आहे असे विद्याने सुरुवातीलाच सांगितले होते. मात्र तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल खूप कमी माहिती लोकांना आहे.

२०१७ मध्ये वाढत्या वजनामुळे आणि सतत डॉक्टरांकडे जात असल्याचे पाहून विद्या बालन प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यावेळी एका मुलाखतीत विद्यान, ‘लग्न होतं नाही तर लग्न कधी होणार? लग्न झालं की मुलं कधी होणार? असे अनेक प्रश्न एका महिलेला सतत विचारले जातात?’ असं म्हणत विद्याने संताप व्यक्त केला होता.

‘शेरनी’ द्वारे ती लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म वरून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे तिचे मुलाखतीचे सत्र सुरु आहे. त्यातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिला प्रेग्नन्सीवर सातत्यानं विचारन्यात आल. मात्र या प्रश्नावर विद्याचा संयम सुटला आणि ती म्हणाली,’मी मुलांना जन्म देणारं मशीन नाहीये.

लग्नानंतर वाढलेलं वजन आणि अन्य काही कारणांमुळे मी डॉक्टरकडे जात होते. पण याचा अर्थ मी प्रेग्नन्ट आहे असा होत नाही. आपल्या देशात लग्न झालं की मुलं जन्माला घालण्याबाबत अपेक्षांचं ओझं महिलांवर नेहमीच लादलं जातं, हा केवळ मूर्खपणा आहे. जर एखाद्या महिलेनं मुलांना जन्म दिला नाही तर काय बिघडणार आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12