VIDEO :’सेल्फी’ घेण्यासाठी आलेल्या चाहतीनं ‘या’ अभिनेत्रीला केला ‘कि’स’, प्रतिक्रिया देताना अभिनेत्री म्हणाली तुला तर…

VIDEO :’सेल्फी’ घेण्यासाठी आलेल्या चाहतीनं ‘या’ अभिनेत्रीला केला ‘कि’स’, प्रतिक्रिया देताना अभिनेत्री म्हणाली तुला तर…

बिग बॉस या रियालिटी शोमध्ये जेव्हा देखील एखाद्या कलाकाराचे फॅन्स बनतात तेव्हा त्यांचे आपल्या सेलेब्रिटीसाठी प्रेम काही वेगळेच होऊन जाते. ज्या कलाकरांचे सुरुवातीपासूनच फॅन्स आहेत, त्यांचे फॅन्स या शोनंतर दुपटीने वाढतात. मात्र असं चाहत्यांचा प्रेम केले काहीच सेलिब्रिटीजच्या नशिबात येत.

श्वेता तिवारी, प्रिन्स नरूला, शिल्पा शिंदे, हिना खान, रुबिना दिलेक, शहनाज गिल यासारखे काही कलाकार आहेत, ज्यांना बिग बॉसमुळे एक नवीन ओळख मिळाली. त्यांचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. असाच भला मोठा चाहतावर्ग मिळाला बिग बॉसच्या मागच्या वर्षीची कलाकार जस्मिन भसीनला. जस्मिन भसीनने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

जस्मिन भसीन आपल्या पहिल्याच मालिकेपासून चांगलीच चर्चेत राहिली आहे. टशन ए इष्क या मालिकेमधून तिने टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. आपल्याच पहिल्याच मालिकेत तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने काही साऊथच्या सिनेमामध्ये देखील काम केले. मात्र तिला त्यामध्ये हवे तसे यश मिळाले नाही.

त्यामुळे तिने पुन्हा आपला मोर्चा टेलिव्हिजन इंडस्ट्रीकडे वळवला. दिल से दिल तक या मालिकेत तिने अगदी हटके भूमिका साकारली होती. सिद्धार्थ शुक्ला, रश्मी देसाई सोबत तिने देखील या मालिकेत प्रमुख पात्र साकारले होते. तिच्या या भूमिकेला देखील प्रचंड लोकप्रियता मिळाली. खतरों के खिलाडी मध्ये तिने आपला दमदार परफॉर्मन्स दिला.

लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच तिला बिग बॉसच्या शोची ऑफर आली आणि ती स्वीकारली. त्यामध्ये तर तिच्या आणि अली गोणीच्या प्रेम कहाणीला नवे वळण मिळाले. आणि त्या दोघांच्या लोकप्रियतेने नवीन विक्रम नोंदवला. तिला बघण्यासाठी अनेकवेळा चाहते गर्दी करत असलेलं बघायला मिळाले आहे. नुकतंच एका रेस्टोरंटच्या बाहेर जास्मिनला तिच्या एका फॅनने गाठले.

त्या फॅनने तिच्यासोबत सेल्फी काढण्याची विनंती केली. जास्मिनने देखील तिच्यासोबत सेल्फीला होकार दिला. सेल्फी घेत असतानाच, त्या चाहतीने असं काही केलं की, जस्मिन एक क्षण चांगलीच चक्रावली. तिच्या चाहतीने सेल्फी घेत असताना तिला अचानक गालावर किस केला. तिने किस केला आणि जस्मिनला सुखद ध’क्काच बसला. वायरल बयानीने हाच व्हिडियो आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सेल्फी काढता काढता त्या चाहतीने, जास्मिनला किस केलं आणि ती थोडी बुचकळ्यात पडल्याचं या व्हिडियोमध्ये दिसत आहे. आता हाच व्हिडियो सगळीकडेच वायरल होत आहे. जस्मिनच्या वेगवगेळ्या फॅन्सने त्यावर वेगवेगळे कमेंट केले आहे. ‘आमच्या वाहिनीला तू कस काय किस केलं,’ असं अलीच्या फॅन्सने त्यावर कमेंट केलं आहे.

चाहत्यांचे प्रेम सेलेब्रिटींसाठी महत्वाचे असतेच आणि ते त्याचा आदर देखील करतात. मात्र असं काही झालं कि काही वेळ ते कलाकार देखील थक्क होतात. जस्मिन सोबत देखील असच काही झालं आहे. यात खास म्हणजे सर्वच नेटकरी जास्मिनला नाही तर तिचा बॉयफ्रेंड अली गोणी याला या व्हिडियोवर प्रतिक्रिया मागत आहेत.

Vikas

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.