लेक शेर तर आई सव्वाशेर, टायगर श्रॉफची आई ‘आयशा’ यांचा VIDEO पाहून तोंडात बोटं घालाल…

लेक शेर तर आई सव्वाशेर, टायगर श्रॉफची आई ‘आयशा’ यांचा VIDEO पाहून तोंडात बोटं घालाल…

बाप तसा बेटा असे आपण अनेकदा म्हणतो, त्याचा प्रत्ययही आपल्याला भेटतो. मात्र जशी आ’ई तसा मुलगा असे म्हटले तर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. याचे कारण म्हणजे बॉलीवूडमधला प्रसिध्द अक्शन हिरो असणा-या टायगरच्या आ’ईचं व’र्कआऊट पाहुन तुम्ही थक्क होऊन जाल.

बॉलिवूडचा स्टार म्हणून ओळखला जाणारा अभिनेता टायगर श्रॉफ आणि त्याची बहीण कृष्णा श्रॉफ फिटनेसच्या बाबतीत नेहमीच आघाडीवर असतात. मात्र सध्या या दोघांपेक्षा त्यांच्या आईच्या फिटनेसची जोरदार चर्चा आता सुरू आहे आणि त्याला कारण सुद्धा तसेच आहे. तर त्यांच्या स्पर्धेत आता दुसरं तिसरं कोणी नाही तर त्यांची आ’ई आयशा श्रॉफच उतरल्या असून त्यांनी फिटनेसच्या बाबतीत या दोघांनाही मागं टाकलं आहे.

सध्या सोशल मीडियावर आयशा श्रॉफ यांचा एक व्हिडिओ ज’ब’रदस्त व्हा’यरल होत असून त्यात त्या डे’डलिफ्ट करताना दिसत आहेत आणि आपल्याला कदाचित माहित असेल कि हा अतिशय अवघड व्यायाम प्रकार आहे. आयशा श्रॉफ यांच्या या व्हिडिओला आता सोशल मीडियावर जो’रदार पसंती मिळत आहे.

आयशा श्रॉफ यांनी स्वत:च आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात त्या जीममध्ये 95 किलो वजनासह डे’डलिफ्ट करताना आपल्याला दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये त्यांच्यासोबत टायगर श्रॉफसुद्धा दिसत आहे. आयशा श्रॉफ या करतात सोशल मीडियावर खूप अक्टिव्ह असतात.

त्या नेहमी आपला मुलगा टायगर आणि मुलगी कृष्णा यांच्योसोबतचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असतात. त्यांनी पोस्ट केलेल्या फोटो आणि व्हिडिओला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि व्ह्युज मिळतात आणि चाहते सुद्धा आवर्जून त्यांच्या फोटो, व्हिडिओची वाट पाहत असतात.

मुलांप्रमाणेच आयशा स्वतः फिटनेसबाबत किती जागरूक आहेत आणि त्यांना त्याची किती आवड असल्याचं या व्हिडिओवरून दिसून येतं. आईचा एवढा ज’ब’रदस्त व्हिडिओ पाहिल्यानंतर मुलगी कृष्णा आणि अभिनेत्री दिशा पटानीने आश्चर्य व्यक्त केले आहे.

कृष्णानं गंमतीत लिहिले आहे की, शाब्बास मुली, आता मला तुझ्यापर्यत पोहोचण्यासाठी आणखी काही वेगळे करण्याची गरज आहे. दिशानं लिहिलं आहे की, ‘गज़ब की ताक़त’. दरम्यान टायगर श्रॉफचे ‘कॅसानोवा’ हे दुसरं गाणं अलीकडेच युट्यूबवर रिलीज झालं आहे. पहिल्या गाण्याप्रमाणेच त्याच्या या गाण्यालासुद्धा प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे.

टायगर श्रॉफ या आधी ‘बागी’ अ‍ॅक्शन ड्रामाचा तिसरा भाग असलेल्या ‘बागी 3’ चित्रपटात दिसला होता. आता लवकरच तो ‘गणपत’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन ‘सुपर 30’ चित्रपटाचा दिग्दर्शक विकास बहल यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12