“उतरन” मालिकेमधील ही 8 वर्षाची चिमुकली आता दिसतेय इतकी ग्लॅ-मरस आणि सुंदर, पाहून तुम्ही देखील नाही ओळखणार…

मित्रांनो तुम्ही एक टीव्ही सिरीयल उतरण तर पाहिलीच असेल, या सिरीयल मध्ये एका लहान मुलीने ईच्छा हे पात्र साकारले होते. अवघ्या 8 वर्षाच्या या मुलीने एखाद्या समजदार कलाकारा पेक्षाही छान अभिनय केला होता. प्रत्येकजण तिच्या अभिनयाचा चाहता होता. लोकांनी या सिरीयल ला खूपच पसंती दर्शवली होती. ही सिरियल खूपच कमी कालावधीत लोकप्रिय झाली होती. जर तुम्ही या सिरीयल चे चाहते असाल तर हि पोस्ट खास तुमच्यासाठी आहे.
आज आपण ज्या छोट्या मुलीबद्धल जाणून घेणार आहोत तीच खर नाव आहे ‘स्पर्श कंचनदानी’. स्पर्श चा जन्म 3 ऑक्टोबर 2000 मध्ये उत्तराखंड येथे झाला होता. ती एक अनुभवी कथक डान्सर आहे. स्पर्शचे वडील व्यवसायाने एक वकील आहेत त्यामुळे तिला देखील वकील होण्याची खूप इच्छा आहे पण आपण अभिनयच करावा अशी तिच्या आईची इच्छा आहे असे ती सांगते.
स्पर्शने टीव्हीवरील सिरीयल उतरण यात इच्छा ची भूमिका साकारून घराघरात आपली लोकप्रियता पोहोचवली होती. स्पर्श त्या वेळी सिरीयल मध्ये काम करत असताना केवळ आठ वर्षांची होती. पण आता ती अठरा वर्षांची झाली आहे आणि ती खुपच सुंदर दिसत आहे. लहानपणा पासूनच तीला अभिनय करण्याची आवड होती. मोठ्या कलाकाराला लाजवेल असा तिचा या मालिकेतील अभिनय होता.
स्पर्शने साकारलेले इच्छा हे पात्र लोक अजूनही विसरलेले नाही. स्पर्शने यांशिवाय बऱ्याचशा सिरीयल मध्ये काम केलेले आहे ती ‘परवरीश’, ‘सी आय डी’ आणि ‘दिल मिल गये’ यांसारख्या सिरीयल मध्ये दिसली आहे. यांशिवाय ‘जरा नच के दिखा’ या रियालिटी शोमध्ये देखील तिने काम केले आहे. सगळ्याच सीरियल मध्ये तीने छान अभिनय करून चाहत्यांच्या मनात एक चांगली जागा निर्माण केली आहे.
तिने परवरिश ही मालिका सोडल्यानंतर ती ‘विक्रम वेताल’ या मालिकेत दिसली आहे. यात ती भुताचे म्हणजेच ‘टायनी टिंकर वेल’ चे पात्र साकारताना दिसली आहे. स्पर्श ने आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी परवरीश ही मालिका सोडली होती. ती एका वर्षापासून लाईमलाईट पासून दूरच आहे. स्पर्श आता खूपच बदलली आहे. लहानपणी ती सुंदर तर दिसतच होती. पण आता ती पहिल्या पेक्षाही खूपच सुंदर दिसत आहे.
स्पर्शने इंटरनॅशनल चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. ती सध्या टीव्हीपासून जरी दूर असली तरी ती अगदी धडा-केबाज पद्धतीने पुन्हा एन्ट्री करणार आहे हे मात्र नक्की आहे. स्पर्श सोशल मीडियावर देखील खूपच एक्टिव असते. ती तिचे व्हिडिओ फोटो आपल्या चाहत्या पर्यंत पोहोचत असते. चाहते देखील तिच्या पोस्ट ला चांगलाच प्रतिसाद देतात.
आत्ताच झालेल्या एका इंटरव्यू मध्ये स्पर्श ने असे सांगितले होते की ती लवकरच एका टीव्ही सिरीयल च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. शिक्षणामुळे अभिनय करण्यास तीने नकार दिल्याबद्द्ल ही तीने त्यावेळी वक्तव्य केले. स्पर्श कुठल्या सिरीयल च्या माध्यमातून भेटीला येते याची मात्र सर्वांना उत्सुकता आहे. चाहते स्पर्श च्या अभिनयाला बघायला आसुसलेले आहेत.
एका इंटरव्यू मध्ये तिने असे सांगितले की “मला आपल्या वडिलांप्रमाणेच वकील व्हायचे आहे, परंतु माझ्या आईला मला टीव्हीवर पाहताना खूपच आवडते. त्यामुळे मी टीव्हीवर काम करण्यास जास्त प्रोत्साहन देते, मला अनेक ऑफर आल्या होत्या परंतु शिक्षणामुळे मी त्या नाही स्वीकारल्या, परंतु विक्रम वे-ताळ या सिरीयल मध्ये मला महिन्यातून सहा ते सात वेळाच काम करावे लागते त्यामुळे मी हे काम करत आहे.” असे स्पर्शने सांगितले होते.