मानधनात उर्वशीने सलमानला टाकले मागे, तासाभरासाठी घेतलेली रक्कम वाचून आश्चर्य चकित व्हाल.!

नवीन वर्षाची सुरुवात प्रत्येक जण खूप थाटामाटात करत असतो. त्यात काहीजण मोठं मोठ्या पार्ट्यांचे आयोजन करून नवीन वर्षाचे स्वागत करतात. आयोजित केलेल्या या मोठमोठ्या पार्ट्यांमध्ये अनेक बॉलीवूड कलाकार देखील सहभागी होतात. पार्ट्यांमध्ये बॉलिवूड कलाकारांची उपस्थित लोकांमध्ये उत्साह आणि आनंद निर्माण करून जाते. पण तुम्हाला माहिती आहे का? हेच कलाकार एका तासासाठी कोट्यावधी रुपयांचे मानधन घेतात?. नुकताच उर्वशी रौतेला या बॉलिवुड अभिनेत्रीने अशाच एका पार्टीमध्ये एक तासाची हजेरी लावण्यासाठी कोट्यवधी रुपयांचे मानधन घेण्याचे समोर आले आहे.
नवीन वर्षानिमित्त आयोजित केलेल्या एका पार्टीमध्ये बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सहभागी होणार आहे. तिने या पार्टीमध्ये एक तास डान्स करण्यासाठी जवळपास ‘3 कोटी’ रुपये इतके मानधन घेतल्याचे म्हटले जात आहे ती या पार्टीमध्ये ‘डॅडी मम्मी , हसीनो का दिवाना,आणि पगालपत्तीं ‘ या गाण्यांवर डान्स करणार आहे. आतापर्यंत भारतात कोणत्याच कलाकाराने एका तासासाठी इतके मानधन घटलेले नाही. त्यामुळे एक तासासाठी मानधन घेण्याच्या बाबतीत उर्वशी रौतेलाने दंबग खान सलमान खानला देखील मागे टाकले आहे.

काही दिवसांपूर्वी उर्वशी रौतेला पागल्पंती हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिच्यासोबत जॉन इब्राहिम, अनिल कपूर, अर्शद वारसी, कृती खरबंदा, पुलकित सम्राट आणि इलियान डिक्रूज हे कलाकार होते. पण उर्वशीचा हा चित्रपट फारशी कमाई करू शकला नाही. उर्वशी रौतेला लवकरच एका तामिळ चित्रपटात झळकणार आहे.