‘तारक मेहता’मध्ये परतणार जुनी अंजली भाभी? पहा त्यावर नवीन अंजली भाभीने दिली अशी प्रतिक्रिया म्हणाली…

‘तारक मेहता’मध्ये परतणार जुनी अंजली भाभी? पहा त्यावर नवीन अंजली भाभीने दिली अशी प्रतिक्रिया म्हणाली…

छोट्या पडद्यावर गेल्या तेरा वर्षापासून तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका अबाल वृद्धांची चांगलेच मनोरंजन करत आहेत. या मालिकेतील जेठालाल ही भूमिका अतिशय गाजलेली आहे. याचप्रमाणे टप्पू सेना, दयाबेन, चंपकलाल, भिडे गुरुजी यासारख्या भूमिका देखील खूप मोठ्या प्रमाणात गाजलेल्या आहेत.

ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. मात्र, गेल्या काही वर्षापासून या मालिकेतील दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वकानी हिने ही मालिका सोडल्यामध्ये जमा आहे. 2017 मध्ये ग’रोद’रपणाचे कारण देत दिशा वकानी हिने मालिका सोडली होती.

त्यानंतर 2019 मध्ये या मालिकेतील कलाकारांसोबत दिशा हिने एक व्हिडीओ अपलोड केला होता आणि मालिकेत पुन्हा परत येण्याचे संकेत दिले होते. मात्र, असे पुन्हा काही झाली नाही. दयाबेन ही आता मालिकेपासून दूरच आहे. त्यामुळे आता या मालिकेत परतण्याची शक्यता कमीच आहे. या मालिकेत जेठालालची भूमिका देखील खूप मोठ्या प्रमाणात गाजत आहे.

ही भूमिका दिग्गज अभिनेते दिलीप जोशी यांनी साकारली आहे. दिलीप जोशी हे अतिशय उत्कृष्ट असे अभिनेते आहेत. या मालिकेत नटुकाका यांची भूमिका देखील खूप मोठ्या प्रमाणात गाजत आहे. नटू काका यांना देखील आता सध्या काम नाहीये. को’रो’ना म’हामा’रीमुळे या मालिकेचे चित्रीकरण गेल्या काही दिवसांपासून बंद करण्यात आले होते.

मात्र, पुन्हा एकदा चित्रीकरण को’रो’ना म’हामा’रीचे नियम पाळून सुरू करण्यात आल्याचे सांगितले. तरी देखील नटू काका यांच्या पात्राचे चित्रीकरण अजून सुरू झालेले नाही. त्यामुळे ते आता घरातच आहेत. पण नटुकाका यांचे वय जवळपास सत्तर वर्षाच्या वर आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय त्यांना बाहेर अजिबात पडू देत नाहीत.

आता या मालिकेतील नवीन बातमी अजून समोर आली आहे. या मालिकेत अंजली मेहता यांची भूमिका साकारणाऱ्या नेहा मेहता यांनी ही मालिका काही दिवसापूर्वी सोडली होती. आता तिच्या जागेवर अंजली भाभीची भूमिका ही सुनयना फौजदार या साकारत आहेत. त्यावर त्यांनी नुकतीच एका वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे.

याबाबत सुनयना म्हणाली की, आता मला दिग्दर्शकांनी या मालिकेतील पात्रासाठी निवडले आहे. त्यामुळे मी माझ्या भूमिकेला न्याय देईल. काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, नेहा मेहता पुन्हा या मालिकेत काम करण्यास उत्सुक आहे. यावर सुनयना म्हणाल्या की, मला याबाबत काही माहिती नाही.

मालिकेचे निर्माते असित मोदी यांनाच या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो घेऊ शकतात. त्यामुळे नेहा हिने त्यांच्याशी याबाबत बोलावे. त्यामुळे नेहा आता काय भूमिका घेणार हे पाहावे लागेल. एकूणच सुनयना हिच्य पात्रावर देखील तिचे चाहते खूप खुश आहेत.

नेहा आणि सुनयना यांचे ड्रेस कॉस्च्युम हे सर्व सारखेच कसे असते? असा प्रश्न देखील काही चाहत्यांनी विचारला होता. त्यावर सुनयना म्हणाली की, या सर्वांची निवड आमचे क्रिएटीव टीम करत असते. त्यामुळे क्रिएटिव्हिटी टीम काही सांगत असते. तसे आम्ही ड्रेस घालत असतो. त्यामुळे आमचे पात्र दोघांचे सारखेच दिसत असेल, असे ती म्हणाली.

मी कायम प्रवाहासोबत वाहणारी अभिनेत्री आहे. त्यामुळे प्रवाह सोबतच मी जाऊन हा निर्णय घेतला आहे. आता माझी भूमिका सर्वांना आवडत असल्याचे देखील तिने सांगितले. मालिकेतील अंजली भाभी साकारणे खूप अवघड होते, असे देखील ती म्हणाली. तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या 13 वर्षापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेचे जवळपास आजवर 3100 भाग प्रसारित करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12