झी मराठीवरील चाहत्यांची ही लोकप्रिय मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, पहा त्या ऐवजी येणार ‘ही’ नवीन मालिका…

गेल्या वर्षभरात कोरोनाच्या प्रादुर्भावाने टीव्ही क्षेत्रात अनेक चढउतार झालेले पाहायला मिळाले आहेत. काही महिने मालिकांच्या शू-टिंग पूर्णपणे बंद देखील होते. झी मराठीवर देखील अनेक मालिकांमध्ये मोठे फेर बदल झालेले पाहायला मिळाले.
झी मराठीवरील प्रत्येक मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे. यात माझ्या नवऱ्याची बायको, तुझ्यात जीव रंगला, रात्रीस खेळ चाले 2 आणि अग्गंबाई सासूबाई या मालिकांनी अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या पैकी दोन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या निरोप घेणार असल्याची माहिती मिळते आहे.
पण आता झी मराठीवरील या 2 लोकप्रिय मालिका बंद होणार असल्याची माहिती समोर येत आहे. हो कारण नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आता नवीन मालिका येत आहे म्हणल्यावर जुनी एखादी मालिका बंद होणार हे निश्चित आहे.
तर येऊ कशी तशी मी नांदायला या नव्या मालिकेचा प्रोमो सध्या या झी मराठीवर पाहायला मिळत आहे. ही मालिका 4 जानेवारीपासून संध्याकाळी 8 वाजता प्रसारित होणार असल्याचे या प्रोमोमध्ये म्हटले आहे. तर संध्याकाळी 8 वाजता म्हणजे माझ्या नवर्याची बायको या मालिकेची ही वेळ आहे.
तर खरच मग माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका संपणार आहे का, आमच्या टीमने झी मराठीशी संपर्क साधल्यानंतर आम्हला ही बातमी कळली की माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेची वेळ बदलण्यात येणार आहे. तर मग कोणती मालिका संपणार आहे.
तर आपल्या प्रेक्षकांना ऐकून वाईट वाटेल की तुझ्यात जीव रंगला ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. झी मराठीवरील प्रत्येक मालिका या लोकप्रिय होतच असतात. 4 वर्षापूर्वी म्हणजेच 3 ऑक्टोबर 2016 रोजी सुरू झालेली तुझ्यात जीव रंगला ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
या मालिकेला गेल्या 4 वर्षात भरभरून प्रेम मिळाले होते. इतके जास्त काळ चालणाऱ्या क्वचितच कोणत्या तरी मालिका असतात. राणा अंजलीच्या प्रेमापासून सुरू झालेल्या तुझ्यात जीव रंगला या मालिकेने टीआरपी मध्ये सातत्य ठेवले. लॉकडाऊन नंतर मालिका जेंव्हा सुरू झाली तेंव्हा मालिकेत नंदिताच्या पात्रात बदल करण्यात आला.
सध्या मालिकेची शू-टिंग बंद झाली असून मालिका संपली असल्याचे मालिकेतील मंदा ने कमेंट मध्ये सांगितले आहे. झी मराठीवरील आणखीन एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसणार आहे अशी चर्चा होती. 22 ऑगस्ट 2016 रोजी सुरू झालेली माझ्या नवऱ्याची बायको ही सुप्रसिद्ध मालिका.
टीआरपीचे अनेक रेकॉर्ड मोडलेली ही मालिका महाराष्ट्रातील घराघरात पोहचली होती. पण यावर अधिकृतपणे अजूनतरी सांगण्यात आले नाही खरे तर तुझ्यात जीव रंगला मालिका संपून त्यावेळेवर आता माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका पाहयला मिळणार आहे.
राधिका, गुरू, शनाया ही नावे लहान मुलांच्या तोंडी अजूनही राहत आहेत. आता मालिकेत माया व गुरू मोठा प्लॅन करताना दिसत आहेत. त्यांचा प्लॅन कसा फसतो हे पाहणे मनोरंजक ठरेल. तसेच आता येऊ कशी कशी मी नांदायला ही नवी मालिका 4 जानेवारीपासून संध्याकाळी 8 वाजता पाहायला मिळणार आहे.