बॉलिवूडमध्ये काम केलय ह्या महिला आय.पी.एस. अधिकाऱ्यानं, पाहून तुम्हीही कौतुक कराल…

मध्य प्रदेश ह्या राज्यात मागील सोमवारी आय.पी.एस. ह्या पदावरील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. तेव्हा त्या बदल्या होणारा पकी एक नाव अस आहेत की त्या नावाची जास्त प्रमाणात चर्चा झाली होती. तर ते नाव आहे आय.पी.एस. सिमाला प्रसाद. सिमाला प्रसाद ह्यांचं पोलीस विभागात सुध्दा नाव नेहमीच चर्चेत राहते. परंतु यावतिरिक्त सिमला प्रसाद यांचं बॉलिवूडशी ही तितकंच घट्ट कनेक्शन आहेत. तर तुम्ही म्हणाल अस कस. तर हो त्यांची वेगळी पर्सनॅलिटी सुध्दा त्या नेहमीच दाखवतं असतात.
सन 2011 च्या बॅच मधून सिमला प्रसाद यांची आय.पी.एस. ह्या पदावर नेमणूक झाली. यापूर्वी त्या एम. पी. एस. सी परीक्षा मध्ये यशस्वी होऊन सिलेक्ट झाल्या होत्या आणि डी. एस. पी बनल्या होत्या. परंतु त्यांना याहीपेक्षा काहीतरी वेगळं आणि हटके करण्याची इच्छा होती. तो त्यांची जिद्धच होती जणू. त्यासाठी त्यांनी सिव्हील सर्व्हीसेसची तयारी सुरू केली आणि अशाप्रकारे त्या 2011 च्या बॅचमध्ये त्या आय.पी.एस. अधिकारी बनल्या.
आय.ए.एस. अधिकारी आणि खासदार डॉ भागीरथ प्रसाद आणि साहित्यिक मेहरून्निसा परवेज यांची मुलगी सिमाला प्रसाद यांना प्रशासकीय अनुभव आणि अभिनय कला वारसानेच मिळाला आहेत ज्याची छाप त्यांच्या जीवनावरही पडली आहे. आणि त्याचा त्यांनी पुरेपूर फायदा देखील घेतलेला आहेत. त्यांचे शिक्षण चालू असताना शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेत त्या डान्स आणि अॅक्टींगमध्ये भाग घेता घेता त्या कधी सिव्हील सर्व्हीसेसमध्ये गेल्या हे त्यांचं त्यांना देखील समजले नाही.
सिमाला प्रसाद हे व्यक्तिमत्व इतकं हुन्नरी आहेत की पहिल्याच परीक्षेत त्या पी.एस.सी मध्ये सिलेक्ट झाल्या होत्या. त्यांची पहिली पोस्टींग डी.एस.पी. पदी झाली होती. सुरुवातीला त्या रतलाम येथे डी.एस.पी. म्हणून नियुक्त झाल्या. पण त्या इथेच थांबल्या नाही तर त्यांनी पुढे जाऊन अखिल भारतीय प्रशासकीय सेवांच्या तयारीला सुरुवात केली. आणि अशाप्रकारे मेहनतीचे फळ त्यांना मिळाले देखील आणि 2011 मध्ये त्यांची आय.पी.एस. नियुक्ती करण्यात आली.
परंतु त्यांचेकडे या सगळ्यांपेक्षा वेगळी अशी एक कलाही होती. त्यांच्यात एक कलाकार जिवंत होता. म्हणूनच त्यांनी आय. पी. एस. झाल्यानंतर डायरेक्टर जॅगम इमाम यांच्या अलिफ या सिनेमात रोल केला. हा सिनेमा 2016 मध्ये ऑस्ट्रेलियात इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल ऑफ क्वीसलँडमध्ये वर्ल्ड प्रीमीयर म्हणून प्रदर्शित झाला होता आणि 2017 साली हा सिनेमा रिलीज झाला होता.