इंडोनेशियन या हसीनाने “बोले चुडीया” या हिंदी गाण्यावर केला डान्स, करीना बनलेल्या मुलीने जिंकले सर्वाचे मन…

इंडोनेशियन या हसीनाने “बोले चुडीया” या हिंदी गाण्यावर केला डान्स, करीना बनलेल्या मुलीने जिंकले सर्वाचे मन…

आजकाल इंटरनेट हे एक असे साधन बनले आहे जे लोकांना काहीतरी नवीन नवीन नेहमीच दाखवत अाले आहे. या दिवसात सोशल मीडियावर किती व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत हे देखील सांगता येणार नाही. एक व्हिडिओ खूपच विनोदी आहे. त्या व्हिडियो मध्ये अप्रतिम एक नृत्य आहे.

प्रत्येक व्हिडिओचे स्वतःचे खास वैशिष्ट्य असते. असा तो उत्कृष्ट व्हिडिओ जो एका क्षणात तुमचा कंटाळा व आळस दूर करेल. आणि मनःस्थिती देखील आनंदित करेल. वास्तविक, बॉलिवूडची क्रेझ केवळ भारतातच नाही तर जगभरात आहे. परदेशी लोकांना हिंदी चित्रपट आणि गानेही आवडतात.

अशा परिस्थितीत सोशल मीडियावर बॉलिवूडच्या अनेक गाण्यांचे व्हिडीओ आहेत, ज्याचा पुनर्वापर करून त्यात थोडेसे ट्विस्ट लावले जातात. नुकताच असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. या व्हिडिओचे वैशिष्ट्य म्हणजे हा व्हिडिओ भारताबाहेरील दुसऱ्या देशातील आहे परंतु त्यामध्ये गाणारे गाणे हिंदी चित्रपटातून घेतले गेले आहे.

बॉलिवूड फॅन्स नावाच्या एका सोशल मीडिया पेजवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये इंडोनेशियातील लोक “कभी खुशी कभी गम” या हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध गाणे ‘बोले चुडिया बोले कंगना…’ वर नाचताना दिसत आहेत. विशेष गोष्ट अशी आहे की व्हिडिओमध्ये इंडोनेशियन चाहत्यांनी बॉलिवूडचा स्वाद घेण्यासाठी मूळ गाण्याचे प्रत्येक नृत्य व चरण कॉपी केले आहे.

हा व्हिडिओ प्रेक्षकांना खूप आवडला आहे, आत्तापर्यंत कोट्यावधी लोकांनी तो पाहिला आणि शेयर देखील केला आहे. व्हिडिओ इंडोनेशियन चाहत्यांनी बनविला आहे. त्यांच्या यूट्यूब चॅनलचे नावही ‘बॉलिवूड फॅन्स’ आहे. वीणा या इंडोनेशियन मुलीने हा व्हिडिओ शेयर केला आहे जो एक नर्तक आणि प्रसिद्ध यु ट्यूबर आहे.

विशेष म्हणजे व्हिडिओमध्ये दिसणारे सर्व इंडोनेशियन चाहत्यांनी अमिताभ बच्चन, हृतिक रोशन, जया बच्चन, करीना कपूर अशी पात्रं साकारली आहेत. व्हिडिओ शेयर करणारी वीणा यात करीना कपूरच्या भूमिकेत दिसली आहे. तिच्या नृत्याबद्दल पब्लिकमद्ये तीचे खूप कौतुक होत आहे. हा व्हिडिओ पाहून वीणा आणि तिच्या डान्स ग्रुपचे वेडे व्हाल. जर आपला विश्वास नसेल तर आपण स्वतः वरील नावाच्या आय डी वर जाऊन तो व्हिडियो बघू शकता.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *