बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या मागे लागले पाकिस्तान, गुगलवर करतायेत तिला सर्च..

दरवर्षी गुगलकडून सर्वात जास्त सर्च केल्या गेलेल्या व्यक्तींची यादी जाहीर केली जाते. भारतात यावर्षी सर्वात जास्त सर्च केलेल्या व्यक्तींची यादी गुगलने जाहीर केली आहे. या यादीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विराट कोहली नाही तर सर्वात जास्त एअरस्ट्राइकनंतर पाकिस्तानी विमानांनी केलेला हल्ला परतवून लावणाऱ्या विंग कमांडर ‘अभिनंदन वर्धमान’ यांचे नाव भारतातून गुगलवर सर्वाधिक सर्च केले गेले आहे.
आता भरतानंतर पाकिस्थाननेही गुगलवर सर्वाधिक जास्त सर्च केल्या गेलेल्या व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. आणि तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, कारण या यादीत टॉप 10 मध्ये बॉलिवूड अभिनेत्रीने स्थान मिळवले आहे. पाकिस्तानने गुगलवर सर्वात जास्त सारा अली खानला सर्च केलं आहे. त्याचबरोबर साराशिवाय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान आणि भारताचे नागरिकत्त्व स्वीकारलेले गायक अदनान सामी यांना देखील सर्च करण्यात आले आहे.

सेफ अली खानची मुलगी सारा अली खान ने बॉलिवूड मध्ये केदारनाथ या चित्रपटातुन पदार्पण केले होते. यात तिने सुशांत सिंग राजपूतसोबत मुख्य भूमिका केली होती आणि तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली, आणि प्रेक्षकांना ती आवडायला लागली. सारा अली खान सध्या बॉलिवूडमध्ये एकाहून एक हिट चित्रपट देत आहे.

आईवडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत साराने देखील बॉलिवूड मध्ये पदार्पण केले. तिच्या पहिल्याच चित्रपटाने प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद तिला मिळाला त्यानंतर तिने सिम्बा या चित्रपटात केलेल्या भूमिकेचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले. लव्ह आज कल 2 आणि कुली नं 1 या चित्रपटांमध्ये ती लवकरच झळकणार असून तिचे फॅन्स तिच्या या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहात आहेत.