बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रींनी केलंय आपल्यापेक्षा वयाने लहान तरुणांसोबत लग्न, विक्की आणि कॅटरिनामध्ये तर आहे एवढं अंतर..

बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रींनी केलंय आपल्यापेक्षा वयाने लहान तरुणांसोबत लग्न, विक्की आणि कॅटरिनामध्ये तर आहे एवढं अंतर..

असे म्हटले जाते की खऱ्या प्रेमात वय किंवा सौंदर्य पाहिले जात नाहीत. धर्माची अवाढव्य भिंत असो किंवा वयाची मोठी दरी असो, प्रेम हे या सर्वांच्या शीर्षस्थानी जाऊन पोहचलेले असते. विशेषत: बॉलिवूड सेलिब्रिटींचे प्रेम कधीच कोणत्याही बंधनात बांधले जात नाही. आज आपण अशाच आठ अभिनेत्रींबद्दल बोलणार आहोत ज्यांनी आपल्यापेक्षा लहान वयाचे तरुण जीवनसाथी म्हणून निवडले.

१) प्रीती झिंटा :- बॉलिवूडची डिंपल गर्ल प्रिती झिंटाने 1998 साली ‘दिल से’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. लवकरच प्रितीने चित्रपटाच्या जगात स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली होती. 2016 मध्ये प्रीतीचे तिचे अमेरिकन प्रियकर जीन गुडनिफशी लग्न झाले. जीन प्रीतीपेक्षा दोन वर्षांनी लहान आहे.

२) बिपाशा बसू :- बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बसू आपल्या फिटनेसबाबत नेहमीच चर्चेत असते. 2001 मध्ये तिने अजनबी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. बिपाशाने अभिनेता करण सिंह ग्रोव्हरशी 30 एप्रिल 2016 रोजी लग्न केले. पती करण बिपाशापेक्षा जवळपास तीन वर्षांनी लहान आहे.

३) ऐश्वर्या रॉय :- बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक ऐश्वर्या राय बच्चनने 2007 मध्ये अभिषेक बच्चनशी लग्न केले. लग्नाआधी अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोजही केले होते. त्यावेळी या हायप्रोफाईलच्या लग्नाची बरीच चर्चा होती. या दोघांचे वयात देखील अंतर असून ऐश्वर्या अभिषेकपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे.

४) अमृता सिंग :- 80 आणि 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अमृता सिंगने सैफ अली खानशी लग्न केले होते. त्यांच्या दोघांच्या वयात सुमारे 12 वर्षांचा फरक होता. आता दोघांचेही घटस्फोट झाले आहेत. त्याचबरोबर घटस्फोटानंतर सैफने करीना कपूरला तिचा जीवनसाथी म्हणून निवडले. आणि यांचे देखील वयात बराच फरक आहेत.

५) प्रियांका चोप्रा :- माजी मिस वर्ल्ड प्रियंका चोप्राची जगभर चर्चा आहे. 2018 मध्ये तिने तिच्यापेक्षा 10 वर्ष वयाने लहान असलेल्या निक जोनास बरोबर लग्न करून सात फेरे मा-रले होते. प्रियांकालाही यामुळे त्यावेळी ट्रोल केले गेले होते पण तिने कधीही याची काळजी केली नाही.

६) लवकरच विकी कौशल आणि कतरिना कैफ विवाह बंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लागणीची तारीख देखील समोर आली असून स्थळ वगैरे सगळे निश्चित झाले आहे. दरम्यान, कतरिना कैफ 38 वर्षांची आहे तर विकी 33 वर्षांचा. दोघांच्या वयामध्ये 5 वर्षांचे अंतर आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.