चित्रपटातून प्रसिद्ध होताच स्वतःचा साखरपुडा मोडला होता या अभिनेत्रीने, पहा दिसतेय इतकी सुंदर आणि ग्लॅमरस…

चित्रपटातून प्रसिद्ध होताच स्वतःचा साखरपुडा मोडला होता या अभिनेत्रीने, पहा दिसतेय इतकी सुंदर आणि ग्लॅमरस…

आज आपण अशा एका अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत जी प्रामुख्याने दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये दिसली आहे. तिने २०१६ मधील सर्वात यशस्वी व्यावसायिक चित्रपट किरिक पार्टीमध्ये काम केले आहे जो तिचा सर्वात सुपरहिट चित्रपट ठरला. तसेच बेंगळुरू टाईम्सच्या २०१७ मधील फेमस महिलांच्या यादीमध्ये तिने प्रथम स्थान मिळवले आणि अल्पावधीतच टॉलीवूडमधील १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश करणार्‍या अशा मोजक्या अभिनेत्रींपैकी ती एक आहे.

होय, बरोबर ओळखलात आपण रश्मिका मंदाना हिच्या बद्दल बोलत आहोत. रश्मिकाने ‘चलो या’ रोमँटिक नाटकातून तेलगूमध्ये डेब्यू केला होता, आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर हिट ठरला. तसेच तिने रॉमकॉम चित्रपट गीता गोविंदममध्ये भूमिका केली, जी तेलुगू सिनेमाच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणार्‍यांपैकी एक बनली, ज्यामुळे ती रातोरात प्रकाश झोतात आली. काळानुसार रश्मिका मंदानाची कीर्ति वाढत गेली आणि तिला चित्रपटांत भरपूर असे यश मिळत गेले.

रश्मिका मंदानाला कर्नाटकमध्ये “कर्नाटक क्रश” म्हणून संबोधले जाते. रश्मिका ही एक यशस्वी दक्षिण भारतीय अभिनेत्री असल्याचे सिद्ध झाले आहे. जिच्या चित्रपटाने अगदी अल्पावधीतच १०० को-टीं-ची कमाई केली होती. रश्मिका मंदाना ही कन्नड आणि तेलगू चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री ठरली आहे.

२०१६ मध्ये रश्मिका मंडनाला तिच्या पहिल्या चित्रपट “किरीक पार्टी” साठी निवडण्यात आले होते आणि याच वेळी तिची “रक्षित शेट्टी” सोबत ओळख झाली होती, तो तिच्याबरोबर या चित्रपटात अभिनेत्याची भूमिका साकारत होता. या चित्रपटाच्या दरम्यान रश्मिका आणि रक्षित खूपच जवळ आले होते आणि त्यांनी खूप विचार करून शेवटी ३ जुलै २०१७ मध्ये अगदी धुमधडाक्यात साखरपुडा केला. पण रश्मिकाने २०१८ मध्ये रक्षित सोबत ब्रे-कअप केला.

पण एका हाती आलेल्या वृत्तानुसार, रश्मिकाला नुकतीच प्रसिद्धी आणि ओळख मिळायला चालू झाली होती आणि अशा या काळात तिला लग्न करणे योग्य वाटत नव्हते म्हणून अखेर तिने रक्षितसोबत लग्न न करण्याचा निर्णय घेतला. तरी रश्मिका मंदानाच्या आईने या लग्नाला ब्रे-क लावण्याचे आणखी काही कारण असल्याचे सांगितले होते, कारण काही असो काळानुसार ते बाहेर येईलच.

पण सध्या रश्मिका मंदाना ही दक्षिण भारतीय सिनेमातील पैशाची खाण म्हणून ओळखू लागली आहे. कारण ती ज्या चित्रपटात असते तो चित्रपट हिट झाल्याशिवाय राहत नाही. अलीकडेच तिचा महेश बाबूसोबत आलेला ‘सारलेरू निक्केवारू’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला आहे. आगामी येणाऱ्या काळात आपल्याला रश्मिका मंडानाचे अनेक उत्तम चित्रपट पाहायला मिळणार आहेत आणि आता तिला बॉलिवूड मध्ये देखील मागणी वाढत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12