लग्नानंतर करीयर सोडायला लागेलं असे सांगितल्यानंतर रागाने ठरलेलं लग्न मोडले या अभिनेत्रीने, म्हणाली लग्नापेक्षा मी…

लग्नानंतर करीयर सोडायला लागेलं असे सांगितल्यानंतर रागाने ठरलेलं लग्न मोडले या अभिनेत्रीने, म्हणाली लग्नापेक्षा मी…

मित्रांनो बॉलीवुड इंडस्ट्री खूपच अजब इंडस्ट्री आहे तिथे अनेक घटना घडत असतात. बॉलीवूड अभिनेते अभिनेत्री दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेच्या विषयात असतातच. बॉलीवूड मध्ये खूप अशा अभिनेत्री आहेत ज्यांनी लग्न करुन आपला संसार थाटला आहे. अशा ही अभिनेत्री आहेत ज्यांनी लग्नानंतर टीव्ही इंडस्ट्रीला रामराम ठोकला आहे.

आजच्या या लेखातून आपण हे जाणून घेणार आहोत ही अशी एक अभिनेत्री जिने लग्नानंतर करिअर करण्यासाठी स्वतःचा साखरपुडा देखील मोडून टाकला. आम्ही ज्या अभिनेत्री विषयी बोलत आहोत ती अभिनेत्री टीव्ही इंडस्ट्री मधील एक मालिका “कुंडली भाग्य” यामधील अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीचे नाव श्रद्धा आर्य असे आहे.  ‘मैं लक्ष्मी तेरे आंगन की’ आणि ‘कुंडली भाग्य’ यांसारख्या मालिकांतून झळकलेली ही अभिनेत्री आहे.

या मालिकांमध्ये श्रद्धाने आपले पात्र अगदी प्रामाणिकपणे निभावले आहे. या अभिनेत्रीला करियर बनवण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागली होती, तिला या घरा पर्यंत पोहोचायला खूपच स्ट्रगल करावा लागला होता. तिचा हा आजपर्यंतचा प्रवास एका क्षणात मोडून देखील गेला असता. काही कारणामुळे तिला करियर सोडावे लागणार होते.

श्रद्धा चा साखरपुडा 2014 मध्ये खूपच मोठे बिझनेसमेन जयंत रती सोबत ठरला होता. परंतु साखरपुड्या करण्याअगोदरच जयंती ने एक अट टाकली होती श्रद्धा लग्नानंतर आपले करिअर सोडून देईल. परंतु श्रद्धाने ही अट मोडून टाकली आणि आपल्या करिअरला महत्त्व दिले. आपल्या करिअरसाठी तिने आपला ठरलेला साखरपुडा देखील मोडून टाकला होता.

काही दिवसांपूर्वीच श्रद्धा आणि तिचा बॉयफ्रेंड आलम मकार याने ‘नच बलिये’ च्या स्टेजवर श्रद्धाला अंगठी घालून आपला साखरपुडा पार पडला होता. असे सांगितले जाते की श्रद्धा आणि 2006 पासून साऊथ चित्रपटांद्वारे आपल्या चित्रपट सृष्टीचे करिअर सुरू केले होते. त्यानंतर तिला अनेक सिरीयलच्या ऑफर येऊ लागल्या तिने अनेक सिरीयल मध्ये देखील काम केले.

तिने खूपच लोकप्रिय असलेली एक सिरीयल कुंडली भाग्य मध्ये काम करून प्रेक्षकांच्या रसिकांच्या काळजात एक घर तयार केले आहे. तिने या सिरीयल मध्ये केलेला अभिनय खूपच सुंदर आहे. तिने लग्नापेक्षा आपल्या करिअरला महत्त्व दिले हे उचितच केले असावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12