संजय दत्तच्या घरी महिना १५०० रुपयांत काम करायचं ‘हा’ अभिनेता, पहा सुनील दत्तमूळे एका रात्रीत बदलले नशीब..

या बॉलीवूडच्या चंदेरी दुनियेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी कलाकरांना अनेक संघर्षाचा सामना करावा लागतो. आपण अनेक स्टार्स ची संघर्षगाथा ऐकली आहे. कोणी कधी बँकेत काम करत असे, तर कोणी वॉचमन म्हणून काम करत असे. कोणी मॅकेनिक म्हणून तर कोणी सर्व्हिस एजेंट म्हणून असे अनेक काम हे स्टार्स करतात आणि मेहनत जिद्द आणि संघर्ष याच्या जोरावर बॉलीवूड मध्ये आपले स्थान मिळवतात.
मात्र, सर्वांच्याच संघर्षाची कथा समोर येत नाही. अनेकांना, या बॉलीवूडमध्ये कोणी तरी गॉडफादर मिळतात आणि मग त्यांना यश मिळायला सुरुवात होते असे आपण अनेक वेळा ऐकले आहे. तसेच काहीसे या एका अभिनेत्याच्या बाबतीत घडले. सुनील दत्त यांनी गॉडफादर म्हणून त्यांची मदत केली आणि आज तो अभिनेता यशाच्या शिखरावर आहे.
संजय दत्त यांचे वडील आणि बॉलीवूडचे प्रसिद्ध सुपरस्टार सुनील दत्त यांची खूप वेगवेगळ्या प्रकारे आपण ओळख देऊ शकतो. एक उत्तम अभिनेता, एक उत्कृष्ट निर्माता, एक उत्तम समाजसेवक आणि आणि एक मोठा नेता. अश्या प्रत्येक क्षेत्रामध्ये सुनील दत्त यांनी आपली छाप सोडली होती. समाजसेवक म्हूणन त्यांनी खूप कामं केली आहेत.
त्यांच्याकडे कोणीही मदत माघितली तर ते, नक्कीच मदत करत असे. त्यांनी अनेक वेळा गरजूंची मदत केली आहे, त्याचबरोबर बॉलीवूड मध्ये काम मिळवून देण्यासाठी देखील खूप जणांची मदत केली आहे. त्यांच्यामध्ये एक नाव आहे अभिनेता शक्ती कपूर यांचे.
शक्ती कपूर आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगतात, बॉलिवूड मध्ये येण्याचा त्यांचा काही प्लॅनच नव्हता त्यांना सुरुवातीला भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवायचे होते. पण नशिबाने त्यांना अभिनेता बनवले. १९७२ मध्ये रिलीज झालेला जानवर और इन्सान या सिनेमामधून हंसक्ती कपूर यांनी बॉलीवूड मध्ये पदार्पण केले. मात्र कुर्बानी या सिनेमामध्ये त्यांनी साकारलेल्या खलनायकाच्या भूमिकेमधून त्यांना खरी ओळख मिळाली.
सुरुवातीच्या काळात त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. सहाजिकच राहायला जागा नाही,म्हणून सुनील दत्त यांनी आपल्या घरात त्यांना आसरा दिला, असे स्वतः शक्ती कपूर यांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे. सुरुवातीच्या काळात बॉलिवूडमध्ये ते अगदीच नवीन होते आणि म्हणावे तसे काम देखील नव्हते.
मग त्यावेळी सुनील दत्त यांनी आपल्या घरात शक्ती कपूर यांना आसरा दिला त्याचबरोबर वेळोवेळी त्यांचे मनोबल देखील वाढवले. ते मला दरमहा १५०० रुपये देत होते. त्यांच्यासोबत राहून संजय दत्त माझा घनिष्ठ मित्र तर बनलाच मात्र मला सुनील सर यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले, असेही शक्ती सांगतात.
शक्ती कपूर यांचा एक अ’पघात झाला ज्यामध्ये त्यांची फिरोज यांच्यासोबत भेट झाली आणि मग त्यांना कुर्बान सिनेमामध्ये खलनायकाचे पात्र साकारण्याची संधी मिळाली. या पत्रामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि त्यानंतर त्यांनी कधीच माघे वळून नाही पहिले.
गोविंदा असेल किंवा सलमान या दोघांसोबत उत्कृष्ट अशी कॉमेडी करत शक्ती यांनी अनेक सिनेमा मध्ये आपली वेगळी छाप सोडली. आजही पात्र कोणते असले तरीही शक्ती ते अगदी उत्कृष्ट पद्धतीने साकारतात.