लग्नानंतर वर्षभरातच या 10 अभिनेत्यांचा तुटला होता दम, लव्ह मॅरेज असूनही टिकले नाही नाते…

लग्नानंतर वर्षभरातच या 10 अभिनेत्यांचा तुटला होता दम, लव्ह मॅरेज असूनही टिकले नाही नाते…

लग्न हे एक पवित्र बंधन असते. असे म्हटले जाते की लग्नाच्या गाठी ब्रह्मदेवाकडूण बांधल्या जातात. लग्न हे सात जन्मापर्यंतचे बंधन असते. पण बॉलिवूडमध्ये किंवा आपल्या आसपास बघितले तर ही म्हण अगदी साफ चुकीची ठरू शकते. कारण येथे रोज तलाख घटस्फोट सुरूच आहेत. चित्रपट सृष्टीत तर याचा खूपच बोलबाला आहे.

याबाबतच्या अनेक बातम्या सोशलमीडियाद्वारे किंवा मीडियाद्वारे प्रसारित केल्या जातात. बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत ज्यांचे वर्षभर सुद्धा संसार टिकले नाहीत. सगळ्यात हैराण करणारी गोष्ट म्हणजे त्या जोडप्यांची लग्नाअगोदरच प्रेम प्रकरणे होती. आज आम्ही तुम्हाला अशाच जोडप्यांबद्दल माहिती सांगणार आहोत.

एकमेकांबरोबर लग्नाआधी प्रेम प्रकरण केले. मात्र लग्नानंतर एकमेकांबद्दल घृणा निर्माण झाली, आणि त्यांनी घटस्फोट घेतला. तुम्ही हे जाणून हैराण व्हाल की हे कलाकार चित्रपट सृष्टीतील अगदी लोकप्रिय कलाकार आहेत.

पुलकित सम्राट आणि श्वेता रोहिरा :-

‘फुकरे’ या चित्रपटातून आपला अभिनयाचा जलवा दाखवणारा अभिनेता ‘पुलकित सम्राट’ सर्वांना माहीतच असेल. श्वेता रोहिरा बॉलीवूड मधील ऍक्टरेस आहे. पुलकित सम्राट आणि श्वेता रोहिरा यांचे लग्न 2014 साली झाले. पण त्यांचा संसार बारा महिने देखील टिकला नाही.

वर्षभराच्या आतच त्यांनी तलाख घेऊन टाकला, आणि एकमेकांपासून कायमचे वेगळे झाले. लग्नाअगोदर एकमेकांवर प्रचंड प्रेम करणारे हे जोडपे लग्नानंतर मात्र काही काळातच वेगळे झाले.

करण सिंह ग्रोवर आणि श्रद्धा निगम :-

करण सिंह ग्रोवर बॉलीवुड इंडस्ट्री मध्ये खूप लोकप्रिय अभिनेता आहे. तुम्हाला माहिती नसेल पण करण सिंह यांचे तीन लग्न झालेले आहेत. त्याची आत्ताची तिसरी पत्नी बिपाशा बासू ही आहे. या अगोदर त्याने श्रद्धा निगम आणि जेनिफर विंगेट यांच्याशी लग्न केले होते. करण सिंह ग्रोवर यांची पहिली पत्नी श्रद्धा निगम होती.

श्रद्धा निगम एक टीव्ही कलाकार होती. करण सिंह ग्रोवर आणि श्रद्धा निकम यांचे लग्नाअगोदर एकमेकांवर खूप प्रेम होते. पण त्यांचा देखील संसार लग्नाच्या केवळ दहा महिन्यातच तुटला आणि ते एकमेकांपासून वेगळे झाले.

मल्लिका शेरावत आणि करण सिंग गिल :-

मल्लिकाचे बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याअगोदरच लग्न झालेले होते. ही गोष्ट तिने लपवली होती पण तिचे आई-वडील ही गोष्ट जास्त दिवस लपवु शकले नाही. मल्लिका चे लग्न आपला प्रियकर करण सिंग गिल यांच्याशी झाले होते.

तिला लग्नानंतर मॉडेलिंग क्षेत्रात काम करायचे होते. पण तिचा पती करण सिंग याला ते पसंत नव्हते. त्यामुळे त्यांच्या सात जन्माचा संसार देखील बारा महिन्याच्या आतच मोडकळीस आला आणि त्यांनी तलाख घेतला.

सारा खान आणि अली मर्चंट :-

स्टार प्लस वरील विदाई या सिरीयल मधून लोकप्रिय झालेल्या सारा खान चे लग्न अली मर्चंट या तिच्या प्रियकरासोबत 2010 साली झाले होते. तुम्ही ही गोष्ट जाणून हैराण व्हाल कि यांनी बिग बॉसच्या घरातच लग्न केले होते. हे लग्न केवळ पब्लिसिटी करण्यासाठी केले असावे. कारण त्यानंतर ते केवळ दोन महिन्यातच मोडले.

मनिषा कोईराला आणि सम्राट दहल :-

बॉलीवूड मधील एक लोकप्रिय नाव म्हणजे ‘मनिषा कोईराला’. मनीषाने वयाच्या 38 व्या वर्षी सम्राट दहल सोबत लग्न केले. सम्राट हा पेशाने नेपाळी ‘बिझनेस मॅन’ आहे. पण लग्नानंतर त्यांच्यात भांडणे होण्यास सुरुवात झाली. एका वर्षाच्या आतच दोघांनी तलाख घेतला.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.