बॉलिवूडच्या या 6 अभिनेत्रींनी कमी वयातच दिला होता बाळाला जन्म, नंबर 6 च्या अभिनेत्रीने 17 व्या वर्षीच दिला होता जुळ्या मुलांना जन्म…

बॉलिवूडच्या या 6 अभिनेत्रींनी कमी वयातच दिला होता बाळाला जन्म, नंबर 6 च्या अभिनेत्रीने 17 व्या वर्षीच दिला होता जुळ्या मुलांना जन्म…

बॉलिवूड स्टार्सविषयी सांगायचे झाले तर आजच्या काळात सर्व सीतारे 30 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच लग्न करतात. पण एक तो काळ असा होता की बॉलिवूड अभिनेत्री लहान वयातच लग्न करून संसार थाटत होत्या. अशा परिस्थितीत या अभिनेत्री लग्नानंतर लवकरच मातृत्वाची चांगली बातमीही देत होत्या. पण आता तो काळ राहिलेला नाही. एकतर आजच्या काळातील अभिनेत्री लग्न देखील लवकर करत नाही. तसेच लग्नानंतर देखील मुल लवकर होऊ देत नाही.

याचे एक जिवंत उदाहरण म्हणजे अभिनेत्री अनुष्का शर्मा जिने क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीशी लग्न केले. ती नुकतीच गर्भवती झाली आहे. 2017 मध्ये दोघांचे लग्न झाले आणि अलीकडेच त्यांनी त्यांच्या प्रेग्नन्सीची चांगली बातमी सोशल मीडियावर शेअर केली. आजच्या या यादीमध्ये आम्ही तुम्हाला अशा काही अभिनेत्रींविषयी सांगणार आहोत ज्यांचे लवकर लग्न झाले आणि लहान वयातच त्या मुलांच्या माता बनल्या होत्या.

1) नीतू सिंग :- नीतू सिंग, एक काळ असा होता की ही अभिनेत्री बॉक्स ऑफिसवर राज्य करायची. नीतूने बॉलिवूड इंडस्ट्रीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. नीतू सिंगने बॉलिवूडमध्ये बरेच नाव कमावले आणि त्यानंतर तिने अभिनेता ऋषी कपूरशी लग्न केले. वयाच्या 20 व्या वर्षी नीतू सिंगने आपले घर चालविण्यास सुरुवात केली आणि लग्नाच्या दुसर्‍याच वर्षी तिने एका लहान परीला जन्म दिला, जीचे नाव त्यांनी रिद्धिमा ठेवले. मात्र, त्यानंतर तीने दुसरे अपत्य रणबीर कपूरलाही जन्म दिला, जो यावेळी बॉलीवूडचा तरूण स्टार म्हणून उदयास आला आहे.

2) डिंपल कपाडिया :- या बॉलिवूड अभिनेत्रीने आपल्या करिअरची सुरुवात अगदी लहान वयातच केली होती. डिंपल 16 वर्षांची असताना ती सुपरस्टार राजेश खन्नाच्या प्रेमात पडली होती आणि दोघांनी लग्न केले. लग्नानंतर डिंपलने अवघ्या 17 व्या वर्षीच एका मुलीला जन्म दिला जीचे नाव त्यांनी ट्विंकल खन्ना असे ठेवले. ट्विंकल आता अक्षय कुमारची पत्नी असून स्वत: देखील आई बनली आहे.

3) भाग्यश्री :- पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर या अभिनेत्रीचे लग्न झाले आणि लग्नानंतर भाग्यश्रीने दोन मुलांना जन्म दिला. काही काळापूर्वीच भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यूने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांत डेब्यू केला आहे. भाग्यश्रीला सलमान खानच्या चित्रपटाने म्हणजेच ‘मैने प्यार किया’ मधून बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली होती.

4) शर्मिला टागोर :- प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोरने क्रिकेटर नवाब पटौदीशी लग्न केले. शर्मिला टागोर यांनी वयाच्या 25 व्या वर्षी अभिनेता सैफ अली खानला जन्म दिला. शर्मिला एक वेळची सुपरस्टार होती. आजकाल ती बॉलिवूडपासून दूर असली तरीही ती आपल्या कुटूंबासमवेत दर्जेदार वेळ घालवत आहे.

5) जेनेलिया डिसोझा :- वयाच्या 27 व्या वर्षी जेनेलियाने एका मुलाला जन्म दिला. तीने मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखशी लग्न केले आहे. लग्नानंतर लवकरच जेनेलिया आणि रितेशने मुलाला जन्म दिला. दोघांनाही बॉलिवूडमधील क्यूट जोडी म्हणून ओळखले जाते. ही जोडी सर्वांची लाडकी जोडी ठरलेली आहे.

6) उर्वशी ढोलकीया :-

टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री दोन मुलांची आई आहे. ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेत ती कोमोलिकाच्या भूमिकेसाठी अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. असे म्हणतात की उर्वशी ढोलकिया हीचे वयाच्या 16 व्या वर्षी लग्न झाले होते. 1 वर्षानंतर तिने जुळ्या मुलांना जन्म दिला होते. तथापि, मुलांच्या जन्मानंतर तिने आपल्या पतीपासून घटस्फोट घेतला आणि त्यानंतर तिने स्वतःच मुलांना वाढवले व मोठे केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12