पहिल्या पतीला घटस्फोट दीलेनंतर परत कधीच लग्न केले नाही या 4 अभिनेत्रींनी, पहा नंबर 3 ची अभिनेत्री होती सलमानची लव्हर…

तलाक, प्रेम प्रसंग, भांडणे, लग्न या सर्व गोष्टी बॉलीवूडमध्ये दररोज घडत असतात हे सर्व बॉलिवूडला काही नवे नाही. नेहमीच नवीन काहीतरी बातमी येते.

बॉलिवूडमध्ये असे बरेचसे कलाकार आढळतील ज्यांनी एकापाठोपाठ एक असे चार ते पाच लग्न देखील केले आहेत. तर असे काही कलाकार आढळतील ज्यांनी एक लग्न मोडल्यानंतर पुन्हा कधीच लग्न केले नाही. आज आपण अश्याच काही कलाकारां बद्धल बघणार आहोत ज्यांनी पहिले लग्न विस्कटले नंतर परत कधीच लग्नाचा विचार केला नाही.

बॉलीवुड मधील कलाकार लग्न करताना काहीच पाहत नसतात त्यांना ना वयाची काळजी असते ना, रंगाची, ना उंचीची त्यांना फक्त प्रेम होणे हेच महत्त्वाचे असते. हे कलाकार अगदी लहान लहान गोष्टींवरून देखील घरी भांडत असतात त्यामुळे लग्नानंतर काही दिवसातच त्यांच्यामध्ये भांडणे सुरू होतात आणि काही महिन्यातच दोघेही वेगळे होतात.

वेगळे झाल्यानंतर काही जण लग्न करतात तर काहीजण विनालग्न करताच आपले आयुष्य जगत असतात. आजच्या या लेखातून आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्री विषयी सांगणार आहोत ज्यांनी आपल्या पहिल्या पतीकडून तलाख मिळाल्यानंतर दुसरे लग्न केलेच नाही. त्यांनी पुढील आयुष्य एकटेच राहणे पसंत केले. चला तर मग बघुयात बॉलिवूडमधील अशा अभिनेत्री ज्यांनी पहिल्या पतीकडून तलाक मिळाल्यानंतर कधीच लग्न केले नाही.

1) मनिषा कोईराला:

90 च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी मनिषा कोईराला. मनिषा कोईराला ने नेपाळ मधील प्रसिद्ध व्यवसायिक समरता दहल यांच्याशी लग्न केले. मनीषा चा संसार खूप दिवस चालला नाही, मनीषा तलाक घेऊन पुन्हा भारतात आली. आतापर्यंत तिने लग्नाविषयी काहीच विचार केलेला नाही.

2) पूजा भट:

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट ची बहीण असलेली अभिनेत्री नव्वदच्या दशकात खूपच लोकप्रिय अभिनेत्री होती. पूजाने 2003 मध्ये मनीष मखजा सोबत लग्न केले होते. पण लग्नाच्या नऊ वर्षानंतर पूजाने तलाख घेतला. पूजाने त्याला घेतल्यानंतर अजूनही कुणा सोबत लग्न केले नाही.

3) संगीता बीजलानी:

सलमान खानची जुनी प्रेमिका असलेली संगीता बिजलानी ने क्रिकेटर असलेल्या मोहम्मद अजहरुद्दीन सोबत लग्न केले. परंतु लग्नानंतर काही काळातच तिने तलाक घेतला आणि आपला संसार थांबवला. परंतु आपला संसार मोडल्यानंतर तिला नवीन संसार थाटण्याचा काहीही मोह नव्हता. आजही ती बिना लग्नाची असून अजूनही तितकीच सुंदर दिसते.

4) अमृता सिंग:

90 च्या दशकातील सर्वात सुंदर असलेली अभिनेत्री अमृता सिंग ने 1991 मध्ये सैफ अली खान सोबत लग्न केले होते. लग्नानंतर दोघेही दोन मुलांचे आई-वडील बनले. परंतु काही कारणामुळे सैफ अली खानने अमृता सिंग बरोबर तलाक घेतला. त्यानंतर सैफ अली खान ने करीना कपूर सोबत लग्न करून आपला संसार थाटला. सैफला आता एक मुलगा देखील आहे. तर अमृता सिंग अजूनही विना लग्नाची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12