घट-स्फोट न घेताच या 5 अभिनेत्यांनी केला दुसरा विवाह, पहा नंबर 3 च्या अभिनेत्याला पत्नीनेच दिली होती परवानगी…

बॉलीवूड चित्रपट सृष्टी मध्ये तलाक घेणे ही खूपच साधारण गोष्ट होऊन गेली आहे. कोणताही अभिनेता कधीही लग्न करतो आणि कधीही तलाक घेतो त्यांना याचे काहीही बंधन नसते. काहीजण आपले लग्न झाल्यानंतर महिन्याभरातच तलाक घेऊन दुसरे लग्न करतात.

परंतु बॉलिवूडमध्ये असेही काही कलाकार आहेत ज्यांनी आपल्या पहिल्या पत्नीकडून तलाक न घेताच दुसऱ्या पत्नी सोबत लग्न केलेले आहे. आजच्या या लेखांमधून आपण हे पाहणार आहोत की बॉलिवूडमधील असे काही कलाकार ज्यांनी आपल्या पहिल्या पत्नीला न सोडतात दुसऱ्या एका अभिनेत्री सोबत लग्न केले असे काही अभिनेते.

1. धर्मेंद्र :- धर्मेंद्र देओल यांना कोण नाही ओळखत, शोले चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन सोबत आपल्या अभिनयाची जादू पसरवणारे धर्मेंद्र चित्रपट सृष्टीत खूपच लोकप्रिय आहेत. त्यांचे अनेक चित्रपट बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांनी बॉलिवूडमधील अशा वेगवेगळ्या अभिनेत्रींबरोबर काम केलेले आहे.

धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीचे नाव प्रकाश कौर असे होते. परंतु विवाहित असूनही धर्मेंद्र यांना बॉलीवूडची हसीना समजली जाणारी अभिनेत्री हेमा मालिनी वर प्रेम जडले. त्यानंतर धर्मेंद्र यांनी हेमामालिनी सोबत विवाह केला परंतु आपल्या पहिल्या पत्नीला तलाक न देता.

2. राज बब्बर :- राज बब्बर बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी बॉलीवूडच्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव नादिरा असे होते. राज बब्बर यांनी देखील घरात पहिली पत्नी असताना देखील दुसरे लग्न केले होते. त्यांनी दुसरे लग्न एका अभिनेत्री बरोबरच केले आहे त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव स्मिता पाटील असे असून ह्या देखील अनेक चित्रपटांमध्ये पाहिल्या गेल्या आहेत. राज बब्बर यांनी दुसरा विवाह स्मिता पाटील यांच्याशी केला खरा परंतु त्यांनी आपली पहिली पत्नी नादिरा सोबत तलाक घेतला नाही.

3. सलीम खान :- सलीम खान कोण आहेत हे बऱ्याच जणांना माहिती नसेल तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की, बॉलीवूडचे दबंग खान म्हणजे सलमान खान यांचे वडील सलीम खान हे आहेत. सलमान खान यांचे वडील सलीम खान यांनी देखील दुसरे लग्न केले आहे. सलीम खान यांनी आपले पहिले लग्न सलमा यांच्याशी केले होते.

त्यानंतर सलमा यांनी तीन मुलांना जन्म दिला ज्यांचे नाव सलमान, खान अरबाज खान आणि सोहेल खान असे आहे. परंतु अगोदरपासूनच विवाह असलेले सलीम खान यांना अभिनेत्री हेलन हिच्याशी प्रेम झाले आणि सलमा यांची परमिशन घेऊन त्यांनी दुसरा विवाह केला.

4. संजय खान :- संजय खान हे भारतीय चित्रपट सृष्टीतील ॲक्टर डायरेक्टर आणि एक प्रोड्युसर आहेत. त्यांनी बऱ्याच बॉलिवुडच्या चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. त्यांनी दस, लाख एक फुल दो माली, इंतकाम, धुंड या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी एक चित्रपट दिग्दर्शित सुद्धा केला असून त्या चित्रपटाचे नाव चांदी सोना असे आहे.

संजय खान यांनी देखील दोन विवाह केले आहे. संजय खान यांनी आपले पहिले लग्न जरीन कटक यांच्याशी केले होते, परंतु आपल्या पहिल्या लग्नानंतरच त्यांनी बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री झीनत अमीन हिच्याशी लग्न केले. त्यांनी पहिल्या पत्नी सोबत तलाख न घेताच हे दुसरे लग्न केले होते.

5. महेश भट्ट :- महेश भट्ट यांना न ओळखणारा एकही व्यक्ती नसेल कारण सध्या त्यांचाच चर्चा सुरू आहे. अभिनेत्री आलिया भट्ट यांचे पिता असलेले महेश भट्ट यांनी देखील दोन विवाह केलेले आहे. महेश भट्ट यांनी आपले पहिले लग्न हे किरण हिच्याशी केले होते. त्यानंतर महेश भट यांचे नाव अभिनेत्री परवीन बाबी यांच्याशी जोडले जाऊ लागले. परंतु त्यांचे हे प्रेम बरेच दिवस टिकू शकले नाही परंतु काही दिवसानंतरच महेश भट्ट यांनी आपल्या पहिल्या पत्नीला तलाक न देताच दुसरे लग्न सोनी राजदान हिच्याशी केले.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *