बॉलिवुडच्या या अभिनेत्रींना फ्लॉप ठरल्यानंतर कुटुंबीयांनी हाकलले होते घराबाहेर, पहा कोणी मागत आहे भीक तर कोणी करताय चोरी…

बॉलीवुड ची दुनिया एक अजब दुनिया आहे. मुंबईच्या मायानगरी मधील एक वेगळीच दुनिया आहे ती म्हणजेच बॉलीवुड ची दुनिया. जिथे एका चित्रपटामुळे कलाकार रातोरात स्टार होऊन जातात तर एका चित्रपटामुळेच स्टार कलाकार रातोरात फ्लॉप होऊन जातात. म्हणजे अशा कलाकारांना थेट रस्त्यावर यावे लागते. बॉलीवुड इंडस्ट्री बाहेरून जेवढी सुंदर दिसत असते तेवढीच ती आत मधून खतरनाक देखील असते. बॉलीवुड मधील अश्या बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्या सुरुवातीपासूनच फ्लॉप ठरल्या आहेत. तर काही अभिनेत्री सुरुवातीला प्रसिद्ध होऊन नंतर फ्लॉप ठरल्या.
आज आपण अश्याच काही फ्लॉप अभिनेत्री बद्धल बघणार आहोत. जेव्हा मोठ-मोठे स्टार लोकप्रिय चित्रपट देतात तेव्हा लोक त्यांच्या मागेमागे फिरत असतात परंतु जेव्हा या कलाकारांचे स्टारडम जाते तेव्हा त्यांच्याकडे कुणीही डोकून सुद्धा बघत नाही. लोकच नाही तर या कलाकारांना त्यांच्या परिवारा कडून सुद्धा सपोर्ट मिळत नाही. आज आम्ही तुम्हाला अशा कलाकारांविषयी सांगणार आहोत जे कलाकार खूपच मोठे स्टार होते परंतु त्यांचे स्टारडम संपले तेव्हा त्यांचेसोबत नेमके काय घडले.
1) गीता कपूर :- चित्रपट ‘पाकिजा’ मध्ये खूपच महत्वाची भूमिका निभावणाऱ्या गीता कपूरला त्यांचा मुलगा राजा कपूर मुंबईमधील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये सोडून गेला. गीता कपूर ला त्यांचा मुलगा खूपच सतावत होता. गीता कपूर ने स्वतः हे सांगितले की चित्रपट निर्माते अशोक पंडित आणि रमेश तौरानी यांनी तिचा सांभाळ केला. गीता कपूर यांना त्यांनी एका वृद्धाश्रमांमध्ये पोहचवले होते. काही दिवसानंतर गीता कपूर यांचा मृत्यू देखील झाला.
2) मिताली शर्मा :- भोजपुरी चित्रपट सृष्टीतील एक खूप मोठी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिताली शर्मा ला पोलिसांनी लोखंडवाले च्या रस्त्यावरून भीक मागताना आणि चोरी करताना पकडले होते. मिताली घरच्यांना सोडून आपले नशीब आजमावण्यासाठी मुंबईला आली होती, त्यानंतर तिच्या परिवारातील सदस्यांनी तिला सोडूनच दिले. काही चित्रपट आणि मॉडलिंग केल्यानंतर तिला बरेच महिने काहीच काम मिळाले नाही त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली.
3) गीतांजलि नागपाल :- गीतांजलि नागपाल हिने सुष्मिता सेन बरोबर रॅम्पवॉक केला होता. गीतांजली नागपाल हिला ड्र*ग्स ने जखडले होते. यासाठी गीतांजली नागपाल हिने चक्क नोकराणी म्हणून देखील काम केले होते. गीतांजलि नागपाल दिल्लीच्या स्त्यांवरून बर्याचदा पाहिली गेली होती. सुष्मिता सेन सारख्या मोठ्या अभिनेत्रीबरोबर रॅम्पवॉक करणाऱ्या गीतांजली वर खूपच वाईट दिवस आले होते.
4) आलीशा खान :- बऱ्याचदा काही चित्रपटांमध्ये इम्रान हाश्मी बरोबर दिसणारी आलीशा खान आता सध्या ज्या अवस्थेत आहे ते एकूण तुम्ही हैराण होऊन जाल. आलीशा खानला दिल्लीतील ग्रेटर कैलाश मध्ये फिरताना पाहिले गेले होते. अलिशा खान बॉलिवूडमधील ‘माय हजबंड वाइफ’ या चित्रपटांमध्ये पाहण्यात आली आहे.