बॉलिवूड मधील आहेत या सासू सुनाच्या 8 जोड्या, ज्यांचं एकमेकींशी चांगलं जमत, नंबर 8 ची सासू सुनेलाच मानतेय मुलगी…

लग्नानंतर ऐश्वर्या रायचे तिच्या सासू सोबत म्हणजेच जया बच्चन याच्या सोबत खूप चांगले संबंध आहेत. जया नेहमीच ऐश्वर्याची बाजू घेते आणि तिचा बचाव देखील करताना आपण पहिले आहे, कधीकधी ती आपल्या सुनेचे संरक्षण देखील करते. जयाला तिच्या सुनेबद्दल एक शब्दही कोणी वाईट बोलले आवडत नाही. तर आज आपण अशाच बॉलीवूड सासू-सुनांच्या जोड्या पाहणार आहोत.
1) ऐश्वर्या राय – जया बच्चन :- ऐश्वर्या राय-बच्चन अनेकदा आपल्या सासू सोबत म्हणजेच जया सोबत दिसली आहे. ऐश्वर्या आणि तिची सासू जया बच्चन यांचे नाते अनेकदा मीडियामध्ये चर्चेत येते. परंतु या दोघीनी सुद्धा इतरांशीही चांगलीच बाँडिंग शेअर केली आहे.
इतकेच नाही ऐश्वर्याचे जेव्हा अभिषेक बच्चनसोबत लग्न ठरत होते तेव्हा जया बच्चन यांनी सर्वांसमोर ऐश्वर्याची ओळख आपल्या कुटुंबातील एक सदस्य असल्याप्रमाणेच करून दिली होती आणि हे पाहून ऐश्वर्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू देखील तरळले होते. त्यामुळे ऐश्वर्या आणि जया बच्चनसारखा बॉंड प्रत्येक सासू-सुनेच्या नात्यात असला तर सासू-सुनेच्या नात्याबद्दल अगदी पूर्वापारपासून असलेले गैरसमज मोडीत काढायला मदतच होईल.
2) काजोल – वीणा देवगन :- काजोल आणि तिची सासू वीणा देवगन यांच्यात चांगले बंध आहेत. ‘ दिलवाले ‘ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान काजोल बल्गेरियात असताना अजयच्या आईने काजोलची मुले युगा आणि न्यासा या दोघांचीही काळजी घेतली होती. जेव्हा जेव्हा ती शूटिंगमध्ये व्यस्त असते तेव्हा काजोलच्या मुलींची तिची सासूच काळजी घेत असते.
तसेच विना देवगण आपल्या सुनेला म्हणजेच काजोलला अनेक महागडी गिफ्ट सुद्धा देत असते. नुकतेच तिने काजोलला एक फ्लॅट गिफ्ट दिला आहे. तसेच त्या अनेक दोघी अनेक सण देखील एकत्र मिळून साजरे करतात. यावरूनच आपल्याला त्याच्या मध्ये असणारे प्रेम दिसून येईल.
3) राणी मुखर्जी – पामेला चोप्रा :- राणी मुखर्जी म्हणते की, तिची सासू म्हणजेच पामेला चोप्रा आई म्हणून एक खूप छान व्यक्तिमत्व आहे. तसेच ती असे सुद्धा म्हणते की आज आदित्य जे काही आहे , ते त्याच्यामुळेच आहे. आदित्यला ज्या मार्गाने त्यांनी वाढवले आणि प्रेम केले हे आपल्या सगळ्यांना दिसते आहेच. तिने आदित्यला खूप चांगले संस्कार दिले आहेत आणि त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. या दोघीमध्ये सुद्धा प्रेमाचे नाते आहे. अनेक वेळा त्या आपल्याला एकत्र दिसून आल्या आहेत.
4) करीना कपूर – शर्मिला टागोर :- करिना कपूर आणि तिची सासू शर्मिला टागोर याची सुद्धा चांगलीच बॉन्डिंग आहे. त्या दोघीही एकमेकींसाठी यशाचा मार्ग बनून सोबत उभ्या राहतात. प्रत्येक सासू-सुनेने करिना आणि शर्मिलासारखं आई आणि लेकीप्रमाणे नातं जपण्याचा प्रयत्न केला तर वर्षानुवर्षे सासू-सुनेच्या नात्यावर लागलेले चुकीचे आरोप आणि व्याख्या सहज दूर होण्यास मदतच होईल.
कधी काळची सर्वात नावाजलेली अभिनेत्री शर्मिला टागोर आणि बॉलिवूडमधील मोठ मोठ्या कुटुंबांपैकी एक असलेल्या कपूर घराण्याची लेक करिना कपूर या दोघींचा बॅकग्राऊंड जरी लखलखता असला तरीही सासू आणि सुनेचं नातं हे त्या दोघींना त्यांच्या स्वभावाच्या आणि समजूतदारपणाच्या जोरावरच बनवायचं होतं.
5) जूही चावला – सुनैना :- या दोघी मधील चांगलेच जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अनेक कार्यक्रमात देखील त्या आपल्याला एकत्र दिसतात. अनेकदा जुहीने अनेक वेळा आपल्या सासूची तारीफ अनेक शो मध्ये केली आहे. नुकतेच जुहीने आपल्या सासूचा वाढदिवस अगदी धुमधडाक्यात साजरा केला आहे तसेच तिने अनेक गिफ्ट सुद्धा आपल्या सासूला दिली आहेत यावरूनच आपल्याला याच्या मध्ये असणारे प्रेम दिसून येईल.
6) सोनाली बेंद्रे – मधु बहल :- अभिनेत्री सोनाली बेंद्रे एक चांगली सून आहे. ती आपल्या सासूला अत्यंत प्रेमळ वागणूक देते अशा काही सासू- सुनांपैकी ती एक आहे. ती आपल्या सासू मधु बहलला तिची आई मानते आणि बर्याचदा तिच्याबरोबर तिलाही पाहिले गेले आहे. त्या दोघीही एकमेकींसाठी यशाचा मार्ग बनून सोबत उभ्या राहतात.
7) जेनेलिया – वैशाली देशमुख :- रितेश देशमुख यांची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझाचे तिच्या सासूशी जवळचे नाते आहे. ती अनेक खास प्रसंगी आपल्या सासूबरोबर दिसली आहे. बर्याच पार्ट्यांमध्येही जेनेलिया आणि तिची सासू वैशाली देशमुख एकत्र दिसल्या आहेत. तसेच जेनेलिया अनेकदा आपल्या इंस्टाग्राम अकॉउंटवरून अनेक फोटो आपल्या सासू सोबत शेअर करत असते.
8) सोनम कपूर – बीना आहूजा :- सोनम तिच्या सासू बीना आहूजाबद्दल सांगते की, मला माझ्या सासूला आई म्हणायला आवडते. त्यांना दोन मुले आहेत आणि त्या तिसर्या मुलाप्रमाणे माझ्याशी वागतात. त्यांना मुलगी नाही , म्हणून ती म्हणते की त्या माझ्यामध्ये आपली मुलगी पाहतात. तसेच ती म्हणते की प्रत्येकजण माझ्यासारखाचा भाग्यवान असावा.