ह्या बॉलीवुड अभिनेत्रींना विवाह विच्छेदना च्या मोबदल्यात मिळाली होती इतकी मोठी रक्कम

ह्या बॉलीवुड अभिनेत्रींना विवाह विच्छेदना च्या मोबदल्यात मिळाली होती इतकी मोठी रक्कम

लग्नाप्रमाणेच सैफ आणि अमृताच्या घटस्फोटानेही बरीच चर्चा रंगली होती. 13 वर्षाने मोठी असणाऱ्या अमृताशी लग्नानंतर 13 वर्षाने सैफने तिला घटस्फोट दिला. एका मुलाखतीत सैफने सांगितले होते की घटस्फोटादरम्यान पाच कोटींचा पोटगी निश्चित करण्यात आली होती, त्यापैकी त्याने अडीच कोटी रुपये दिले आहेत. तसेच, अमृताला दरमहा 1 लाख रुपये मुलांच्या देखभालीसाठी देतोय. त्याच वेळी मलायका अरोराने अरबाज खानपासून घटस्फोट घेण्याच्या बदल्यात 10 कोटी रुपयांची मागणी केली आणि ती यापेक्षा कमी रक्कम घेण्यास तयार नव्हती. तथापि अरबाज ने 10 करोड ऐवजी 15 करोड दिले होते.

करिश्मा कपूरने लग्नाच्या 11 वर्षानंतर 2016 मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटादरम्यान करिश्मा आणि तिचा बिझनेसमन पती संजय कपूर यांच्यात 14 कोटी रुपयांचा करार झाला होता. या अंतर्गत संजय करिश्माला दरमहा 10 लाख रुपये देतो. हा पैसा त्यांच्या दोन मुलांच्या काळजीपोटी खर्च केला जातो. याशिवाय संजयने करिश्माला बंगलाही दिला.

हृतिक रोशन आणि सुझान खानचा घटस्फोट हा सर्वात महाग घटस्फोट म्हणून मानला जातो. 2000 मध्ये दोघांचे लग्न झाले होते पण 2013 मध्ये अफेअरच्या बातम्यांवरून दोघात खळबळ उडाली होती, त्यानंतर दोघांचे घटस्फोट झाले. असे म्हटले जाते की सुझानने पोटगीच्या रूपात कोट्यावधी रुपयांची मागणी केली होती आणि हृतिकला मोठी रक्कम मोजावी लागली. जेव्हा दोघांचा घटस्फोट झाला होता, तेव्हा सुझानने घटस्फोटाच्या बदल्यात 400 कोटींची मागणी केली होती आणि हृतिकने तिला 380 कोटी रुपये दिले असल्याची बातमीही समोर आली होती. मात्र त्यानंतर हृतिकने ट्विट करुन हे वृत्त नाकारले देखील आहे.

बातमीनुसार फिल्म निर्माता आदित्य चोप्रा यांनी पत्नी पायल खन्ना यांच्यापासून घटस्फोट घेण्यासाठी 50 कोटी रुपये दिले. 2001 मध्ये आदित्य आणि पायलचे लग्न झाले. त्यानंतर दोघे 2009 मध्ये विभक्त झाले.

रिया पिल्लई ही संजय दत्तची दुसरी पत्नी होती. 1998 मध्ये त्यांचे लग्न झाले होते आणि 2005 मध्ये घटस्फोट झाला. भरपाई म्हणून त्याने रियाला किती पैसे दिले याची अधिकृत माहिती नाही. पण मीडिया रिपोर्टनुसार संजयने 4 कोटी रुपये दिले असल्याचे समजते. तसेच, महागडी कार आणि एक सी फेसिंग लक्झरी अपार्टमेंट दिले होते.

प्रभूदेवाने 2011 मध्ये पत्नी रामलताशी घटस्फोट घेतला होता. अहवालानुसार प्रभुदेवाने 20 ते 25 कोटींची मालमत्ता, दोन महागड्या वाहने आणि रामलता यांना 10 लाख रुपये दिले होते. घटस्फोटाच्या सेटलमेंटसाठी हा पैसा होता.

आमिर खानने आपल्या पालकांच्या विरोधात जाऊन 1986 मध्ये रीना दत्ताशी लग्न केले होते, परंतु काही वर्षानंतर दोघांमध्ये दुरावा येऊ लागला. २००२ मध्ये या जोडप्याचां घटस्फोट झाला. आमिरला या घटस्फोटाचा सामना खूपच महागात पडला होता. अहवालानुसार, आमिरने भरपाई म्हणून भरमसाठ रक्कम दिली. मात्र, त्यांनी रीनाला किती रक्कम दिली हे कधीच समोर आले नाही.

फरहान अख्तर आणि त्यांची पत्नी अधुनाच्या 16 वर्षांच्या लग्नाचा ब्रेकडाउनने इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला होता. फरहानपासून घटस्फोटासाठी अधुनाला फक्त पोटगीच मिळाली नाही, तर तिला मुंबई, बँडस्टँडच्या सर्वात महागड्या भागात असलेल्या कोट्यावधीचा बंगलादेखील द्यावा लागला होता.

(सर्व आकडेवारी इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार आहे.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12