श्रीमंत घरातील मुलींशी लग्न करून सर्वात श्रीमंत घरचे जावई बनले हे 6 अभिनेते, 5 नंबरचे नाव ऐकून हैराण व्हाल

आपल्या भारतीय संस्कृतीत नात्यांना खूप महत्त्व दिले जाते. बॉलिवूडमध्येही नाते संबंध चांगले दर्शविले जातात. सूनेबद्धल बोलायच झाल तर सूनेला भारतीय संस्कृतीत खूप महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. भारतीय संस्कृतीत सून घरी आल्यावर तीची मुलीप्रमाणे काळजी घेतली जाते.
येथे जावयाला पण सासरी खूप मोठा मान दिला जातो. जावई पाहुणा म्हणून कधी सासरी गेला तर त्याला कोणतीही कमतरता भासू नये यासाठी खूप प्रयत्न केले जातात. बॉलिवूडबद्दल बोलायचे तर बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत जे सर्वात श्रीमंत कुटुंबातील जावई बनले आहेत. या सर्व कलाकारांनी त्यांच्या आवडीनुसार आपल्या जोडीदाराची निवड केली आणि आज श्रीमंत कुटुंबाचा जावई बनून सुखात जीवन जगत आहे.
हे अभिनेते पूर्वीपेक्षा कमी प्रसिद्ध होते असे नाही. आजच्या लेखामध्ये आपण ज्या अभिनेत्यांबद्धल बोलणार आहोत ते आधीपासूनच खूप प्रसिद्ध आहेत आणि जगभरातील लोक त्यांना ओळखतात. त्यांच्याकडे पैशांची कमतरता नाही. पण श्रीमंत घरांचे जावई झाल्याने त्यांचे आयुष्य अधिक सुखकर आणि चांगले झाले आहे.
या श्रीमंत घराण्यांमध्ये त्याचे नाव जोडल्याने त्याचा अभिमान आणि दर्जा आणखीनच वाढला आहे. आजच्या पोस्टमध्ये आम्ही अशाच काही कलाकारांबद्दल चर्चा करनार आहोत. चला अशाच बॉलिवूड कलाकारांबद्दल जाणून घेऊया जे आज एका धनाढ्य कुटुंबातील जावई आहेत.
अक्षय कुमार :-
या यादीतील पहिले नाव बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार यांचे आहे. राजेश खन्ना हा हिंदी सिनेमाचा पहिला सुपरस्टार मानला जात होता आणि अक्षय कुमार हा त्यांचा जावई आहे. अक्षय ट्विंकलचे 17 जानेवारी 2001 रोजी लग्न झाले होते. आज दोघांनाही बॉलिवूडचे सर्वात आदर्श जोडपे मानले जाते.
धनुष :-
दक्षिणचा सुपरस्टार धनुष हा दक्षिणचा पहिला सर्वात मोठा सुपरस्टार रजनीकांतचा जावई आहे. धनुषने ‘कोलावेरी डी’ हे सॉंग गायल्यानंतर, जगभरातील लोक त्याला ओळखू लागले. त्यानंतर त्याने ‘रांझणा’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याने 2004 मध्ये रजनीकांतची मुलगी ऐश्वर्याशी लग्न केले.
शर्मन जोशी :-
शरमन जोशी हे त्या काळातील प्रसिद्ध खलनायक प्रेम चोप्रा यांचे जावई आहेत. थ्री इडियट्स आणि गोलमाल मध्ये काम केल्यानंतर, त्याचे नाव यशस्वी कलाकारांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. 2000 मध्ये शरमन जोशीने प्रेरणा चोप्राशी लग्न केले.
कुणाल कपूर :-
हे नाव आपल्याला धक्कादायक असू शकते. कुणालने रंग दे बसंतीमध्ये आपल्या चमकदार कामगिरीने सर्वांची मने जिंकली आहेत. लग्नानंतर कुणाल एका मोठ्या कुटूंबाचा जावई झाला आहे. अमिताभ बच्चनचा धाकटा भाऊ अजिताभ बच्चन यांची मुलगी नयना हिच्याशी त्याने लग्न झाले आहे. ते अजिताभ बच्चन यांचे जावई आहेत.
अजय देवगन :-
लोक अजय देवगणला अॅक्शन हिरो म्हणून जास्त ओळखतात. त्याने फक्त अँक्शन च नव्हे तर विनोदी आणि कॉमेडी क्षेत्रातही प्रभुत्व मिळवले आहे. अजय देवगणने 1999 मध्ये काजोलशी लग्न केले आणि ते त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री तनुजाचा जावई झाला. आज ते दोघे बॉलिवूडमध्ये सुपरहिट आहेत.
कुणाल खेमू :-
बालपणात कुणाल खेमूने ‘हम हैं राही प्यार के’, ‘राजा हिंदुस्तानी’, ‘भाई’ आणि ‘जुडवा’ या चित्रपटांत काम केले. पण मोठा झाल्यावर त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. ‘ढोल’, ‘ट्रॅफिक सिग्नल’ आणि ‘धमाल’ या सिनेमांमध्ये त्यांच्या कामाची प्रशंसा झाली आहे. कुणाल खेमूचे पटौंदी कुटुंबातील मुलगी सोहा अली खानशी लग्न झाले आहे.