चित्रपटात म्हाताऱ्या दिसणाऱ्या या अभिनेत्री रियल लाईफ मध्ये दिसतात इतक्या सुंदर, नंबर 2 ची आहे बजरंगी भाईजान मधील मुन्नी ची आ-ई…

क उत्कृष्ट कलाकार त्यालाच म्हणतात, जो मिळेल ती भूमिका करून त्या भूमिकेला सदैव अजरामर करेल. पण फिल्म इंडस्ट्रीत बर्‍याच नायिका अशा देखील आहेत ज्यांनी इमेज कॉन्शस असल्यामुळे काही उत्तम भूमिका देखील नाकारल्या आहेत. तरी, अशा काही नायिका देखील आपल्या इंडस्ट्रीमध्ये आहेत, ज्या स्वतःच्या प्रतिमेचा विचार न करता सर्व प्रकारच्या जो-खीम घेण्यास तयार असतात.

तसेच,मिळेल ती भूमिका करण्यासाठी त्या सदैव तयार असतात. बॉलिवूड चित्रपटांमध्ये आ-ईची भूमिका नेहमीच जास्त महत्त्वाची असते. तथापि, काळानुसार त्या पात्राची प्रतिमा आणि तिचे स्वरूप दोन्ही बदलले आहे. पूर्वीच्या काळात ज्येष्ठ नायिका आ-ईची भूमिका साकारत असत, पण आजच्या काळात यंग आणि तरुण नायिकासुद्धा आ-ईची भूमिका साकारण्यासाठी सज्ज आहेत.

आज आम्ही आपल्याला अशाच तरूण नायिकांची ओळख करून देणार आहोत, ज्यांनी अनेक चित्रपटात आ-ईची भूमिका उत्तम प्रकारे साकारली आहे. वास्तविक, मोठ्या पडद्यावर आ-ईची भूमिका साकारणाऱ्या या नायिका खऱ्या आयुष्यात खूपच स्टाइलिश आणि ग्लॅमरस दिसतात, परंतु अनेक चित्रपटात त्यांनी एका वयोवृद्ध आ-ईची भूमिका साकारली आहे.

1) अर्चना जोइस :- आपल्या सर्वांचा आवडता चित्रपट केजीएफ या चित्रपटात अर्चना जोइसने यशच्या आ-ईची भूमिका साकारली होती. हा चित्रपट वर्ष २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. आपल्याला कदाचित माहित नसेल पण अर्चना खऱ्या आयुष्यात खूपच तरुण आहे. आपण या फोटोमध्ये बघत असाल की ती किती सुंदर आणि मनमोहक दिसत आहे. पण ती लवकरच आता आपल्याला ‘अबचूर’ आणि केजीएफ चॅप्टर २ या चित्रपटांमध्ये आपल्याला दिसणार आहे.

2) मेहर विज :- ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील मुन्नी अर्थातच हर्षाली मल्होत्राच्या आईची भूमिका अभिनेत्री मेहर विज हिने साकारली होती. २२ सप्टेंबर १९८६ रोजी नवी दिल्लीत जन्मलेली मेहर खासगी आयुष्यात विवाहित असल्याचे फार कमी जणांना माहित असेल. ती किती ग्लॅमरस आणि सुंदर आहे हे आपण या फोटोमधून बघू शकतो.

मेहरचे खरे नाव वैशाली सचदेव आहे पण लग्नानंतर तिने आपले नाव मेहर असे ठेवले. वैशालीने ‘बजरंगी भाईजान’ या चितपटासोबतच ‘लकी : नो टाइम फॉर लव’ आणि ‘दिल विल प्यार व्यार’ मध्येही काम केले. तसेच ‘किस देश में है मेरा दिल’ आणि ‘राम मिलाई जोडी’ या टीव्ही मालिकांमध्येही ती झळकली आहे.

3) नादिया :- नादियाने अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारली आहे. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या मिर्ची या चित्रपटात तिने प्रभासच्या आ-ईची भूमिका साकारली होती. पण ती खऱ्या आयुष्यात खूपच सुंदर आणि मनमोहक आहे. तिला या आ-ईच्या रोलसाठी अनेक अवॉर्ड देखील मिळाले होते.

4) राम्या कृष्णन :- बॉलिवूडमधील आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री रम्या कृष्णन ही किती सुंदर आणि तेजस्वी आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. तिने ‘बाहुबली’ चित्रपटात शिवगामी देवीची म्हणजेच प्रभासच्या आ-ईची भूमिका साकारली होती आणि आपल्या सर्वाना माहीतच आहे की ही भूमिका तिने किती योग्यप्रकारे निभावली होती.

अर्थात ती खऱ्या आयुष्यात दिसायला खूपच तरुण आहे आणि ती आता अवघी ४३ वर्षाची आहे. आपल्याला कदाचित माहित नसेल पण तिने आज पर्यंत २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

4) अमृता सुभाष :- अमृता सुभाषने रणवीर सिंग आणि आलिया भट्टच्या ‘गली बॉय’ या चित्रपटात रणवीरच्या आ-ईची भूमिका साकारली होती. मराठी फिल्म इंडस्ट्रीतील ती आज एक नामांकित अभिनेत्री आहे. तसेच ती एक उत्कृष्ट लेखिका, गायिका आणि संगीतकार देखील आहे. तिला अनेक चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की ती किती निरागस आणि मनमोहक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12