‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील आधीची सोनू आठवते का ? आता दिसते इतकी हॉ’ट आणि बो’ल्ड, पहा फोटो….

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेतील जेठा, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, मिस्टर हाथी, पोपटलाल या सगळ्याच व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. या मालिकेला अनेक वर्षं झाले असले तरी या मालिकेची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाहीये.
ही मालिका गेली १० ते १२ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक कालाकरही चर्चेत असतो. आज आपण या मालिकेत बालकलाकार सोनूची भूमिका साकारणाऱ्या झील मेहता विषयी जाणून घेणार आहोत. तसेच झील आता कशी दिसते हे पाहणार आहोत.
गोकुलधामच्या सदस्यांमध्ये एक आहे टप्पू सेना. टप्पू सेना फक्त लहान वयोगटातील प्रेक्षक नाही तर सर्व वयोगटातील प्रेक्षक टप्पू सेनाला चांगल्या पद्धतीने ओळखतात. टप्पू सेनाचे विशेष सदस्य म्हणजेच सोनू भिडे. या भूमिकेला आज पर्यंत सगळ्यांनी खूप प्रेम दिले.
खरंतर सोनू च्या भूमिकेमध्ये आतापर्यंत अनेकांना पाहिले गेले परंतु आज सुद्धा झील मेहता लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. तिच्या भूमिकेने रसिकांवर मोहिनी घातली होती. तिचं कधी निरागस कधी खोडकर असणं रसिकांना चांगलंच भावलं होतं.
तिची ही भूमिका बच्चेकंपनीसह तमाम रसिकांना भावली होती. मालिकेत झिल मेहता उत्तम भूमिका साकारत होती. झीलने या मालिकेत जवळपास 6 वर्षे काम केले. लहानवयातच आपल्या अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी झिल अचानक पडद्यापासून दूर गेली. शिक्षणावर लक्ष केंद्रित करता यावे म्हणून तिने ही मालिका सोडली होती.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेनंतर रसिकांना तिचं दर्शन झालं नाही. अभिनयाच्या क्षेत्रात परतण्याचा झिलचा तूर्तास तरी कोणताही इरादा नाही. सध्या ती तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करत आहे. झिल सध्या एमबीए करत आहे. यापूर्वी तीने बीबीए केले आहे. असेही म्हटले जाते की ती मटरफ्लाय नावाच्या ई-कॉमर्स कंपनीत सोशल मीडिया कार्यकारी म्हणूनही कार्यरत आहे.
सोशल मीडिया वर असते सक्रिय:- झील मेहताला सोशल मीडिया वर सक्रिय राहणे खूप आवडते. ती नेहमी आपले फोटो सुद्धा पोस्ट करत असते. चाहते आज सुद्धा तिला पसंत करतात आणि सातत्याने कार्यक्रमामध्ये येण्याच्या बातमीला शोधत असतात आणि तिची पुन्हा येण्याची वाट पाहत असतात.
पण रिल लाइफमध्ये ज्यारितीने सुंदर दिसतो तितकेच सुंदर आणि लक्षवेधी रिअल लाइफमध्येही दिसावं असा खटाटोप झिलाचा असतो. त्यामुळे आपल्या स्टाईल, फॅशनबाबत ती बरीच सजग असते. इन्स्टाग्रामवर झिलचे बरेच फोटो असून त्यात तिला ओळखणं कठीण आहे. ती आपला बराच वेळ मित्रमैत्रिणींसह घालवते. इन्स्टाग्रामवर तिचे बरेच फॉलोअर्स आहेत.
झिलने मालिका सोडली तेव्हा तिच्या भूमिकेसाठी निधी भानुशालीची वर्णी लागली होती. काही वर्षानंतर तिनेही मालिका सोडली.अभ्यासामुळे हा शो सोडत असल्याचे निधीने सांगितले होते. निधी नंतर या भूमिकेत पलक सिधवानी झळकत आहे.