‘विराट कोहली’सोबत ब्रेकअप झाल्यानंतर ‘या’ पाकिस्तानी किर्केटरच्या प्रेमात वेडी झाली होती तमन्ना ?

एस.एस.राजमौली यांनी दिग्दर्शित केलेला बाहुबली हा चित्रपट प्रचंड गाजला होता. बाहुबलीमध्ये प्रभास, तमन्ना भाटिया,( दुसऱ्या भागात अनुष्का शेट्टी), रम्या यांच्या भूमिका होत्या. या चित्रपटातील कटप्पा यांची भूमिका देखील खूप गाजली होती. त्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग देखील आला होता. बाहुबली द बिगनिंग असे चित्रपटाचे नाव होते.
चित्रपटातील प्रभास याचे काम हे अतिशय दर्जेदार होते. अतिशय देखणे सेट,उत्कृष्ट असे गाणे आणि वेशभूषा यामुळे हा चित्रपट अनेकांच्या लक्षात राहिला. भव्यदिव्य असा सेटमुळे या चित्रपटाला चार चाँद लागले होते. तसेच चित्रपटाचे चित्रीकरण देखील अतिशय उत्कृष्ट होते. बाहुबलीच्या पहिल्या भागामध्ये तमन्ना भाटिया हिने काम केले होते.
तमन्ना भाटियाच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. तिने अतिशय जबरदस्त असे ॲक्शन सीन या चित्रपटात दिले होते. दाक्षिणात्य चित्रपटात तमन्नाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. तिने अनेक चित्रपटात काम केलेले आहे. दाक्षिणात्य चित्रपटात तिला मानधनही अधिक मिळते. बॉलीवूडमध्ये मात्र एवढे मानधन मिळत नाही. दक्षिणमध्ये ती एका चित्रपटासाठी जवळपास 90 लाख ते एक कोटी रुपये आकारते.
तमन्ना भाटिया हिचे नाव अनेक व्यक्तींसोबत जोडले गेलेले आहे. त्यामुळे ती खूप नाराज देखील झाल्याचे पाहायला मिळाले. सगळ्यात आधी तमन्ना भाटिया चे नाव विराट कोहली याच्या सोबत जोडले गेले होते. विराट कोहली आणि तमन्ना भाटिया यांची 2012 मध्ये ओळख झाली होती. याचे कारण म्हणजे एकाच जाहिरातीचे चित्रीकरण या दोघांनी एकत्र मिळून केले होते.
या जाहिरातीनंतर दोघांमध्ये भेटीगाठी वाढत गेल्या आणि दोघेही बाहेर फिरू लागले. त्याच प्रमाणे अनेकदा पार्टी मध्ये देखील विराट कोहली आणि तमन्ना भाटिया यांना एकत्र पाहिल्या गेले. या दोघांच्या अफेअरच्या चर्चा त्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणात होत्या. कारण सोशल मीडियावर देखील या दोघांचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होते. मात्र या दोघांनी याबाबत कधीही खुलासा केला नाही.
विराट कोहली सोबत अफेयर झाल्यानंतर तमन्ना भाटिया हे नाव ब्राझिलियन मॉडेल इसाबेल सोबत जोडले गेले होते. इसाबेल सोबतचे तिचे नाव खूप चर्चिल्या गेले. मात्र, या बाबतही तिने कधीही भाष्य केले नाही. इसाबेल नंतर तमन्ना भाटियाचे नाव अमेरिकेच्या एका डॉक्टर सोबत देखील जोडल्या गेले. या डॉक्टरचे नाव बाहेर आले नाही.
मात्र, तिचे काही काळ त्याच्या सोबत अफेअर असल्याच्या चर्चा होत्या. अलीकडच्या काळामध्ये तमन्ना भाटिया हिचे पाकिस्तानचा क्रिकेटर अब्दुल रझाक याच्या सोबत देखील अफेअर असल्याची चर्चा होती. 2017 मध्ये त्यांचे हे अफेअर असल्याचे सांगण्यात येत होते. तमन्ना भाटिया हिने या बातम्यांना वैतागुन एक पोस्ट लिहिली होती.
माझे नाव अनेकांसोबत कोण सोबत जोडल्या जाते. डॉक्टर झाला की मॉडल, असे हे करणे अतिशय अयोग्य असल्याचे तिने म्हटले होते. ज्या वेळेस मी कोणाच्या प्रेमात पडेल, त्या वेळेस मी माझ्या नात्याची कबुली देईल, असे तिने सांगितले होते. तमन्ना भाटिया हिचा f3 हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.