सुशांत ने गूगल वर सर्च केलेली ही माहिती केस साठी ठरतेय उपयुक्त, या माहितीने रियाच्या अडचणीत पडतेय अशी भर….

सुशांत सिंग राजपूतच्या मृ*त्यू चा तपास सुरू आहे. सुशांतच्या अशा एकाएकी जाण्यामुळे, सुशांत सिंग राजपूत यांचे चाहते दुःखात बुडून गेले आहे. तपासादरम्यान निरनिराळ्या घटना उघडकीस येत आहेत. सुशांत सिंग राजपूत यांचे वडील केके सिंग यांनी पटना मधील, राजीव नगर पोलीस स्टेशन मध्ये रिया चक्रवर्तीच्या विरोधात केस दाखल केली आहे.
तिच्यावर निरनिराळे आरोप लावण्यात आले आहे. सुशांतला जाऊन दीड महिन्याच्या वर कालावधी उलटून गेला आहे. पण नवनवीन चर्चेला उधाण येत आहे. नवनवीन प्रकरणे उघडकीस येत आहेत. सुशांतचे चाहते अगोदर सुशांतच्या एकाएकी जाण्याच्या कारणामागे नेपोटिसमला जबाबदार मानत होते.
पण आता सगळ्यांचा फोकस रिया चक्रवर्ती वर गेला आहे. सुशांत सिंग राजपूत यांच्या परिवाराकडून त्यांचे वकील विकास सिंग हे केस लढतवत आहे. विकास सिंग यांनी गेल्या काही दिवसापासून खूपच हैराण करणाऱ्या गोष्टी समोर ठेवल्या आहेत.
विकास सिंग यांनी सुशांतची एक्स मॅनेजर राहीलेली दिशा सलियान हिच्याविषयी देखील काही सांगितले. विकास सिंग यांनी सांगितले की दिशाच्या मृ*त्यू नंतर सुशांत खूपच परेशान राहत होते. मानसिक रित्या ते खूपच डिस्टर्ब झाले होते.
दिशाच्या जाण्यामुळे घाबरले होते सुशांत सिंग राजपूत :-
सुशांतच्या वकीलांच्या सांगण्यावरून दिशाच्या मृ*त्यू मुळे सुशांत खुपच घाबरुन गेले होते. त्यांना या गोष्टीची भीती होती की रिया त्यांची एक्स मॅनेजर असल्याने त्यांचे नाव देखील या केस मध्ये येऊ शकते. ज्या दिवशी रिया सुशांतच्या घरून निघून गेली होती त्याच दिवशी दिशाच्या मृ*त्यूची बातमी समोर आली होती.
दुसऱ्या दिवशी अशी बातमी आली की सुशांत सिंग राजपूत यांच्या मॅनेजर ने आ*त्म*ह*त्या केली. दिशाच्या मृ*त्यू मुळे घाबरलेल्या सुशांतला वाटले की दिशाच्या मृ*त्यू मागे आपल्यालाच जबाबदार ठरवले जाऊ शकते. त्यामुळे सुशांत परत-परत गुगलवर सर्च करत कि या घटनेमागे त्याचे नाव तर नाही ना लावले गेले.
सुशांत सिंग राजपूत यांचे वडील केके सिंग यांनी रिया विरुद्ध बिहार पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्याबरोबरच बिहार पोलीस मुंबईला आले आणि महत्वाचे कागदपत्र मिळवली. बिहार पोलिसांनी या प्रकरणाविषयी आतापर्यंत चाळीस जणांची विचारपूस केली आहे. रिया अजून विचारपूस करण्याची बाकी आहे.
सुशांतच्या वडिलांनी एफ.आय.आर. मध्ये असे सांगितले की, रियामुळे सुशांत सिंग खूपच परेशान झाले होते. त्यांचे असे म्हणणे आहे की, रिया सुशांत वर पूर्णपणे कंट्रोल ठेवत होती, आणि त्याच्या घरी कोण येत आहे, कोण जात आहे, सुशांत सोबत कोण आणि कधी भेटणार आहे. हे सर्व रियाच ठरवत होती. मात्र रियाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे.
पण या केसचा तपास अजून बाकी आहे. निरनिराळे वळणे या केसला येत आहेत. नेपोटीसम पासून सुरू झालेले हे प्रकरण आता रिया चक्रवर्ती पर्यंत येऊन पोहोचले आहे. यादरम्यान बॉलिवूडमध्ये एक वेगळ्याच प्रकारचे यु*द्ध सुरू झाल्याचे वाटत आहे. सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यू मागे नेमके कोण जबाबदार आहे. याबाबत पोलिस कसून चौकशी करत आहे.