खर तर काय नव्हत सुशांत कडे ? रुप, पैसा, प्रसिध्दी… पण अस काय झालं की संपवावे लागले जीवन..वाचा

खर तर काय नव्हत सुशांत कडे ? रुप, पैसा, प्रसिध्दी… पण अस काय झालं की संपवावे लागले जीवन..वाचा

सुशांतच्या आत्महत्येने एक गोष्ट अधोरेखित होते. ती म्हणजे माणूस सोशली कितीही आनंदी, सकारात्मक, उत्साही वाटत असला तरी त्याचे मन दु:खाने कुरतडलेले असू शकते..

खर तर काय नव्हते सुशांतकडे? रूप, पैसा, प्रसिध्दी.. एखादा सामान्य माणूस ज्यासाठी आयुष्यभर खपतो ते सर्वकाही..

पण तरीही कोणती तरी सल नक्कीच असेल त्याच्या मनात.. जी खोलवर रूतली असेल.. तीच सल सुशांतला या पातळीला घेऊन गेली असेल..!!

असे बरेच सल बऱ्याच मनांना जखमी करतायत हल्ली.. बरीच दु:खाने खंगलेली माणसे आपल्या आजूबाजूला सुखाचे मुखवटे घालून फिरतायत.. अशांना समजून घेणे आणि बोलते करणे महत्वाचे असते..

दु:खाचे कड आतल्या आत पिणाऱ्यांनो.. प्लिज तुमच्या मनाजवळच्या व्यक्तीजवळ मन मोकळे करत जा. मनातल्या मनात घुसमटू नका. गरज पडल्यास सायकॅट्रिस्टचीही मदत घ्या.

बरेचदा मनोविकारांशी झुंजणारी माणसे बोलती होत नाहीत.. कारण समाज..आपल्याकडे सायकॅट्रिस्टकडे जाणाऱ्या व्यक्तीला अगदी लगेच ‘ वेडा ‘ हे लेबल लावून समाज मोकळा होतो. आधीच मनाने कमकुवत झालेली ती व्यक्ती अधिकच निराशेच्या गर्तेत सापडते. हे सर्व टाळण्यासाठी मग ती व्यक्ती आपला आजार लपवणे आणि कोणतीही वैद्यकिय मदत न घेणे बेहत्तर समजते आणि मग परिस्थिती हळूहळू हाताबाहेर जाते..

खर तर, शरीराला जसे काही दुखते खुपते तसेच मनाचेही. अशावेळी मनाच्या डाॅक्टरची मदत घेतली तर कोठे बिघडते? ही गोष्ट समाजाने मान्य केली पाहिजे आणि पिडीत व्यक्तीला चेष्टेचा विषय न बनवता , तिला पाठिंबा दिला पाहिजे..

कसय ना एकदा वेळ टळून गेली की ती परत येत नाही आणि मृत्यूच्या दारा आत गेलेले कोणी परतून येत नाही. व्यक्ती गेली की गेलीच….

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12