विवाहित असून देखील या अभिनेत्रींच्या प्रेमात वेडा होता सनी देओल, पहा वडिलांनीच घडून आणला होता असा ब्रेकअप..

बॉलीवूड क्षेत्रामध्ये अ-फेयर बद्दल बोलणे हे अगदी सहाजीकच होऊन गेले आहे. हो कारण या क्षेत्रामध्ये कुणाचेही कुणावरही प्रेम होऊ शकते मग समोरची व्यक्ती कशीही असो आपल्यापेक्षा वयाने मोठी असो वा लहान असो किंवा उंचीने मोठी असो किंवा लहान असो काहीही पाहिले जात नाही. काही अभिनेते आणि अभिनेत्रीचे तीन ते चार अफेअर झालेले असते. आपली मुले मोठी झाली असली तरीही ही मंडळी लग्न करताना मागेपुढे बघत नाही.
आजच्या या आमच्या लेखातून आम्ही तुम्हाला सनी देओल बद्दल अशीच काही माहिती सांगणार आहोत. आपल्या आवाजाने संपूर्ण चित्रपट सृष्टी हादरवणारे सनी देओल यांची ॲक्टींग पाहून सर्वजण चकित होतात. सनी देओलने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्यांच्या दमदार आणि कसदार अभिनयामुळे त्यांच्या चित्रपटांची खूप चर्चा होत असे यासोबतच त्यांच्या प्रेमाची देखील चर्चा खूपच रंगली जायची.
त्यांची लव्हस्टोरी सुद्धा त्यांच्या चित्रपटांसारखीच आहे. त्यांची एक लव्हस्टोरी सफल नव्हती झाली. तर आजच्या या लेखातून आपण हे जाणून घेऊयात की सनी देओल यांचे कोणत्या अभिनेत्री वर प्रेम झाले होते. कुणाच्या प्रेमात घायाळ झाले होते अभिनेता सनी देओल. जुन्या ॲक्शन पटातील खूपच प्रसिद्धीचा अभिनेता म्हणून सनी देओल ला ओळखले जायचे. सनी देओल यांना ॲक्शन चित्रपट करायलाच खूप आवडत असत.
कदाचित याच कारणामुळे आपल्याला त्यांच्या बऱ्याचशा चित्रपटांमध्ये ॲक्शन पहायला मिळाली. परंतु काही दिवसापासून ते बॉलीवूड पासून दूरच आहेत. असे सांगितले जाते की ज्या काळात सनी देओल खूपच हिट होते त्या काळात सनी देओल एका अभिनेत्रीच्या प्रेमामध्ये वेडे झाले होते. हे ऐकून तुम्ही चकित व्हाल की ही अभिनेत्री अगोदरच विवाहित होती. आपल्या वडिलांप्रमाणेच सनी देओल देखील एका विवाहित तरुणीच्या प्रेमात पडले होते.
ज्याप्रमाणे धर्मेंद्र हेमामालिनीच्या प्रेमात वेडे झाले होते त्याचप्रमाणे सनी देओल सुद्धा या अभिनेत्रीच्या प्रेमामध्ये वेडे झाले होते. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून राजेश खन्ना यांची पत्नी डिंपल कपाडिया ही होती. त्यावेळी डिंपल कपाडिया ट्विंकल खन्ना ची आईदेखील बनली होती. दोघेही एकमेकांवर बेसुमार प्रेम करत होते. हे प्रेम एकतर्फी नव्हते. त्याकाळात सनी देओल जास्तकरून चित्रपट डिंपल कपाडिया बरोबरच करत असत.
सनी देओल देखील डिंपल कपाडिया वर मनापासून प्रेम करत होते. परंतु त्यांचे हे प्रेम लग्नापर्यंत पोहोचले नाही. कारण दोघेही त्यावेळी विवाहित होते. परंतु ही गोष्ट जेव्हा सनी देओल यांच्या पत्नीला माहित झाली तेव्हा त्यांच्या आयुष्यात एक वादळच निर्माण झाले. परंतु सनी देओल यांनी आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून डिंपल कपाडिया बरोबर ब्रे-कअप केला होता. सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांना एकत्र अनेक पार्टीजमध्ये पाहिले गेले आहे.