म्हणून अक्षय कुमार बॉलिवूडच्या एकाही पार्टीत जात नाही, म्हणाला मला नेहमीच स्टेज वर बोलावून…

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षयकुमार याला खिलडियो का खिलाडी म्हणून ओळखले जाते. कोणत्याही कामासाठी अक्षय कुमार सर्वात पुढे असतो. कोणतेही काम असो ते काम उत्साहात आणि जल्लोषात करणे हा त्याचा हाथखंडाच आहे. म्हणून तर अक्षय कुमार यशस्वी झाला आहे. अक्षय कुमारची जीवन अगदी साधे आणि सरळ आहे.
काम करण्याचे त्याचे काही नियम आहेत जे तो तंतोतंत पाळतो. अक्षय कुमार असा एकमेव अभिनेता आहे जो लवकर झोपतो व लवकर उठतो. बॉलिवूड पार्ट्यांमध्ये तो क्वचितच दिसतो. द कपिल शर्मा शोमध्ये पोहोचलेल्या अक्षय कुमारने एकदा बॉलिवूड पार्ट्यांमध्ये का भाग घेत नाही याचे देखील उत्तर सांगितले आहे.
अक्षय कुमारला त्यांच्याविषयीच्या अफवांबद्दल कपिल शर्मा यांनी एक प्रश्न विचारला होता की तुम्ही पार्ट्यांमध्ये जात नाही कारण मग तुम्हाला त्यांना पार्टी देखील द्यावी आणि खर्च करावा लागेल. म्हणून पार्टीत जात नाही काय ? ही अफवा आहे की सत्य? ‘ ‘हे खरं आहे.’ असं अक्षय विनोदाने उत्तर दिले होते.
याआधी कॉफी विथ करण शोमध्ये अक्षयने सकाळी लवकर उठन्याबद्दल सांगितले की, ‘मला झोपायला आवडते आणि मला सकाळ पहायला देखील तितकेच आवडते. जे मला पार्टीत बोलावतात त्यांना माहित आहे की मी लवकर निघतो कारण मी लवकर झोपायला जात असतो. आणि रात्री फार काळ झोपण्याचा मला तिरस्कार आहे.
केवळ पार्टीच नाही तर अक्षयला कोणत्याही शोमध्ये देखील जायलाही आवडत नाही. बॉलिवूड पुरस्कार सोहळे आणि यासारख्या कार्यक्रमावरील देखील त्याचा आत्मविश्वासही गमावला आहे. तथापि, अलीकडेच अक्षय पुरस्कार सोहळ्यांना हजेरी लावत असत व पुरस्कारही मिळवत असे. किस्सा सांगताना अक्षयने सांगितले होते की बर्याच वेळा आयोजक त्याला या शो वर नृत्य करण्याच्या बदल्यात पुरस्कार देतात.
त्यानंतर त्याने अश्या कार्यक्रमापासून लांब राहण्याचे ठरविले. वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर अक्षय कुमारचे सध्या बरेच चित्रपट आहेत. तो लवकरच आपल्या बर्याच चित्रपटांसह प्रेक्षकांची मने जिंकणार आहे. दिवाळीनिमित्त त्याने आपल्या चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. या दिवाळी अक्षय कुमारने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. अक्षय कुमारच्या नव्या चित्रपटाचे नाव राम सेतु आहे.