या एका छोट्या चुकीमुळे ऐश्वर्याने जगप्रसिद्ध अभिनेता विल स्मिथ चा चित्रपट तब्बल 3 वेळेस नाकाराला, म्हणाली….

…
विश्वसुंदरी म्हणून ओळख निर्माण झालेली अभिनेत्री म्हणजे ‘ऐश्वर्या राय’. तशातच ती बच्चन कुटुंबाची सूनबाई म्हणून देखील खूपच प्रसिद्ध आहे. तिने अनेक हिंदी चित्रपटामध्ये काम केलेले आहे. बॉलीवूड शिवाय तिला हॉलीवुड कडून सुद्धा अनेक ऑफर आल्या होत्या.
बॉलिवुडच्या सुंदरी ऐश्वर्या सोबत हॉलीवूडचा अभिनेता ‘विल स्मिथ’ काम करू इच्छित होता. एका इंटरव्यू दरम्यान ऐश्वर्याने असे सांगितले की तिला विल्स स्मिथ बरोबर काम करण्याची संधी चालून आली होती परंतु परिवारामुळे तिला त्यात काम करता आले नाही असे तिने सांगितले.
ऐश्वर्या आणि विल स्मिथ यांची खूप इच्छा असूनही ते एकमेकांबरोबर काम करू शकले नाही. विल स्मितने ऐश्वर्याला ‘हिच’, ‘सेवन पाउंड्स’ आणि ‘टूनाइनट ही कम्स’ या चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी विचारले होते. परंतु ऐश्वर्या यापैकी कुठल्याही चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी इच्छुक नव्हती याचे कारण म्हणजे तिच्या कडे वेळ नव्हता.
परंतु ‘सेवन पाउंड्स’ या चित्रपटाला नाकार देण्यामागे ऐश्वर्याचे वेगळेच कारण होते असे मिडीयाद्वारे समोर येत आहे. आईएनएएस याच्या द्वारे सांगण्यात येते की ऐश्वर्या रायला चित्रपटात काम न करण्याचे कारण विचारले तेव्हा ऐश्वर्याने करवाचौथ करण्याचे कारण सांगितले होते. चित्रपटात काम करण्या ऐवजी मी करवा चौथ करण्यास जास्त महत्व देईल असे यावेळी ऐश्वर्याने म्हटले होते. अशी बातमी अमेरिकन मीडियाने प्रसारित केली होती.
परंतु ऐश्वर्याने यामागील सत्य सांगितले की अमेरिकन मीडिया यांनी दिलेली ही बातमी साफ चुकीची आहे. द सेवन पाउंड्स या चित्रपटाची स्क्रिप्ट मला दिवाळीनंतर वाचायची होती, तेव्हा दादिमा ( तेजी बच्चन) यांची तब्येत खराब होती.
ऐश्वर्याने सांगितले की मी लॉस एंजिल्स ला जाऊन विल स्मिथ बरोबर स्क्रिप्ट वाचू शकत नव्हते. यावर तिने असे सांगितले की काही चुकीचे केले आहे का? मी माझ्या करिअर साठी माझ्या परिवाराची परवा करू नको का? मी परिवारासाठी माझ्या करिअरला देखील मागे टाकू शकते असे ऐश्वर्याने सांगितले.
ऐश्वर्याने ‘टूनाइट ही कम्स्स’ हा चित्रपट नाकारण्याचे देखील कारण सांगितले की हे मात्र खरे आहे की मी ‘टूनाइट ही कम्स्स’ चित्रपटात विल सोबत काम करण्यास नकार दिला होता. मी त्याच्यासाठी खूप दुःखी आहे पण यासाठी देखील माझा परिवार माझ्यासाठी महत्त्वाचा होता त्यामुळे मी हा देखील चित्रपट करू शकले नाही.
ऐश्वर्याने पुढे सांगितले की मी खरंच विल स्मिथ सोबत काम करण्यास इच्छुक आहे. जेव्हा आम्ही भेटलो होतो तेव्हा आम्ही दोघांनी एकत्र काम करण्याची इच्छा दाखवली होती. ही एक कलाकार म्हणून माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यांच्या चित्रपटात कोणताही कलाकार काम करण्यासाठी उत्सुक राहील कारण त्यांचे चित्रपट जगभर चालतात.
2006 मध्ये ऐश्वर्याने आईएएनएस ला दिलेल्या इंटरव्यू मध्ये देखील विल स्मित सोबत काम करण्याची इच्छा आहे असे सांगितले होते. ऐश्वर्याने सांगितले की माझे खूपच ‘दुर्भाग्य’ आहे ज्यावेळी विलने मला विचारले तेव्हा आम्ही आशुतोष गोवारीकर यांच्या जोधा-अकबर या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होतो. परंतु मला विल स्मिथ बरोबर काम करण्याची खूप इच्छा आहे.