सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाचे समोर आले इनसाईड फोटो पहा…

बी-टाऊनचे सर्वात प्रिय आणि स्टार जोडपे म्हणून कियारा आणि सिद्धार्थ कडे पाहिलं जात. ही ‘शेरशाह’ जोडीने, तीन वर्षांच्या डेटिंगनंतर अखेर आज लग्नगाठ बांधली आहे. राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगड पॅलेसमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सिद्धार्थ-कियारा यांच्या लग्नाच्या विधीनंतर आज म्हणजेच 7 फेब्रुवारीला सात फेरे घेऊन त्यांचा विवाह संपन्न झाला आहे.
त्यांचे चाहते अनेक दिवसांपासून कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाची वाट पाहत होते आणि आता ती घडी आली आहे. दोघांचा प्रत्येक विवाह सोहळा जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये झाला, जो अत्यंत गुप्त ठेवण्यात आला आहे. त्यांच्या या अनमोल क्षणांचा एकही फोटो समोर आलेला नाही. परंतु त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनशी संबंधित अपडेट नक्कीच आहे.
जैसलमेर विमानतळ ते सूर्यगढ पॅलेसपर्यंत सध्या प्रसारमाध्यमांचा मेळावा बघितला जात आहे. या हायप्रोफाईल लग्नाला खूप कव्हर केले जात आहे. आता लोक फक्त कियारा सिद्धार्थच्या लग्नाच्या ठिकाणाच्या आतल्या फुटेजची वाट पाहत आहेत जे आता समोर आले आहे. त्यांच्या लग्नासाठी हा राजवाडा आतून नववधूसारखा सजला आहे, तर तिथे खूप नाच-गाणे सुरू आहेत.
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. येणार्या पाहुण्यांना आनंद घेता यावा यासाठी राजस्थानची संस्कृती दाखवण्यासाठी खास कलाकारांना पाचारण करण्यात आल्याचे समोर आले आहे. फुलांची सुंदर सजावट करण्यात आली आहे. विशेषत: रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सात फेरे घेऊन सिद्धार्थ-कियारा पती-पत्नी बनले आहेत.
जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये शाही पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला. दरम्यान, हॉटेलमधून लग्नाची माहिती समोर येऊ लागली आहे. लग्न पार पडल्यानंतर एका बँड सदस्याने सांगितले की, सिद्धार्थ वर म्हणून खूप देखणा दिसत होता. कियारा आणि सिद्धार्थने त्यांच्या लग्नासाठी सिल्व्हर कलरचे पोशाख निवडले. दोघांची जोडी छान दिसत होती.
सिद्धार्थ-कियाराने लग्नाचे सात फेरे घेतले आहेत. सूर्यगड पॅलेसमध्ये दोघांच्या लग्नाचे विधी पार पडले. आता दोघेही पती-पत्नी झाले आहेत. जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमधून लग्नाच्या शहनाई आणि आतील गोंधळ बाहेर ऐकू येतो आहे. रिपोर्ट्सनुसार, वर म्हणजेच सिद्धार्थ लग्नात उतरला आहे. ‘साजन जी घर आये’ या गाण्यावर सिद्धार्थ मंडपात दाखल झाला आहे.
दरम्यान, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, संगीतादरम्यान सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांची तब्येत बिघडली होती. अभिनेत्याच्या वडिलांनाला उलट्या होऊ लागल्या, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागला. तर आता, सूर्यगढ पॅलेसमध्ये सिड आणि कियारा यांच्या लग्नासाठी भेटवस्तू येऊ लागल्या आहेत.
सूर्यगड पॅलेसच्या बाहेर भेटवस्तूंनी भरलेला ट्रक दिसला. सिद्धार्थ आणि कियारा यांच्या मंडपाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या नवदाम्पत्याची एक झलक बघण्यासाठी चाहते अक्षरशः आतुर झाले आहेत.