या अभिनेत्रीला व्हायचय दुसऱ्या बाळाची आई, नवऱ्याने नकार दिल्यावर चाहत्यांपुढे पसरले असे हाथ, म्हणाली तुम्हीच माझी इच्छा…

एका टीव्ही अभिनेत्रीला दुसऱ्यांदा आई व्हायची इच्छा आहे. मात्र पती काही तयार नाही. अखेर या अभिनेत्रीने चाहत्यांना सोशल मीडियावरून विनंती केली आहे की त्यांनी पतीची समजूत काढावी आणि दुसऱ्या बाळासाठी तयारी करावी. माही विज असे असे या अभिनेत्रीचे नाव आहे तर अभिनेता जय भानुशाली तिचा पती आहे.
माही विज आणि जय भानुशाली हे हिंदी टीव्ही इंडस्ट्रीमधील लोकप्रिय जोडपे आहे. सन 2011 साली दोघेही विवाह बंधनात अडकले होते. एका पार्टीमध्ये दोघांची भेट झाली होती. त्यानंतर त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर हळुहळु प्रेमात झाले. प्रेमाचे रूपांतर अखेर लग्नात झाले. विवाहानंतर 9 वर्षाने म्हणजेच 2019 मध्ये माही आणि जय यांच्या घरामध्ये लहानग्या ताराचे आगमन झाले.
तारा चे आगमन होते वेळी त्याचे कुटुंब आनंदाने बहरून गेले होते. त्यावेळी माही आणि जय यांनी इंस्टाग्राम वरून आनंदाची बातमी चाहत्यांना सांगितली होती. आईवडिल होण्याचा निर्णय हा एक खासगी निर्णय असतो. पूर्वीच्या काळात सहसा आई वडील होणार असणार तर कोणी त्याबाबत उघडपणे चर्चा करत नव्हते. पण आता याचीही चर्चा सोशल मीडियावर होऊ लागलीये.
अभिनेत्री माही विज हिने चक्क नेटक-यांनाच गळ घातली आहे. की तिला आता दुसर अपत्य व्हावं अशी अपेक्षा आहे आणि दुसरे मुल इतक्यात नकोय म्हणून तिचा नवरा तयारी दाखवत नाहीये. तर दुस-या मुलासाठी नव-याला राजी करायची विनंती माही ने नेटकऱ्याणा केली आहे. माही विजचा नवरोबा कोण तर जय भानुशाली. माहीला दुस-यांदा आई व्हायची तीव्र इच्छा आहे. पण जय यासाठी अजिबात राजी नाही.
आता नवरा राजी नाही म्हटल्यावर या बयेने काय करावे, तर चक्क नेटक-यांना नवरोबाला समजवण्यास सांगितले आहे. माही ने इंस्टाग्राम वरून विनंती केली आहे की प्लीज जयला कोणीतरी समजवा आणि त्याच्या इन्स्टाग्रामवर जाऊन कॉमेंट्समध्ये त्याला सांगा की, माहीचे पुन्हा आई व्हायचे स्वप्न पूर्ण कर. सध्या लॉकडाऊनमुळे मी खूप कंटाळले आहे. मला आणखी एक मुल हवे आहे, अशी जाहीर पोस्टच तिने इंस्टाग्राम वरून शेअर केली आहे.
माही व जय यांना एक वर्षांची मुलगी आहे. तारा भानुशाली तिचे नाव. तारा एक वर्षाची होत नाही तोच माहीला दुसरे बाळ हवे आहे. दुस-या मुलाची इच्छा तिने जयसमोर व्यक्त केली होती. पण जयने दुसरे अपत्य इतक्यात नको म्हणून स्पष्टच नकार दिला आहे. शेवटी माहीने सोशल मीडियावरच या पर्सनल मॅटरची चर्चा सुरु केली. जय आणि माही यांच्या घरी गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात मुलीच आगमन झालं आहे. याशिवाय खुशी आणि राजवीर नावाच्या मुलांची देखभाल करत आहेत. त्यांच्या शिक्षणाचा खर्च देखील या दोघांनी उचलला आहे.
माही वीज इन्टाग्रामवर बरीच अॅक्टीव्ह असते. तारा आणि जयसोबत अनेकदा ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. चाहते देखील तीचे फोटो पसंत करत असून चांगला प्रतिसाद देत आहे. जय भानुशालीने आत्तापर्यत अनेक हिंदी मालिका आणि रिअॅलिटी शोजमध्ये काम केले आहे. मिठी छोरी नंबर 1, निलांबरी, कहानी घर घर की, कैरी: रिश्ता खट्टा मिठा अशा अनेक मालिकांमध्ये त्याने वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. माहीनेही हिंदीसोबतच दाक्षिणात्य मालिकांमध्येही काम केले आहे.