इतक्या वर्षानंतर साराने केला धक्कादायक खुलासा! म्हणाली करीनाने कधीच आमची आई होण्याचा प्रयत्न केला नाही; कारण ती नेहमी…

इतक्या वर्षानंतर साराने केला धक्कादायक खुलासा! म्हणाली करीनाने कधीच आमची आई होण्याचा प्रयत्न केला नाही; कारण ती नेहमी…

सैफ अली खान आणि करीना कपूर ह्यांची प्रेमकहाणी अगदीच फिल्मी आहे. आपल्या मित्रांना बॉलिवूडच्या सर्वोत्तम अभिनेत्रींना पटवून दाखवण्याचं चॅलेंज घेतो काय, आणि ह्याच चॅलेंजमध्ये तो खरोखरच करीना कपूरच्या प्रेमात पडतो. अगदीच फिल्मी वाटत असणारी हि कथा, अशीच अगदी स्क्रिप्टेड असल्यासारखीच झाली होती.

त्यांचे अफेअर सुरु झाले तेव्हापासूनच बॉलिवूड मध्ये सगळीकडेच चर्चेचा विषय ठरला होता. सैफ आणि करीनाच्या ह्या नात्याला त्यांच्या चाहत्यांनी ‘सैफिना ‘ असे नाव दिले होते. सुरुवातीपासूनच त्यांच्या ह्या नात्याची सगळीकडेच चांगलीच चर्चा होत होती. त्यात सर्वात मोठा मुद्दा होता त्या दोघांच्या वयातील अंतर आणि सैफ चा पूर्वीच झालेला विवाह.

त्या विवाहामध्ये त्याला, सारा आणि इब्राहिम नावाचे दोन किशोरवयीन म्हणजेच टिनेजर्स असे दोन मुलं होते. त्यामुळे सैफ आणि करीना ह्या दोघांचा विवाह होईल का ह्याबद्दल एक मोठा प्रश्न होता. मात्र, त्या दोघांना देखील सर्वांच्या मनाने लग्न करायचे होते. त्यामुळे त्यांनी वेळ घेतला मात्र, आपल्या दोन्ही मुलांच्या होकारानंतरच त्या दोघांचा विवाह झाला असे स्वतः सैफ अली खान ह्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.

त्यानंतर सैफ आणि करीना ह्या दोघांचा विवाह देखील झाला आणि पहिले तैमूर व आता अजून एक मुलगा देखील त्या दोघांना झाला आहे. सैफ आणि करीना ह्या दोघांनी बऱ्याच वेळा एकत्र मुलाखती दिल्या आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यातील कोणतीही बाब कधी लपवून नाही ठेवली. नेहमी सर्व मुलाखतीमध्ये त्यांनी, आपल्या आयुष्यातील सर्व प्रश्नांवर उत्तर दिले आहे.

मात्र, करीना हिने जरी सैफ सोबत लग्न केले असले तरीही, तिने त्याचा दोन्ही मुलांसोबत देखील चांगलेच नाते ठेवले आहे. त्यांच्यासोबत नेहमीच चांगला वेळ आणि सण ते सोबतच साजरे करत असलेले आपण बऱ्याच वेळा सोशल मीडियावर पाहिले आहे. ह्या जोडप्याने आपल्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टीची माहिती, अनेक बाबींचे खुलासे ‘कॉफी विथ करण’ च्या टॉकशो मध्ये केले आहे.

ह्याच टॉक शो मध्ये एकदा सारा आणि सैफ सहभागी झाले होते. त्यावेळी करणने साराला “करीनाला तू छोटी आई म्हणून हाक मारते का? असा प्रश्न विचारला. त्यावर अगदी हसत सारा बोलली, “माझ्या वडिलांनी माझ्यावर कधीही करीना आमची दुसरी आई आहे असा मान्य करण्याचा द’बाव टाकला नाही.

त्यामुळे आम्हाला असं कधी वाटलंच नाही की, आम्ही करिनाला आई म्हणून हाक मारावी. जर मी करीनाला छोटी आई म्हणून हाक मारली तर करीनाला ध’क्का बसेल. आणि ती म्हणेल काय? नाही. मी करीनाला के किंवा करीना नावाने हाक मारते. आम्ही एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहोत.

जेव्हा करीना माझ्याशी पहिल्यांदा बोलली होती तेव्हा ती म्हणाली होती की, हे बघ तुझी आई खूप छान व्यक्ती आहे. मला फक्त तुझ्यासोबत मैत्री करायची आहे. तिने कधीच आमची आई होण्याचा प्रयत्न केला नाही. जर मी तिला छोटी आई वगैरे म्हणाले असते तर कदाचित ती स्वतःच माझ्यावर वैतागली असती.ती तैमूर ची आई आहे, आणि तैमूर जगातील सर्वात क्युट आणि माझा छोटा भाऊ आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12