‘शोले’तील ‘सांभा’ची मुलगी सुंदरतेच्या बाबतीत आलिया भट्टलाही देते टक्कर, दिसते इतकी हॉ’ट आणि सुंदर की पाहून चकित व्हाल..

बॉलीवूडमध्ये अनेक असे ज्युनियर आर्टिस्ट म्हणजेच सहकलाकार आहेत ज्यांनी आपल्या दमदार अभिनयाने चांगलीच लोकप्रिय कमवाली आहे. त्यांच्या या उत्तम अभिनयाने ते आपली वेगळी ओळख, या मायानगरीमध्ये बनवतात आणि कधी कधी एखाद्या मुख्य अभिनेता किंवा अभिनेत्री इतकीच प्रसिद्धीसुद्धा कमवतात.
असे काही मोजकेच कलाकार आहेत, ज्यांनी कधीच कोणत्याच सिनेमामध्ये प्रमुख भूमिका साकारली नाही मात्र तरीही नेहमीच लोकप्रियतेच्या शिखरावर राहिले. आपल्या उत्तम अश्या अभिनय कौशल्याने त्यांनी मोठ्या मेहनतीने बॉलीवूड मध्ये आपली हटके जागा निर्माण केली.
अनुपम खेर, ओम पुरी,अमरीश पुरी, शक्ती कपूर, अलोकनाथ, जॉनी लिव्हर, स्वरा भास्कर, फरीदा जलाल असे काही नावं आहेत, ज्यांनी नेहमीच सह कलाकार म्हणून कामं केलं आणि मुख्यकलाकारांइतकीच प्रिसिद्धी देखील मिळवली. अश्याच काही नावांपैकी एक नाव आहे, मॅक मोहन यांचं. शोले सिनेमामध्ये, डाकू सांभाची भूमिका साकारली होती.
सुरुवाती पासूनच मॅक यांनी, गुंडाच्या भूमिका साकारल्या होत्या. मात्र शोले सिनेमामधून त्यांना खरी ओळख मिळाली. गब्बर सोबत, तेवढाच खुंखार बनत मॅक यांनी सांभाची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेला इतर प्रमुख कळकरांइतकीच प्रशंसा आणि लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर शान, कफन, डॉन, सत्ते पे सत्ता आँखे, शोला और शबनम सारख्या सिनेमामध्ये देखील त्यांनी काम केलं आहे.
मात्र याच खुं खार आणि ख तरनाक दिसणाऱ्या व्हिलनची मुलगी, तेवढीच सोज्वळ आणि सुंदर आहे. विनती माक्किनी असं मॅकच्या मुलीचे नाव आहे.विनती एखाद्या बॉलीवूडच्या अभिनेत्रीइतकीच सुंदर दिसते. काही दिवसांपासून याच विनतीच्या फोटोजने सोशल मिडीयावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. ब्युटी विथ ब्रेन म्हणून विनतीला ओळखलं जात.
ती एक स्क्रिप्ट रायटर आणि प्रोड्युसर देखील आहे. नुकतीच नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला सिनेमा स्केटर गर्लची ती प्रोड्युसर आणि तिची बहीण दिग्दर्शक आहे. विनतीची सख्खी बहीण मंजिरी एक डायरेक्टर आहे. मॅक हे प्रसिद्ध बोलीवडू अभिनेत्री रविना टंडनचे मामा आहेत, म्हणजेच विनती आणि रविना दोघी मामे बहीण आहेत. मॅक यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे.
करन जोहरच्या बिग बजेट सिनेमा ‘माय नेम इज खान’च्या आर्ट डिपार्टमेंटमध्ये होती. आणि त्यामुळं विनतिने शाहरुख सोबत काम केलं आहे, व तेव्हापासून त्या दोघांची मैत्री देखील झाली आहे. तिचे बॉलीवूड मध्ये अनेक फ्रेंड्स आहेत. ती नेहमीच नवीन आणि क्रिएटिव्ह प्रोजेक्ट्समध्ये काम करण्यासाठी अग्रेसर असते.
मॅक तर सध्या या जगात नाहीये, मात्र आपल्या आईसोबत आणि बहिणीसोबतव भावासोबत ती नेहमीच आपल्या सोषसील मीडियावर फोटोज शेअर करत असते. ‘द लास्ट मार्बल’ आणि ‘द कॉर्नर टेबल’ सारखी काही शॉर्ट सिनेमा देखील तिने बनवले आहेत.