सलमान खानमुळेच होत नाहीये ३५ वर्षीय सोनाक्षी सिन्हाच लग्न..कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क..!

बॉलीवूडच्या दबंग खान म्हणून सलमान खानला ओळखलं जात, तर दबंग गर्ल म्हणून सोनाक्षी सिन्हाला म्हणलं जातं. दबंग सिनेमामधून शत्रूग्न सिन्हा यांच्या मुलीने म्हणजेच सोनाक्षी सिन्हाने अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. अगदी आपल्या वडिलांप्रमानेच, सोनाक्षीने देखील ज्या पण क्षेत्रात एन्ट्री घेतली तिथे चांगलेच यश मिळवले.
अभिनेत्यापासून एका नेत्यापर्यंत शत्रूग्न सिन्हा यांचा प्रवास नेहमीच यशस्वी ठरला. आपल्या खास मित्राच्या म्हणजेच राजेश खन्ना यांच्या विरोधात निवडणुकांसाठी उभं राहून आपल्या राजनैतिक करियरची सुरुवात केली. आपल्याच मित्राच्या विरोधात लढावं लागल्याचं दुःख आज देखील शत्रूग्न सिन्हाना आहे, असं अनेकवेळा त्यांनी सांगितलं आहे.
अजून एक दुःख नाही मात्र चिंता सध्या शत्रूग्न सिन्हा यांना त्रास देत आहे. आपल्या लाडक्या मुलीचं म्हणजेच सोनाक्षी सिन्हा हीच लग्न. कोणत्याहीबापाप्रमाणे, शत्रूग्न यांचा देखील आपल्या मुलीच्या लग्नाची चिंता आहे. आता सोनाक्षी ३४ वर्षांची आहे. मुंबईच्या आर्य मंदिर मधून स्कुलिंग केल्यांनतर सोनाक्षीने एसएनडीटीमधून फॅशन डिझाइनींगचा कोर्स केला आहे.
२००५ मध्ये आलेल्या, मेरा दिल लेके देखो या सिनेमासाठी सोनाक्षीने डिझायनर म्हणून काम केलं होत. तिने कधीच विचार केला नव्हता की, ती कधीही अभिनय क्षेत्रात प्रवेश करेल. मात्र सलमान खानने तिला प्रवृत्त केले आणि २०१० मध्ये दबंग सिनेमा मधून बॉलीवूड मध्ये अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. त्यानंतर आपल्या दमदार अभिनयाने सोनाक्षीने लवकरच स्वतःची वेगळी जागा निर्माण केली.
रणवीर सिंह, अक्षय कुमार, शाहिद कपूर, अजय देवगण अश्या अनेक अभिनेत्यांसोबत तिने काम केले. पीआर एजेंसी कॉर्नरस्टोनचा मालक बंटी सचदेवा सोबत सोनाक्षी सिन्हाच्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. बऱ्याच वर्षांपासून सोनाक्षी आणि बंटीच्या नात्याबद्दल चर्चा होत आहे. बऱ्याच पार्टीमध्ये आणि कार्यक्रमध्ये या दोघांना देखील सोबत बघण्यात येत.
ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत, मग अजूनही इतके वर्ष होऊन देखील त्या दोघांनी लग्न का नाही केलं? तर याच कारण आहे सलमान खान. बंटी सलमानचा भाऊ सोहैलच्या बायकोचा भाऊ आहे. त्याचे, खान कुटुंबासोबत चांगले नाते आहे. बंटी आणि सलमान दोघेही चांगले मित्र आहेत आणि बंटीवर सलमानच्या विचारांचा चांगलाच पगडा आहे असं म्हणलं जात.
कदाचित त्यामुळेच बंटी देखील सोनाक्षी सोबत लग्नासाठी टाळाटाळ करत असावा असं देखील काही जणांचे मत आहे. मात्र, सोनाक्षी सध्या अनेक प्रोजेक्ट्स मध्ये काम करत आहे म्हणून देखील त्यांच्या लग्नाला उशीर होत आहे असं बोललं जात आहे.
बुलबुल तरंग या ओटीटी प्रोजेक्टमध्ये ती काम करणार आहे. अजय देवगनच्या भुज सिनेमामध्ये देखील सोनाक्षीची महत्वपूर्ण भूमिका असल्याचं सांगितलं जात आहे. प्रोफेशनली सोनाक्षी सिन्हाहीच काम उत्तम सुरु असलं तरीही तिच्या लग्नाची बातमी ऐकण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.