प्रत्यक्षात एकमेकांचे बहीण भाऊ आहेत बॉलिवुडचे हे 10 सितारे, नाव वाचून तुमचाही बसणार नाही विश्वास…

बॉलिवूड जग हे अनेक स्टार नी भरलेले आहे. येथे अनेक दिग्गज कलाकार आणि सुपरस्टार आहेत. बॉलीवूड चे असे भरपूर कलाकार आहेत जे एकमेकांपासून वेगळे असतात परंतु काही ना नात्यांमुळे किंवा कारणामुळे ते एकमेकांना जोडले गेलेले असतात. परंतु हे कोणत्या नात्यामुळे किंवा कारणामुळे जोडलेले असतात याबाबतची लोकांना काहीच माहिती नसते.
आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला 10 बॉलिवूडचे कलाकार विषयी माहिती सांगणार आहोत जे खऱ्या आयुष्यामध्ये एकमेकांचे भाऊबहीण आहेत. तर काही कलाकारांनी एकमेकांना बऱ्याच काळापासून भाऊ-बहीण मानलेले आहेत. चला तर मग बघुयात कोण आहेत हे मानलेले भाऊ बहीण आणि खरेखुरे भाऊ बहीण.
साजिद खान आणि झोया अख्तर: तुम्हाला हे माहीत नसेल की फरान व झोया अख्तर तसेच साजिद व फरान खान हे चुलत भाऊ-बहीण आहेत. परंतु त्यांचे नाते असे आहे की, साजिद व फराह ची आई आणि फरान अख्तर ची आई एकाच आईचे ही मुले आहेत.
इम्रान हाश्मी आणि आलिया भट्ट: बॉलिवूडची अभिनेत्री आणि महेश भट्ट यांची लाडकी कन्या आलिया भट्ट व बॉलीवूड चे धडाकेबाज अभिनेते इम्रान हाश्मी हे दोघे एकमेकांचे चुलत भाऊ बहीण आहे. तसेच त्यांचे नाते असे आहे की, आलिया ची आई आणि इमरान चे वडील एकाच आईचे मुले आहेत.
रणवीर सिंग आणि सोनम कपूर: बॉलीवूड चे अभिनेते अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूर व बॉलीवूड चे खूपच उत्साही अभिनेते रणवीर सिंग हे दोघे एकमेकांचे चुलत भाऊ बहीण आहेत. ते कसे? तर रणवीर ची आजी व सोनम ची आजी दोघींचीही आई एकच आहे. त्यामुळे रणवीर आणि सोनम हे एकमेकांचे चुलत भाऊ बहिण आहे.
अर्जुन कपूर आणि कॅटरिना कैफ: तुम्ही हे जाणून हैराण झाला असाल की अर्जुन कपूर आणि कॅटरिना कैफ यांचे काय नाते असू शकते. परंतु अर्जुन कपूर याने कॅटरीना कैफला त्याची बहीण मानले आहे, आणि जेव्हा पासून कॅटरीनाने आपल्या करिअरची सुरुवात केली तेव्हापासून तिने अर्जुनला आपला भाऊ मानले आहे.
ऐश्वर्या राय आणि सोनू सूद: बॉलिवूडमधील विश्वसुंदरी म्हणून प्रसिद्ध असलेली ऐश्वर्या राय. ऐश्वर्या राय आणि सोनू सूद यांनी एकत्र जोधा-अकबर या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर ऐश्वर्या राय हिने सोनू सूद त्यांना आपला भाऊ मानले आहे.
मोहनीश बहल आणि काजोल: बॉलीवुड चित्रपट सृष्टीतील खूपच दमदार अभिनेत्री म्हणजे काजोल देवगण. काजोल ची आई तनुजा तसेच मोहनीश ची आई नूतन ह्या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. यामुळे मोहनीश बहल आणि काजोल हे दोघे चुलत भाऊ-बहीण आहेत. बऱ्याच लोकांना याबाबत काहीही माहिती नाही.
करण जोहर आणि आदित्य चोप्रा: सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारे बॉलिवूडचे एक दिग्गज दिग्दर्शक करण जोहर आणि आदित्य चोप्रा हे नात्याने एकमेकांचे चुलत भाऊ लागतात. ते कसे, तर करण ची आई आणि आदित्यचे वडील दोघांचाही जन्म एकाच आईच्या पोटी झालेला आहे.
तब्बू आणि शबाना आझमी: आपल्या चित्रपटांमधून खूपच प्रसिद्ध झालेली तसेच अजूनही अविवाहित असलेली तब्बू ही शबाना आझमी यांची भाची आहे. शबाना आझमी ह्या त्याकाळी खुपच प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. शबाना आझमी आणि तब्बू चे वडील हे दोघे एकमेकांचे सख्खे भाऊ-बहीण होते.
श्रद्धा कपूर आणि लता मंगेशकर: हे वाचून बरेचसे वाचक हे चिंतेत पडले असतील की या दोघींचे काय नाते असू शकते, बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तसेच शक्ती कपूर यांची कन्या श्रद्धा कपूर व भारताची गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचे असे नाते आहे की श्रद्धा कपूर ही लता मंगेशकर यांची भाची आहे. कारण लता मंगेशकर यांचे चुलत भाऊ म्हणजेच श्रद्धा कपूर यांचे आजोबा आहेत.