आदिल खानसोबत लग्नानंतर राखी सावंतने कबुल केला इस्लाम ? आता ‘या’ नावाने ओळखली जाणार राखी …?

आदिल खानसोबत लग्नानंतर राखी सावंतने कबुल केला इस्लाम ? आता ‘या’ नावाने ओळखली जाणार राखी …?

राखी सावंत कायमच चर्चेत असते. ती चित्रपटात वगैरे काही करत नसली तरीही ती तिच्या वक्तव्यामुळे आणि कृत्यामुळे नेहमी चर्चेत असते. तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. म्हणून राखीला ड्रामा क्वीन म्हणून संबोधले जाते,

राखी बिग बॉस हिंदीमध्ये आल्यापासून जास्तच चर्चेत असते. सुरुवातीला तिने काही चित्रपटात काम केले तसेच काही आयटम सॉंग्स देखील केले. पण तिला खरी प्रसिद्धी बिग बॉस हिंदीमुळे मिळाली. तसेच राखीने काही दिवसांपूर्वी मराठी बिग बॉसमध्येही सहभाग नोंदवला होता. तेव्हाही तिच्या खेळीचे सर्वानी कौतुक केले होते.

पण मराठीमध्ये तिची वाईल्ड कार्ड एंट्री झाली होती. पण तरीही ती अनेक दिवस बिग बॉसमध्ये होती आणि त्यानंतर फायनलच्या आधी ती बिग बॉसच्या घराच्या बाहेर झाली. दरम्यान राखी सध्या तिच्या वयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. राखीने तिचा लॉन्ग टाइम बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीसोबत लग्न केल्यामुळे ती चर्चेत आली आहे.

आदिल खानसोबत असलेल्या आपल्या नात्याबद्दल राखीने जाहीरपणे स्वीकार केला होता. त्यामुळे ते दोन्ही अनेक दिवसांपासून चर्चेत होते. तसेच आदिलने राखीसाठी दुबईमध्ये घर घेतल्याने त्यांचे प्रेम आणखीनच बहरत होते. पण आता त्यांनी लग्न केल्याने पुन्हा एकदा आदिल आणि राखी चर्चेत आले आहेत.

पण लग्नापेक्षा राखीने धर्मांतर केल्याने या चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. जेव्हा राखीचे लग्नाचे प्रमाणपत्र सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले तेव्हा या गोष्टींचा खुलासा झाला. हे पाहून राखीने गेल्या वर्षी मे महिन्यात आदिलशी लग्न केल्याची माहिती मिळाली.

सर्टिफिकेटमध्ये राखीचे नाव निकाहनंतर फातिमा असे लिहिण्यात आले असून, निकाहनंतर राखीने इस्लामचा स्वीकार केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राखीने अद्याप याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही, मात्र तिचा भाऊ राकेश याने मात्र आपले मौन नक्कीच मोडले आहे.

राकेशने एका मुलाखतीत सांगितले की, मला हे माहित नाही, ही त्यांची वैयक्तिक गोष्ट आहे. नवरा बायको यांच्यात. आम्हाला याबाबत काहीही माहिती नाही. पण जर राखीने हे केले असेल तर तिने विचार करून केले असेल. राकेश पुढे म्हणाला – आम्ही सगळे टेन्शनमध्ये आहोत, राखी सर्वात लहान आहे आणि तिने आयुष्यभर खूप दु:ख पाहिले आहे.

मागच्या वेळी बिग बॉसमध्ये रितेशने देखील तिचा वापर करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे तिला खूप वाईट वाटले आणि त्रास झाला, त्यामुळे राखीने यावेळी व्यवस्थित लग्न केले आहे. नुकतेच राखी आणि आदिलच्या लग्नाचे काही ग फोटो व्हायरल झाले होते. राखीने पांढरा आणि गुलाबी शरारा आणि दुपट्टा परिधान केला होता.

आदिल शर्ट आणि जीन्समध्ये दिसत होता. दोघांनीही हार घातले होते आणि काही कागदपत्रांवर सह्या करत होते. यानंतर राखीने इन्स्टाग्रामवर तिच्या लग्नाची घोषणा केली आणि लिहिले की, मी माझ्या आयुष्यातील प्रेम, आदिलसोबत लग्न केल्यामुळे मी खूप आनंदी आणि उत्साहित आहे. तसे, या प्रकरणातील ट्विस्ट असा आहे की, आदिलने निकाहचे व्हायरल झालेले फोटो नाकारले आहेत आणि लग्न झाले नसल्याचे सांगितले आहे, त्यानंतर राखीने योग्य वेळी सर्व खुलासे करणार असल्याचे सांगितले आहे. .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12