Big Boss 15 : राखी सावंतने पार केल्या सर्व हद्दी, पहा ‘या’ पुरुष स्पर्धकांचे केस ओ’ढत केली हा’णामा’री..

Big Boss 15 : राखी सावंतने पार केल्या सर्व हद्दी, पहा ‘या’ पुरुष स्पर्धकांचे केस ओ’ढत केली हा’णामा’री..

बिग बॉसच घर म्हणलं की, गोंधळ, भां’डण आणि तमाशा या सर्व गोष्टी हमखास असणारच. त्याशिवाय बिग बॉस बघायला देखील मज्जा येत नाही, असं शो च्या चाहत्यांच मत असत. या शोचा मोठा चाहतावर्ग आहे. म्हणून तर हिंदी बिग बॉसचे हे १५वे पर्व आहे. हिंदी बिग बॉसच्या घरात आता, काही जुन्या सदस्यांची एंट्री झाली आहे, तर काही नवीन सदस्य देखील आले आहेत.

हे पाच सदस्य व्हीआयपी म्हणून हिंदी बिग बॉसच्या घरात आले आहेत. यामध्ये रश्मी देसाई, देवोलिना भट्टाचार्जी, राखी सावंत व तिचा पती रितेश आणि मराठी बिग बॉस मधून प्रसिद्धी कमावणारे अभिजित बिचकुले यांचा समावेश आहे. या पाच सदस्यांचा घरात प्रवेश झाला त्यानंतर पासूनच घरामध्ये मोठा गोंधळ बघायला मिळत आहे.

अभिजित बिचकुले आणि शमिता शेट्टी यांच्यामध्ये झालेला वा’द चांगलाच च’र्चेत आला होता. विकेंडच्या भागात सलमान खानने अभिजित बिचकुलेची बाजू घेत शमिताला चांगलेच सुनावले होते. अभिजीतने तिला कोणत्याही प्रकराची शिवी दिली नव्हती, त्याऊलट शमितानेच अभिजीतला शिवी दिली होती. सोबतच, त्याला जर व्यवस्थित हिंदी येत नाही तर शोमध्ये का आला, असं जेव्हा शमिता बोलली त्यावर देखील सलमान खानने तिला चांगलेच ऐकवले.

हा शो सगळ्यांसाठी खुला आहे. तुझी ही भाषा अजिबात योग्य नाहीये, अभिजित जो बोलला ते तुझ्यासाठी किंवा इतर कोणासाठी नव्हतं. याबद्दल राखी सावंतने अभिजीतची साथ देत, सलमान खान समोर झालेला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. राखीने वीकेंडच्या भागात अभिजित बिचकुलेची बाजू योग्य पद्धतीने मांडली होती.

त्यासाठी अभिजीतने तिचे आभार देखील माघीतले. पण, ते सध्या बिग बॉसच्या घरात आहेत. म्हणून तर, एकाच दिवसात चित्र चांगलंच बदललं. एकाच दिवसात अभिजित आणि राखी यांची मैत्री तुटली. राखी आणि अभिजीतमध्ये जोरदार भां’डण झाल्याचं, बघायला मिळत आहे. नुकतंच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये, अभिजित आणि राखीचे भांडण बघायला मिळत आहेत.

अभिजित बिचकुले बेडरूममध्ये राखीसोबत काही बोलत बसलेला दिसत आहे. अचानकच तो तिला म्हणतो की,’तू नवरा भाड्यावर आणला आहेस का? तुझं लग्न तर आम्ही कोणीच नाही पाहिलं. हा तुझा नवरा नहिये, भाड्यावर घेऊन आलीस तू तुझ्या नवऱ्याला.’ हे ऐकताच राखीचा रागाने तीळपापड झाला. तिने अभिजीतला चांगलेच सुनवायला सुरुवात केली.

‘तू माझ्या नवऱ्याला भाड्याचा म्हणालास ना? मग तूच भाड्याचा टट्टु आहेस. तुझी बायको पण भाड्याने आणली आहेस का तू?’असं राखी त्याला म्हणाली. त्यावर अभिजित पुढे बोलतो की,’सलमान भाई ज्यापद्धतीने मजाकमध्ये बोलत होते तसेच मी पण बोललो.’ त्याच्या या उत्तरावर राखी अधिकच भडकली आणि थेट त्याचे सामान फेकून देत म्हणाली,’सलमान भाई असं कधीच बोलले नाही की, माझा नवरा भाड्याचा आहे.’

त्यानंतर राखीने पूर्ण घरात चांगलाच गोंधळ केला. अभिजितच्या सामानासोबतच घरातील इतर काही सामान फेकून देण्यास सुरुवात केली. त्यात पुढे राखी अभिजीतचे केस ओ’ढत असल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे, हा वा’द नक्की कोणता गोंधळ घेऊन आला आहे आणि त्याचे काय पडसाद उमटतात हे बघणे रंजक ठरेल.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *